हळद पिकामध्ये प्रामुख्याने विचार केला तर या पिकाच्या शाखीय वाढीत निर्माण होणारी पानांची व फुटव्यांची संख्या यांचा उत्पादनवाढीमध्ये फार मोठा वाटा असतो. हळद पिकाची शाकीय वाढ पूर्ण होऊन कंद वाढ होतअसते. शाकीय अवस्थेत पानांमध्ये अन्न साठवले जाते. सातव्या महिन्यानंतर ते कंदाच्या वाढीसाठी वापरले जाते.
मात्र या परिस्थितीत रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव या पिकावर झाला तर याकिडीकडून अन्नाचा वापर केला जातो व त्याचा परिणाम हा उत्पादन घटीवर होतो. या लेखात आपण हळद पिकावरील कंदकूज आणि करपा रोगाविषयी माहिती घेऊ.
हळद पिकावरील कंदकूज
- लक्षणे- या रोगाची प्रथम लक्षणे ही कंदातील कोवळ्या फुटव्यावर लगेच दिसून येतात. नवीन आलेल्या फुटव्यांची पाने पिवळसर तपकिरी रंगाची होतात. खोडाचा रंग तपकिरी आणि काळपट होतो. याच्यामुळे प्रादुर्भावग्रस्त फुटवे ओढल्यास सहज हातामध्ये येतात. जमिनीतील कंद बाहेर काढल्यास ते मऊ पडून त्यांचा घाण वास येतो तसेच त्या कंदा मधून पाणी बाहेर पडत असते.
जैविक नियंत्रण
प्रतिबंधात्मकउपाय- जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस दोन ते अडीच किलो प्रति एकरी 250 ते 300 किलो सेंद्रिय खतामध्ये वापरावे.
रासायनिक नियंत्रण
आळवणी प्रति लिटर पाणी
कॉपर ऑक्सिक्लोराईड चार ते पाच ग्रॅम
रोगाची तीव्रता जास्त असल्यास आळवणी प्रतिलिटर मॅटॅलॅक्सिलआठ टक्के अधिक मॅन्कोझेब 64 टक्के ( संयुक्त बुरशीनाशक)चार ग्रॅम
टीप- आळवणी करताना जमिनीचा पसार असावा. आळवणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा. गरज वाटल्यास पुन्हा एकदा वरील औषधांची आळवणी करावी.
हळद पिकावरील करपा
लक्षणे- कोलेटोट्रिकमकॅपसीसीबुरशीमुळे अंडाकृती ठीपके पानावर पडतात. तीव्रता वाढल्यास संपूर्ण पान करपते. टॅफ्रीनाया बुरशीमुळे असंख्य लहान तांबूस रंगाच्या गोलाकार ठिपके पानांवर आढळतात. पुढे ते वाढत जातात व संपूर्ण पान करपते.
नुकसान- लागवडीपासून सात महिन्यांपूर्वी पाने करपल्यास उत्पादनामध्ये मोठी घट येते.
अनुकूल वातावरण- सकाळी पडणारे धुके आणि दव हे प्रामुख्याने कारणीभूत असतात.
या रोगाचे नियंत्रण
फवारणी प्रति लिटर पाणी
मॅन्कोझेब दोन ते अडीच ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड अडीच ते तीन ग्रॅम
टीप-धुके पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस राहिल्यास 15 दिवसांच्या अंतराने सात महिने पूर्ण होईपर्यंत आलटून पालटून फवारण्या कराव्यात.
Share your comments