सेंद्रिय शेती ला विषमुक्त शेती सुद्धा बोलले जाते. तसे बोलण्यामध्ये कारण सुद्धा तितके च प्रबळ आहे, आपण रासायनिक उपचार घेतो म्हणजे च आपण आपल्या शेतीला विष देत असतो. आता बाकी पिकांचे थोडे बाजूला ठेऊ आणि भाजीपाला पीक विषयी बोलू कारण आपल्या रोजच्या वापरातील पीक विभाग आहे.
आपण भाजीपाला पिकवतो, विकतो. पण तो पिकवत असताना आपण रासायनिक मारा किती प्रमाणात करतो याचा सुद्धा विचार करायला हवा
कारण तो भाजीपाला आपण, आपल्या घरचे, गावातील लोक, जिल्ह्यातील तसे च राज्यातील देशातील आपले च बांधव खात असतात. जर आजूबाजूची परिस्तिथी पाहिली तर पैश्यासाठी काहीही केले जाते, उद्या/परवा मार्केट ला माल जाणार असेल तर आज खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक फवारणी घेतली जाते ज्याचे अवशेष तसे च त्या मालावर राहतात.
जे अप्रत्यक्षरित्या आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात व आपल्याला कॅन्सर सारखे भयंकर आजाराला सामोरे जावे लागते. (जो आजार गरीब - श्रीमंत, काळा - गोरा, किंवा कोणत्या ही जाती धर्माचा विचार करत नाही). मग त्याचे खापर कोणाच्या माथी फोडायचे हा एक प्रश्न च उभा राहतो.
मग याच्यावर उपाय काय
तर उपाय आहे, आपण सगळे सेंद्रिय शेती कडे वळू. सेंद्रिय शेती जी खूप कमी खर्चात केली जाऊ शकते, मातीची गुणवत्ता टिकवून ठेवली जाते तसे च कमी खर्चात दर्जेदार उत्पादन देऊन आपल्याला आर्थिक मदत सुद्धा करू शकते. कारण उत्पादन किती घ्यायचे हे आपल्या हातात आहे पण मिळणारा दर आपल्या हातात नाही त्यामुळे उत्पादन खर्च कमी करणे ही च काळाची गरज आहे ज्याचे आपल्या सर्वांना अवलंबन करावे च लागेल. ज्यामुळे आपण दर्जेदार माल आपल्या माणसांना देऊ व निरोगी राहण्यास मदत करू.
माझी सर्वांना एक विनंती आहे, याच्यावर नक्की विचार करा आणि सर्वांना पाठवा जेणेकरून 5 जरी शेतकरी बंधू सेंद्रिय शेती कडे वळले तरी आपल्या कार्याचे सार्थक होईल (मग त्या पाच मध्ये स्वताला घ्यायला काहीच हरकत नाही आहे).
हा लेख स्वलिखित (स्वतः लिहिलेला) आहे, हा उद्देश आहे की शेतकरी बांधवांच्या उत्पादन खर्चात घट करणे आणि दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी मदत करणे.
ओंकार वि. पाटील
(7020206602
(ग्रीन रेव्हॉल्युशन)
Share your comments