1. कृषीपीडिया

शेतकऱ्यांनो! गवती चहा( लेमन ग्रास) लागवडीचे समजून घ्या आर्थिक गणित, याच्या तेलाचे उत्पन्न हेक्टरी मिळते 4 लाखापर्यंत

शेतकरी कमीत कमी गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न कसे मिळेल याचा विचार कायम करत असतात. विविध पिकांचे लागवड शेतकरी करतात, परंतु बऱ्याच पिकांमध्ये गुंतवणूक जास्त असते परंतु त्यामानाने येणारे उत्पन्न खूपच कमी मिळते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
lemongrass cultivation give strong financial support to farmer

lemongrass cultivation give strong financial support to farmer

शेतकरी कमीत कमी गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न कसे मिळेल याचा विचार कायम करत असतात. विविध पिकांचे लागवड शेतकरी करतात, परंतु बऱ्याच पिकांमध्ये गुंतवणूक जास्त असते परंतु त्यामानाने येणारे उत्पन्न खूपच कमी मिळते.

या सगळ्या पार्श्वभूमीवर गवती चहा अर्थात लेमन ग्रास लागवड शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या भक्कम पाठिंबा देऊ शकते. लेमन ग्रास लागवडीतून शेतकऱ्यांना पैसे कमावता येण्याची एक नामी संधी आहे.

  एकंदरीत याच्या लागवडीचा खर्चाचा विचार केला तर कमीत कमी वीस हजार रुपये पर्यंत त्याचा खर्च येतो. परंतु यामधून शेतकर्‍यांना लाखो रुपयांचा नफा देखील मिळू शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये सुद्धा लेमन ग्रास व्यवसायाबाबत बोलताना म्हटले होते की लेमन ग्रास लागवडीमुळे शेतकरी केवळ स्वतःला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवत नाहीत तर देशाच्या प्रगतीमध्ये देखील योगदान देत आहेत.

नक्की वाचा:आईस क्यूब व्यवसाय: उन्हाळ्यात बंपर कमाई देईल हा व्यवसाय, धाडस करुन करा सुरु

 लेमन ग्रास पासून मिळणाऱ्या उत्पादनाचा विचार केला तर या पासून काढलेल्या तेलाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. लेमन ग्रास पासून काढलेले तेल सौंदर्यप्रसाधने, साबण उद्योग, तेल आणि औषधे बनवणार्‍या कंपन्या मध्ये मोठ्या प्रमाणात होतो.

त्यामुळे बाजारपेठेत लेमन ग्रास च्या त्याला खूप मागणी आहे. लेमन ग्रास लागवडीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे लागवड तुम्ही दुष्काळग्रस्त पट्ट्या देखील चांगल्या पद्धतीने करू शकतात. एका माहितीनुसार लेमन ग्रास लागवडीतूनकेवळ एक हेक्‍टर क्षेत्रात तुम्ही एका वर्षात चार लाख रुपयांपर्यंतचा निव्वळ नफा मिळवू शकता.

लेमन ग्रास ला कुठल्याही प्रकारच्या खताची आवश्यकता नाही

लेमन ग्रास शेतीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या खतांची आवश्यकता भासत नाही.लेमन ग्रास चे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे,याला कुठल्याही वन्यप्राण्यांकडून नष्ट करण्याचा धोका नसतो. याची लागवड केली की पाच ते सहा वर्ष हे सतत उत्पादन चालू राहते.

नक्की वाचा:Agri Bussiness Idea: सेंद्रिय खत विक्रीचा व्यवसाय देईल आर्थिक समृद्धी, उत्तम नियोजन चांगला नफा

 लेमनग्रासची काढणीचा कालावधी

 जर तुम्हाला लेमन ग्रास लागवड करायची असेल तर त्याचा सर्वोत्तम काळा फेब्रुवारी ते जुलै दरम्यान असतो. एकदा लागवड केल्यावर सहा ते सात वेळा याची कापणी करता येते व वर्षातून तीन ते चार वेळा याची कापणी होते.

लेमन ग्रास पासून तेल काढले जाते.लेमन ग्रास या तेलाची किंमत एक हजार रुपये ते 1500 रुपये प्रति लिटर आहे.लेमन ग्रास ची पहिली कापणी लागवडीनंतर तीन ते पाच महिन्यांनी केली जाते.

लेमन ग्रास कापणीसाठी तयार झाले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी ते फोडून त्याचा वास तर तीव्र स्वरूपाचा आला तर समजून घ्यावे की लेमन ग्रास कापणीसाठी तयार आहे.

 लेमन ग्रास मधील आर्थिक गणित

 एका हेक्‍टरमध्ये लेमनग्रास ची लागवड केली तर सुरुवातीला 20 ते 40 हजार रुपये खर्च येतो. एकदा पिकाची लागवड केली की वर्षातून तीन ते चार वेळा काढणी करता येते.

लेमन ग्रास च्या तीन ते चार कलमांवर सुमारे 100 ते 150 लिटर तेल निघते.एका हेक्टर मधून वर्षभरात सुमारे तीनशे पंचवीस लिटर तेल निघते.तेलाची किंमत प्रति लिटर 1200 ते 1500 रुपये आहे. या हिशोबाने विचार केला तर हेक्‍टरी चार ते पाच लाख रुपये अगदी आरामात मिळू शकतात.

नक्की वाचा:Low Investment bussiness: कमी खर्चात करा हा व्यवसाय आणि कमवा लाखो रुपये

English Summary: lemongrass cultivation give strong financial support to farmer Published on: 18 June 2022, 11:14 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters