कोळी समाज हा कित्येक कालांतरापासून मासेमारी करुण आपली व आपल्या कुटूंबाची उपजीविका भागवत आलेला आहे. कोळी लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे समुद्रातून जाळ्याच्या साहाय्याने मासे पकडणे आणि ते बाजारात जाऊन विकणे असे होय. पुरुष वर्ग मासेमारी करुण आणतात व स्त्रिया त्या मासळ्या बाजारात विकतात किंवा मासळ्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून विकतात.
यावरून असे दिसून येते की स्त्रिया सुद्धा या मासेमारी मध्ये आपला सहभाग नोंदवत आलेल्या आहेत. मासेमारी का व्यवसाय खूप जुना आहे व यामध्ये खुप जोखम आहे. तरी लोक त्यांच्या जिवाची परवा न करता खोल समुद्रात जाऊन मासेमारी करतात. त्यांच्या भाषेत मासळीला ‘महावरा’ असे म्हणतात. मासेमारी मध्ये बांगडा, बोंबील, कोळंबी व जिताडा इत्यादींचा समावेश होता.
समुद्रामध्ये मासेमारी ही फक्त आठ महिन्यापर्यंतच शक्य असते (म्हणजेच नारळीपौर्णिमा ते होळी पर्यंत) त्यानंतर पावसाळा हा ऋतू असल्यामुळे समुद्रात मासेमारी ही फारशी शक्य नसते, कारण म्हणजे, पावसाळ्यात समुद्र लाटा रौद्र रूप धारण करतात व जे लोक मासेमारी करतात त्यांच्या बोटींना किंवा होडींना अडथळा निर्माण करतात व यादरम्यान चार महीने कालावधी असलेल्या पावसाळ्यात ते सुकलेल्या मासळीवर किंवा खाडीतील लहान-सहान मासे पकडुण आपली उपजीविका भागवतात.
कोळी लोक समुद्रालाच त्यांचे आराध्य दैवत मानतात, कारण त्यांना समुद्रातूनच अन्न आणि उत्पन्न मिळते. पावसाळा उलगडून गेल्यानंतर नारळीपौर्णिमेला नारळ अर्पण करुण आपआपल्या होडी समुद्रात उतरवतात.
मासेमारीमुळे या लोकांना आर्थिक फायदा होतोच परंतु सोबतच समुद्रातील शंक, शिंपले इत्यादी यांचा उपयोग करुण बनवलेले कलाकृती मूळे सुद्धा यांच्या धनराशी मध्ये भार पाडण्यास मदत होते. महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते.
कोळी लोकनृत्य के महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे या नृत्यामध्ये ते मच्छिमारांच्या जिवनाचे प्रतिबींब दर्शवतात व तसेच या नृत्यामध्ये ते मच्छिमारांच्या जिवनाचे प्रतिबींब दर्शवतात. तसेच त्या नृत्यामध्ये स्त्री-पुरुष दोघेही सहभाग घेतात. यामध्ये नृत्य करताना बोटी किंवा होडी आणि लाटा यांचे काल्पनिक झालचाल दर्शवतात.
कोळी नृत्य का एक अतिशय मनोरंजक आणि सजीव नृत्य आहे जो समुद्राबद्दलच्या नितांत प्रेमाची आणि जिवनाबद्दलची वास्तविकता दर्शवण्याचा प्रयत्न करतात. सध्याच्या काळात मासेमारीवर खूप परिणाम दिसून येत आहे. जसे की रासायनिक कंपन्या, कारखाने यामधून निघणारे प्रदूषित पाणी जलीय प्रदूषण घडवून आणत आहे. या प्रदूषित पाण्यामुळे जलसंपत्ती वर मोठ संकट आलेले आहे. यांमुळे मच्छीमारांना मिळणारे उत्पन्न घटत आहे.
कोळी लोकांचे मुख्य आहार म्हणजे मासे आणि भात असे आहे. अशा या पौष्टीक आहारामुळे यांचे शरिर तंदरुस्त आणि मजबूत असते. ही लोक मासळ्यांना आहारामध्ये तळवूण, भाजून, वाळवूण किंवा मासळ्यांची चटणी बनऊण समाविष्ट करतात. कोळी लोकांचे पारंपारिक पद्धतीने परिधान करावयाचे पोशाख हे खूप सुंदर असतात.
त्यामध्ये पुरुषांसाठी रुमाल, सदरा, लुंगी आणि कान टोपेरा (कान आणि डोके झाकणारी मोठी टोपी) असते व स्त्रियांसाठी लुगडे, चोळी-फडकी असते. वेगवेगळ्या सणांमध्ये स्त्रिया खूप शृंगार करुण समारंभामध्ये मोठया प्रमाणात सहभागी होतात.
प्रविण शिवाजी रेकूळवाड, विद्यार्थी,
मो. न. ८६९८८७७९४८ .
जयंता सु. टिपले, सहाय्यक प्राध्यापक (अतिथी व्याख्याता),
जलीय प्राणी आरोग्य व्यवस्थापन विभाग,
मो. न. ८७९३४७२९९४.
मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर. महाराष्ट्र
Share your comments