मित्रांनो एकंदरीत काय कृषी कर्ज माफी योजना याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे कृषी कर्ज मित्रांना काय फायदा होणार आहे. ही सर्व माहिती आपण या शासन निर्णय याच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
मित्रांनो आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना खरीपआणि रब्बी हंगामासाठी राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, खासगी बँकांच्या माध्यमातून या ठिकाणी पीक कर्जाचा पुरवठा केला जातो.
ज्याच्यासाठी पिक कर्ज बिनव्याजी दिली जाणार आहेत. मात्र आपण जर पाहिले तर, ज्या विहित वेळेमध्ये पिक कर्ज दिले जातात. या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना कागदपत्राची पुर्तता करता येत नाही. किंवा काय काय कागदपत्र लागणार याची माहिती नसते. किंवा या पीक कर्जासाठी लागणारे कागदपत्रे शेतकऱ्यांना गोळा करण्यासाठी विहित वेळे मध्ये ते शेतकरी गोळा करु शकत नाही.
आणि या सर्वांना आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही. आणि परिणामी नाईलाज असतो. आणि शेतकरी हे खाजगी सावकाराकडून जास्तीच्या व्याजाने कर्ज घेतात आणि मित्रांनो यासाठी या शेतकऱ्यांना कर्ज मिळावे त्यांना कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी मदत मिळावी. यासाठी ही योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता.
शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषी पिक कर्ज योजना खालील अटिशर्तीच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येते.
Share your comments