सध्याच्या काळात शेतीमध्ये अनेक आमूलाग्र बदल होताना दिसत आहेत. शेतामध्ये उत्पन्न वाढवण्याच्या हेतूमुळे शेतकरी वर्ग शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत तसेच शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि खतांचा वापर यामुळे शेतीमधील उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढत आहे.शेतकरी वर्गाचे उत्पन्न वाढण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. खर म्हटलं तर शेतामध्ये बदल हे झालेच पाहिजेत यामध्ये खतांमधील बदल, पीक पद्धती या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत.
शेतीमधी उत्पन्न वाढवण्याचे मार्ग:-
एकच पीक सतत घेतल्यामुळे शेतामध्ये चांगले पीक येत नाही म्हणून बदल खूप आवश्यक आहे. कृषी विद्यापीठ यांनी सांगितल्याप्रमाणे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि खते वापरून उत्पन्न वाढवण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या जमिनीची सुपीकता ओळखून शेती करणे म्हणजेच नवीन तंत्रज्ञान वापरून शेती करणे होय.शेतातील उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पर्याय बळीराजाकडे आहेत ते जर आत्मसाद केले तर उत्पन्न वाढीस लागणार. शेतकरी वर्ग आपल्या जमिनीत गहू ज्वारी बाजरी मोहरी ही पिके मोठ्या प्रमाणात घेतात. त्यामुळे एकच पीक सतत घेतल्यामुळे जमिनीतील कस कमी होऊन उत्पादनात घट होते.
1) जर का तुम्ही शेतात ठिबक सिंचनाचा अवलंब केला तर तुमच्या पाण्याची बचत सुदधा होईल आणि सर्व क्षेत्र लागवडी योग्य होऊन ओलिताखाली येईल यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.
2)रेग्युलर पिकांमध्ये आंतरपीक घ्यावे. आंतरपीक पद्धती मुळे उत्पादनात वाढ होते आणि जमिनीची सुपीकता समतोल राहण्यास मदत होते.
3)अर्ध्या ते एक एकरावर क्षेत्रावर शेडनेट करून त्यामध्ये काकडी, पालक, मेथी आणि हिरव्या पालेभाज्या ची लागवड करावी तर दुस-या हंगामात टमाटर व फुलकोबी,कोबी या प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पन्न घ्यावे. यामुळे बक्कळ फायदा शेतकरी वर्गास होतो सोबत शेडनेट साठी अनुदान सुद्धा दिले जाते.
4) शेतामधील पीकपद्धती मध्ये बदल हा आवश्यक असतो. एकच पीक शेतामध्ये वारंवार घेतल्यामुळे जमिनीचा कस कमी होतो आणि जमीन नापीक बनायला सुरुवात होते. त्यामुळे ज्या त्या हंगामात जी तीच पिके घ्यावीत यामुळे उत्पन्न सुद्धा वाढते आणि जमिनीचे आरोग्य सुद्धा सुधारते.
5)शेतामध्ये कोणतेही पीक घेताना त्याबरोबरच भाजीपाला मिरची लसूण कोथिंबीर याची लागवड करावी यामुळे शेतकरी वर्गाला दुप्पट फायदा मिळतो.
6) आंतरपिक पद्धतीचा अवलंब करून एकाच वेळी आपण रानात 2 प्रकारची वेगवेगळी पिके घेऊ शकतो. यामध्ये कांदा, मका, फुलशेतीसाठी झेंडू इत्यादी प्रकारची पिके घेऊन उत्पन्न वाढवू शकतो.
7)शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणे आणि आधुनीक तंत्र प्रणालीचा वापर करणे आणि रासायनिक खतांचा वापर करून शेतीमधील उत्पन्न वाढवणे.
8)शेतकरी वर्गाने कृषीतज्ञांशी योग्य तो सल्ला घ्यावा शिवाय चांगल्या आणि उच्च दर्जाच्या बियाणांची लागवड करावी यामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा आधुनिक शेती फायदेशीर ठरत आहे. आधुनिक शेती करून शेतीमधील उत्पन्न वाढवावे.
अश्या प्रकारे नवनवीन यंत्र सामग्री आणि आधुनिक शेती करून आपण आपल्या शेतीमधील उत्पन्न वाढवून बक्कळ नफा मिळवू शकतो. आधुनिकता शेतीसाठी खूप म्हटवाची तसेच आवश्यक सुद्धा आहे.
Share your comments