जगात असंख्य फुल आहेत पण ह्या असंख्य फुलांमध्ये कृष्णकमळ सर्वात श्रेष्ठ आणि सुंदर फुल म्हणुन ओळखले जाते. कृष्णकमळ ह्या फुलाचे वैज्ञानिक/शास्त्रीय नाव पॅसिफ्लोरा इन्कारर्नटा (Passiflora incarnata) आहे तसेच ह्या फुलाला इंग्लिश मध्ये पॅशन फ्लॉवर (Passion Flower) असे म्हटले जाते. कृष्णकमळ हे फुल राखी सारखे दिसते म्हणुन ह्याला राखी फुल असे देखील म्हटले जाते. कृष्ण कमळ हे अनेक रंगामध्ये आढळते हे प्रामुख्याने जांभळा, लाल, पांढरा अशा रंगांत आढळते. हे फुल वेलीवर्गीय गटात मुडते वेलीवर येणाऱ्या या फुलाला हिंदू धर्मात खूप महत्व आहे.
. कृष्णकमळ या फुलाच्या 500 हून अधिक प्रजाती आहेत. हे फूल खूप जसे दिसायला सुंदर आहे तसेच ह्या फुलाला धार्मिकदृष्ट्या खुप महत्व प्राप्त आहे. हिंदू वैदिक धर्मात आणि ख्रिश्चन धर्मात ह्या फुलाला अनन्यसाधारण महत्व आहे. लोक धार्मिक दृष्ट्या महत्व असल्यामुळे ह्या फुलाला आपल्या घरात लावण्यासाठी उत्सुक असतात. आपण आज ह्या लेखात कृष्णकमळ फुलाच्या लागवडीविषयी माहिती घेणार आहोत चला तर मग जाणुन कृष्णकमळ लागवडीषयी.
कृष्णकमळ आणि महाभारत संबंध…
सनातन वैदिक धर्मात कृष्णकमळचा संबंध हा महाभारताशी जोडला जातो. राखीसारख्या दिसणाऱ्या ह्या फुलात असं सांगितले जाते की महाभारताची सर्व पात्रांचा समावेश आहे. फुलांचा आकार बारकाईने पाहिला की असे आढळून येते की, बाहेरील पाकळ्या जांभळसर लाल किंवा पांढऱ्या रंगाच्या असतात ह्या पाकळ्यांची संख्या ही 100 असते ज्यांना लोक कौरव म्हणतात.
महाभारतात ज्याप्रमाणे 100 कौरवांचा उल्लेख आहे त्याचप्रमाणे ह्या पाकळ्या आहेत असे सांगितले जाते. त्या पाकळ्यावर पाच कळ्या आढळतात ज्यांना पांडव असे म्हणतात, त्यासोबतच वर आणखी पाच कळ्या असतात ज्या ब्रह्मा-विष्णू-महेश यांचे प्रतीक मानल्या जातात आणि जे मध्यभागी बसलेले आहेत त्यांना कृष्ण रूप मानले जाते. ह्या प्रमाणे ह्या कृष्णकमळ फुलांची रचना ही महाभारताशी जुळते. म्हणुन वैदिक सनातन धर्मात ह्या फुलाला एक वेगळी ओळख प्राप्त होते.
कसे लावणार कृष्णकमळ फुल
कृष्ण कमळ फुलाला घरी आपल्या अंगणात, बागेत किंवा परसदारी लावता येते. कृष्ण कमळ घरी भांड्यात लावण्यासाठी, 50 टक्के मातीत 30 टक्के शेणखत टाकावे आणि त्यात जवळपास 20 टक्के वाळू मिसळावी. वाळू मिसळ्याचे कारण असे की वाळू मुळे मातीमध्ये पाण्याचा चांगला निचरा होतो आणि शेणखताचा वापर केल्याने फुलांची चांगली वाढ होते. फुल ज्या मातीच्या भांड्यात किंवा फुलदाणीत लावायचे असेल त्या मातीच्या फुलदाणीचा भांड्याचा आकार 12 ते 20 इंच दरम्यान असावा म्हणजे कृष्ण कमळ चे रोपट्याला वाढायला चांगला वाव मिळेल पाणी टाकण्यासाठी जागा राहील आणि रोपट्याची मुळे मातीत चांगली खोलवर जातील.
तसेच , भांड्याची रुंदी आणि खोली देखील चांगली असावी. कारण कृष्ण कमळ ह्या फुलांची रोपट्याची मुळे खूप खोल पसरतात. ह्या फुलाच्या बिया लागवडिपूर्वी काही तास पाण्यात भिजवून नंतर फुलदाणीत अथवा भांड्यात लावा. हे फुल सुमारे दोन आठवड्यांत बीमधून अंकुरते आणि रोपटे वाढू लागते. जर तुम्ही कलम करून रोप लावत असाल तर कलम केलेली फांदी पावसाळ्यात लावावी असा सल्ला दिला जातो कारण पावसाळ्यात कलम केलेली फांदी लावली गेली तर ही फांदी लवकर वाढते आणि परिणामी कृष्णकमळला चांगले फुले लागतात.
Share your comments