मँगनीज फेरस संबंध- जास्त प्रमाणातील फेरस (लोह) मँगनीजची उपलब्धता कमी करते.
मँगनीज सिलिकॉन संबंध – सिलिकॉनच्या वापराने मँगनीजची विषबाधा कमी करता येते.
नत्राच्या कमतरतेमुळे मँगनीजची उपलब्धता कमी होते.
मँगनीज चे विविध स्रोत
प्रकार मँगनीजचे प्रमाण
मँगनीज सल्फेट 23-28%
मँगनीज ऑक्साईड 41-68%
चिलेटेड मँगनीज
कार्य
प्रकाशसंश्लेषण, श्वासोच्छवास, आणि नायट्रोजन योग्य पद्धतीने ग्रहण करणे यासारख्या विविध कार्य साठि वंनस्पतींमधे मॅगनीजचा वापर होतो.
मॅगनीज मुळे पराग उगवण , परागनलिकामद्धे वाढ होते आणि रोगजनकांच्या प्रतिकारशक्ति मध्ये वाढ होते. मॅगनीज च्या कमतरते मुळे पिकांची वाढ खुंटते आणि पीक आहे त्याच स्थितिमध्ये राहतात.
पिकात रायबोफ्लॅवीन, अस्कॉर्बीक अँसिड आणि कॅरोटेन (व्हीटामीन बी, सी, व ए) च्या निर्मितीसाठी गरजेचे आहे.
प्रकाश संश्लेषण क्रियेत पाण्याचे विघटन होवुन त्यापासुन हायड्रोजन व ऑक्सिजन वेगळा होतो त्या हिल्स रिअँक्शन मधे गरजेचे आहे.
जास्त सामु असलेल्या जमिनीत मँगनीज ची कमतरता निर्माण होते.
इथर सुक्ष्म अन्नद्रव्यांप्रमाणे मँगनीज देखिल सेंद्रिय पदार्थांव्दारा चिलेट केले जाते ज्यामुळे पिकांस उपलब्धता वाढते.
ज्या जमिनीत जास्त प्रमाणात फेरस आहे किंवा फेरस खत दिल्यानंतर मँगनीज ची कमतरता जाणवते.
मँगनीज पिकात वहनशील नसल्या कारणाने त्याची कमतरता हि नविन पानांवर प्रथम दिसुन येते. पानांच्या शिरांमधिल भाग पिवळसर होतो. कधी कधी पानांवर तपकिरी काळसर रंगाचे चट्टे पडतात.
एक एकर क्षेत्रात जमिनीतुन देण्यासाठी मँगनीज ची शिफारस हि 450 ग्रॅम ते 2.25 किलो इतकी केली जाते.
मँगनीज जमिनीवर पसरवुन न टाकता ते जमिनीत गाडुन मुळांच्या जवळ द्यावे.
Share your comments