पावसाळ्यातील पहिल्या पावसात हिरवळीच्या खताचे बी पेरले जाते, व तयार झालेले पिक जमिनीत गाडले जाते. बरयाचदा करंज, भेंड, अंजन व ग्लीरीसिदिया या वनस्पतीची पानेही जमिनीत गाडली जातात. हिरवळीचे खत तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी पिके/वनस्पती व त्यातील नत्राचे प्रमाण : पिकाचे नाव नत्राचे शेकडा प्रमाण ताग (भोरू) ०.४६ चवळी ०.४२ गवार ०.४९ सुर्यफुल ०.४५ हरभरा ०.५० सोयाबीन ०.७१ उडीद ०.४७ मटकी ०.३५ लसून घास ०.७३ करंज २.६१ अंजन १.४२ ऐन २.०४ भेंड २.९० गिरिपुष्प २.७४
हिरवळीचे खत तयार करताना घ्यावयाची काळजी : पिक लवकर भरपूर वाढणारे असावे. पिक रसरशीत व तंतूचे असावे ज्यायोग्य ते लवकर कुजते. पिक कोणत्याही जमिनीत वाढणारे व शक्यतो शेंगाकुलीतील असावे. पिकामुळे जमिनीवर वाईट परिणाम होऊ नये. पिक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी ते जमिनीत गाडावे. पिकला सिंचनाची सुविधा असावी, म्हणजे पिक साधण्यास मदत होते.
हिरवळीचे खते:हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती ,झाडांचा पाला किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरुन आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्ये पेरुन वाढलेली पिके फुलो-यावर आली म्हणजे शेतात नांगरून ती गाडून एकजीव करणे या वनस्पतींच्या हिरव्या व कोवळ्या अवशेषांपासून तयार झालेल्या खतास "हिरवळीचे खत "असे म्हणतात.
हिरवळीच्या खताचे फायदे :-ही खते जवळजवळ प्रति हेक्टरी ५० -१७५ किलो नत्राचे योगदान करते .
फार मोठ्या प्रमाणात जमिनीत कर्बाचे प्रमाण वाढवते . मातीची पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवणयाची क्षमता वाढवते .
मातीत फायदेशीर सुक्ष्म जीवाणूंच्या निर्मितीचे प्रमाण वाढवते
मातीच्या भौतिक रासायनिक व जैविक पोतावर किंवा वातावरणात कुठल्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही. सर्वसाधारपणे शेंगवर्गीय पिकांपासून बनलेले १ टन हिरवळीचे खत २.८ ते ३ .० टन शेणखताच्या बरोबर असते .या खतांच्या आच्छादनाने जमिनीची धुप होत नाही .
हिरवळीच्या खतांचे प्रकार -
हिरवळीच्या खतांचे दोन प्रकार आहेत .१) शेतात लागवड करून घेण्यात येणारी हिरवळीची खते :- जेव्हा हिरवळीच्या खतांचे पीक शेतात सलग ,मिश्न किंवा एखाद्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून पेरतात व त्याच शेतात ते पीक फुलो-यावर येण्यापूर्वी शेतात नागंरून मिसळतात ,तेव्हा त्याला शेतातच घेण्यात येणारे हिरवळीचे खत असे म्हणतात .या प्रकारच्या हिरवळीच्या खतामध्ये ताग,गवार ,चवळी ,धैचा ,मूग ,मटकी ,मेथी ,लाख ,मसूर ,वाटाणा ,उडीद ,कुळीथ,सेंजी,शेवरी ,लसुरघास ,बरसीम या पिकांचा समावेश असतो.
२) हिरव्या कोवळ्या पानांचे हिरवळीचे खत :- पडीक जमिनीवर अथवा जंगलात वाढणा-या वनस्पतीची कोवळी हिरवी पाने आणि फांद्या गोळा करून शेतात गाडणे अथवा पडीक जमिनीवर किंवा शेताच्या बांधावर हिरवळीच्या झाडांची लगवड करून त्याचा पाला आणि कोवळ्या फांद्या शेतात पसरवून नांगरणीच्या अथवा चिखलणीच्या वेळी मातीत मिसळणे होय .हिरवळीच्या खतासाठी गिरिपुष्प , शेवरी ,करंज ,सुबाभुळ ,टाकळा,कर्णिया,ऎन ,किंजळ यांची झाडे व झुडपे पडीक जमिनीत वाढ्वून त्यांच्या हिरव्या पानाण्चा व कोवळ्या फांद्याचा हिरवळीच्या खतासाठी वापर करतात .
हिरवळीचे खत तयार करण्याच्या पध्दती -
१) निरनिराळ्या हंगामातील पिकांचे हिरवळीचे खत करण्याच्या वेळी हिरवळीचे पीक फुलो-यावर आलेले असावे .ही पिके ६ ते ८ आठवड्यात फुलो-यावर येतात .ही पिके ज्या शेतात घेतली असतील त्याचे खत तयार करावे .या हिरवळीच्या पिकांची पाने बाहेरून आणतात ती जमिनीवर पसरवून नांगरामागे टाकून गाडावीत .ट्रायकोडरमा चा उपयोग केल्यास ह्या खताची प्रत वाढविता येईल .
२) नुकत्याच फूलो-यात आलेले हिरवळीच्या पिकांची जमिनीलगत कापणी करावी . कापलेले हिरवळीचे पीक शेतात लोखंडी नांगराने तास घेउन नांगराच्या प्रत्येक सरीमध्ये उपलब्ध प्रमाणात टाकावे .नंतर नागंराच्या दुस-या तासाच्या वेळी अन्यथा धानाच्या चिखलणीच्या वेळी संपूर्ण गाडले जाईल याची काळजी घ्यावी .हिरवळीचे पीक जमिनीत गाडून झाल्यावर वरुन फळी किंवा मैद फिरवावा .त्यामुळे जमिनीत गाडलेले सेंद्रिय पदार्थ पूर्णपणॆ झाकले अथवा दाबले जाऊन ते कुजण्याची क्रिया वेगाने सुरु हाते.
३) हिरवळीचे पीक कुजण्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा लागतो म्हणून सर्वसाधारणपणे हिरवळीच्या पिकांची पेरणी जून अथवा पावसाच्या सुरवातीस करुन आँगस्टमध्ये गाडणी करावी . हिरवळीचे पीक गाडण्याच्या वेळी जर पाऊस पडला नाही किंवा जमिनीलगत ओलावा कमी असेल तर पाणी द्यावे .त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया जलद होईल .
संकलन - IPM school
Share your comments