1. कृषीपीडिया

'या' झाडाची एका एकरात लावलेली 120 झाडे 10 वर्षानंतर बनवतील करोडपती

कोरोना कालावधी मध्ये बर्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या. हातच्या नोकरी गेल्यामुळे अनेकजण काम नसल्यामुळे हैराण झाले. कमाईचे साधन बंद पडले.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
mahogany tree cultivation give more financial income in 10 or 12 year

mahogany tree cultivation give more financial income in 10 or 12 year

कोरोना कालावधी मध्ये बर्‍याच जणांच्या नोकऱ्या गेल्या. हातच्या नोकरी गेल्यामुळे अनेकजण काम नसल्यामुळे हैराण झाले. कमाईचे साधन बंद पडले.

त्यामुळे बरेच जण कमाईसाठी वेगवेगळे पर्याय अवलंबताना दिसत आहे. बरेच जण छोटे-मोठे व्यवसायच्या शोधात आहेत.या व्यवसायाच्या माध्यमातून बरेच जण रोजगाराची संधी निर्माण करीत आहे.  या लेखामध्ये आपण असेच एक बिझनेस आयडिया पाहणार आहोत.

परंतु या आयडिया मध्ये तुम्हाला  आर्थिक उत्पन्नासाठी काही कालावधीसाठी धीर धरावा लागेल.या माध्यमातून तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. ती बिझनेस आयडिया म्हणजे महोगनी शेती हे होय. महोगणीच झाड सगळ्यांना माहित आहे.एकच एकरात महोगनीची 120 झाडे लावली तर बारा वर्षात दहा ते बारा वर्षात करोड रुपये कमवता येऊ शकतात.

नक्की वाचा:Low Investment bussiness: कमी खर्चात करा हा व्यवसाय आणि कमवा लाखो रुपये

 महोगणीचे  झाड कसे असते?

महोगणीचे झाडाचे लाकूड मजबूत असते आणि दीर्घ शेल्फ लाइफ आहे. ते लाकूड लाल आणि तपकिरी रंगाचे असते. पाण्याच्या नुकसानीमुळे त्याचा परिणाम होत नाही.

. शास्त्रज्ञांच्या याबद्दल युक्तिवाद आहे की हे झाड फक्त 50 डिग्री सेल्सिअस तापमान सहन करू शकते व पाणी नसताना देखील वाढतच राहते. कारण त्याची झाडे 40 ते दोनशे फूट उंच असतात. भारतात या झाडाची लांबी फक्त साठ फुटांपर्यंत आहे.

या झाडाची मुळे कमी खोल आहेत आणि भारतात ते डोंगराळ भाग वगळता कोठेही वाढु शकतात. हे कोणत्याही सुपीक जमिनीत वाढू शकते. परंतु पाणथळ जमिनीत किंवा खडकाळ जमिनीत लागवड करू नये. तसेच ज्या ठिकाणी लागवड कराल त्या ठिकाणच्या मातीचे पीएच सामान्य असावे.

 या झाडाचा उपयोग                             

 महोगणी चे झाड अतिशय मौल्यवान म्हणून ओळखले जाते.हे अत्यंत मजबूत आणि टिकाऊ आहे. पाण्याचाही त्यावर प्रभाव पडत नाही. त्यामुळे जहाजे, दागिने, फर्निचर, प्लाईवुड, सजावट आणि शिल्पे बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. यासोबतच या झाडाच्या पानांचा प्रामुख्याने कर्करोग, रक्तदाब, दमा, सर्दी, डायबिटीस अशा अनेक आजारांवर उपयोग होतो.

नक्की वाचा:महत्वाची व्यवसायिक कल्पना! अगदी कमीत कमी गुंतवणूक आणि जागेत करा हा व्यवसाय सुरू, महिन्याकाठी कमवा खूप चांगला नफा

 या झाडापासून मिळणारे उत्पन्न

हे झाड पाच वर्षातून एकदा बिया देते. एका झाडापासून  पाच किलोपर्यंत बिया बाहेर पडतात.  या झाडाच्या बियाण्यांची किंमत खूप जास्त असून ते 1000 रुपये किलोपर्यंत विकले जाते.  महोगणीचे  लाकूड दोन ते 2200 रुपये प्रती घनफूट दराने मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

ही एक औषधी वनस्पती देखील आहे.त्यामुळे त्याच्या बिया आणि फुलांचा उपयोग शक्ती वाढवणारी औषधे बनविण्यासाठी केला जातो.

महोगणी च्या  झाडांच्या पानांमध्ये एक विशेष प्रकार आढळतो, त्यामुळे डास आणि कीटक त्याच्या झाडाजवळ येत नाहीत. याच कारणामुळे त्याच्या पानांचे आणि बियांचे डास बचत प्रतिबंधक आणि कीटकनाशके तयार करण्यासाठी वापरले जाते.महोगणी चे तेल साबण, रंग, वार्निश आणि इतर अनेक औषधे बनविण्यासाठी वापरले जाते.

नक्की वाचा:Farm Machinary: शेतकरी दादांनो! जमीन उंच-सखल आणि डोंगराळ भागात आहे, तर ही यंत्र पडतील उपयोगी, वाचतील कष्ट

English Summary: mahogany tree cultivation give more financial income in 10 or 12 year Published on: 05 June 2022, 12:45 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters