महाराष्ट्रात लिंबाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. लिंबू हा रोजच्या जेवणात वापरला जाणारा घटक असून खासकरून उन्हाळ्यात लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे जो शेतकरी उन्हाळ्यात चांगल्या पद्धतीने बागेची काळजी घेतो अशा शेतकऱ्याला मोठा फायदा होत असतो. असे असले तरी लिंबू पिकावर योग्य निगा न राखल्यामुळे रोग पडतो आणि आर्थिक नुकसान होत असते. हे रोग कोणते आहेत आणि कशा पद्धतीने या रोगांचे नियंत्रण करता येते याविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
लिंबावर पडणारे रोग
डिंक्या : डिंक्या हा लिंबावर येणारा बुरशीजन्य रोग आहे. हा रोग फायटोफ्थोरा पालमिव्होरा, फायटोफ्थोरा सिट्रीफ्थोरा व फायटोफ्थोरा निकोशियाना या प्रमुख बुरशीमुळे होतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडाच्या बुंध्याची साल फाटून त्यातून डिंक बाहेर पडतो. त्यामुळे इतर रोपांच्या मुळांना रोगाची लागण होऊन मुळे कुजतात. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडून गळतात. रोगाचे योग्य वेळी नियंत्रण न केल्यास जमिनीलगत खोडे कुजतात व रोपे कोलमडून मरतात. यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी ज्या ठिकाणाहून डिंक ओघळतो तेथील साल झाडाच्या आतील भागास इजा नाही अशा प्रकारे पटाशीद्वारे खरवडून काढावी. त्यानंतर १% पोटॅशियम परमँगनेट या द्रावणाने धुवून काढावी व बोर्डोमलम लावावे. त्यानंतर जखमेवर पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर ५० ग्रॅम मेटॅलॉफ्झिल १ लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण लावावे तसेच झाडावर फॉसीटिल एएल २० ग्रॅम/१० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी असे केल्यास हा रोग नियंत्रणात येतो व शेतकऱ्याची आर्थिक हानी होत नाही.
आरोह
आरोह हा रोग पाण्याच्या अयोग्य पद्धतीने केलेल्या वापरामुळे होतो. झाडाचा बुंधा सतत पाण्याच्या संपर्कात राहिल्याने फायटोपथेरा नावाच्या बुरशीचा प्रादुर्भाव व प्रसार फार झपाट्याने आणि मोठ्या प्रमाणावर होतो. हा रोग कोरोना सारख्याच पसरणारा आजार आहे, फक्त हाच आहे की, हा आजार लिंबाच्या झाडांना होत असतो,तर कोरोना मानवाला. एका रोगट झाडापासून अनेक झाडांस रोग लागत असतो. या संसर्गाला पाण्याचा संपर्क कारणीभूत ठरत असतो. तसेच शेतीची अयोग्य पद्धतीने मशागत केल्यानेही हा रोग होतो. नांगरणी करतेवेळी मुळांना इजा झाल्यास झाडांना हा रोग होतो. या रोगामुळे झाड कमजोर होतात. त्यामुळे इतर रोगांना निमंत्रण मिळते असे झाल्यास शेतकऱ्याला मोठा तोटा सहन करावा लागतो. या रोगाला नियंत्रित करण्यासाठी झाडाला सेंद्रिय खत देणे गरजेचे आहे. त्यामुळे झाडाची रोगप्रिकारकशक्ती वाढेल व झाड रोगाला बळी पडणार नाही.
ट्रिस्टीझा: हा एक विषाणूजन्य रोग आहे. यामुळे झाडाचा मोठ्या प्रमाणात र्हास होतो. या रोगाची लागण झाल्याने झाडाच्या सालीतील फ्लोयम नावाच्या उतीस प्रादुर्भावित करतो, त्यामुळे मुळास अन्नपुरवठा होत नाही व मुळे अशक्त होऊन अकार्यक्षम होतात. पानांचा हिरवागारपणा व चमक कमी होऊन संपूर्ण झाड मलुल झालेले दिसते. अशा झाडाची पाने संपूर्णपाने थोड्या कालावधीत गळून जातात व झाडांचा र्हास होतो. र्हास झालेल्या झाडावरील फळे न गळता लटकलेली राहतात. या रोगाला नियंत्रित करण्यासाठी बागेत वापरात येणार्या औजारांचे निर्जंतुकीकरण सोडियम हायपोक्लोराइडच्या १ते २ टक्के द्रावणात करावे. तसेच ट्रिस्टीझावाहक मावा किडींचे आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करून नियंत्रण करावे. यामुळे रोग नियंत्रित होऊन आर्थिक हानी होणार नाही.
Share your comments