1. कृषीपीडिया

जाणून घ्या फुलं रंगीबेरंगी का असतात ?

अनेक झाडांची फुलं तर्‍हेतर्‍हेचे मनोहारी रंग धारण करतात. ते रंग बघायलाही आपल्याला आवडतं. अशा रंगेबिरंगी फुलांनी नटलेली आपली बाग सुंदर दिसते. कित्येक फुलांना अतिशय चांगला सुगंधही असतो.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
जाणून घ्या फुलं रंगीबेरंगी का असतात ?

जाणून घ्या फुलं रंगीबेरंगी का असतात ?

तोही आपला आनंद द्विगुणित करतो. तरीही आपल्या आनंदासाठी फुलांना रंग आणि सुगंध असतो, असं आपल्याला म्हणता येईल का? कारण जिथं मानववस्ती नाही अशा ठिकाणच्या झाडांनाही रंगेबेरंगी व सुगंधी फुलं असतात. रानावनात वाढणाऱ्या झाडांची शोभाही अशा फुलांनी बहरून येते. याचा अर्थ निसर्गानं दुसऱ्याच कोणत्या तरी कारणांसाठी रंग आणि गंध बहाल केला असणार ती कारणं समजून घेण्यासाठी फुलांचं मुख्य निसर्गदत्त काम काय असतं, याचा विचार करायला हवा. प्रत्येक सजीवाच्या अंगी आपलं पुनरुत्पादन करण्याची यंत्रणा असते. पुनरुत्पादनाशिवाय तो सजीव तगून राहू शकत नाही एवढेच काय पण पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेशिवाय नवनव्या प्रजातींचा उगमही अशक्य झाला असता. त्यामुळे प्रत्येक सजीव पुनरुत्पादनाला अतिशय महत्त्व देतो. वनस्पतींच्या पुनरुत्पादनात फुलं कळीची भूमिका बजावतात.

फुलांच्या अंतर्गत रचनेकडे लक्ष दिल्यास त्यातील दोन अवयव आपलं लक्ष वेधून घेतात स्टॅमेन किंवा पुबीजांडातून पुंकेसर बाहेर पडतात, 

 ते पिस्टिल किंवा स्त्रीबीजांडातील स्त्रीकेसरांवर पडले की त्यांच्या समागमातून पुढील पिढीची नांदी म्हटली जाते. पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांचं मिलन होणं त्या वनस्पतीच्या पुनरुत्पादनासाठी आवश्यक असतं कित्येक फुलांमध्ये हे मीलन स्वयंपूर्णरित्या होत असलं, तरी बहुतांश वनस्पतींच्या फुलांमध्ये या प्रक्रियेसाठी दुसर्‍या कोणीतरी मध्यस्थाच्या मदतीची आवश्यकता भासते. वारा ही कामगिरी पार पाडत असला तरी तो पूर्णांशाने हे काम करू शकत नाही त्यासाठी मग पक्षी किंवा मधमाश्यांसारख्या कीटकांची गरज भासते. ते काम करावं म्हणून मग पक्षी आणि मधमाशा यांना उद्युक्त करणं जरुरीचं असतं त्यांना काहीतरी मधाचं बोट लावल्याशिवाय ते तरी या कामगिरीसाठी का तयार व्हावेत? मधमाशांना तर अक्षरश: मधाचं बोट लावलं जातं. 

फुलांमध्ये असलेला मधुरस शोषून घेऊन मधमाशा त्याचं मधात रूपांतर करतात तरीही आपल्याकडे अशा मधुरसाचे कोण आहेत, हे मधमाश्यांना कळावं कसं?त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी मग ही फुलं रंगीबेरंगी परिवेष धारण करतात.

त्यातही मध्यस्थ कोण आहे यावर फुलांचा रंग निर्धारित केला जातो. मधमाशांना निळा रंग आवडतो, तर हमिंगबर्डसारख्या पक्ष्यांना लाल, गुलाबी किंवा जांभळ्या रंगांचं आकर्षण असतं. फुलपाखरं पिवळ्या, नारिंगी रंगांकडे ओढली जातात. काही फुलं दिवसाउजेडी फुलत असली तरी काही सूर्यास्तानंतरच फुलतात. त्यावेळी मग त्यांचा रंग पक्षांना वा कीटकांना दिसावा कसा? त्यासाठी मग रंगांशिवाय या फुलांना सुगंधही दिला जातो. 

त्याच्या दरवळापायी मग हे फलनाला मदत करणारे मध्यस्थ त्याच्याकडे खेचून आणले जातात. त्यांना मधुरस मिळता मिळता त्यांच्याकडून पुंकेसराचा शिडकावा स्त्रीकेसरांवर होतो. पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेला चालना मिळते.

 

प्रसारक : दिपक तरवडे

संकलन : प्रविण सरवदे, कराड

English Summary: Know about flower why colourfull Published on: 26 December 2021, 06:59 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters