1. कृषीपीडिया

जाणून घेऊयात अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेती व प्रकार

भारत हा कृषीप्रधान देश आहे.आपल्याकडे शेती ही पूर्वापार चालत आलेल्यापरंपरागत पद्धतीनेच केली जात होती.परंतु हरित क्रांतीचे वेध लागल्यानंतर शेतीमध्ये तंत्रज्ञानाचे वारे वाहू लागले व कालांतराने शेतीच्या विविध भागात चांगल्या प्रकारचे संशोधन होऊन तंत्रज्ञानाने शिरकाव केला.आता शेतीमधील तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, संपूर्ण शेती डिजिटल होत चालली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.उच्च तंत्रज्ञान युक्तर शेतीमध्ये शेतीमध्येआधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे हे होय. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी वर चांगल्या पद्धतीने मात करता येते. नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आपल्याला नवे शिकण्याची तयारी आणि भांडवली तेवढेच गरजेचे असते. यातून कृषी उत्पादन आणि त्याचा दर्जा सुधारण्यास मदत होते.या लेखात आपण काही उच्च तंत्रज्ञान युक्तं शेतीचे काही मार्ग किंवा प्रकार यांचा अभ्यास करणार आहोत.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
aeroponics farming

aeroponics farming

भारत हा कृषीप्रधान देश आहे.आपल्याकडे शेती ही पूर्वापार चालत आलेल्यापरंपरागत पद्धतीनेच केली जात होती.परंतु हरित क्रांतीचे वेध  लागल्यानंतर शेतीमध्ये तंत्रज्ञानाचे वारे वाहू लागले व कालांतराने शेतीच्या विविध भागात चांगल्या प्रकारचे संशोधन होऊन तंत्रज्ञानाने शिरकाव केला.आता शेतीमधील तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, संपूर्ण शेती डिजिटल होत चालली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.उच्च तंत्रज्ञान युक्‍त शेतीमध्ये शेतीमध्येआधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे हे होय. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी वर चांगल्या पद्धतीने मात करता येते. नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आपल्याला नवे शिकण्याची तयारी आणि भांडवली तेवढेच गरजेचे असते. यातून कृषी उत्पादन आणि त्याचा दर्जा सुधारण्यास मदत होते.या लेखात आपण काही उच्च तंत्रज्ञान युक्‍त शेतीचे काही मार्ग  किंवा प्रकार यांचा अभ्यास करणार आहोत.

  • एक्वापोनिक्स सोलर ग्रीन हाऊस –

आपल्याकडे आता संरक्षित शेतीसाठी पॉलिहाऊस किंवा शेडनेटचा वापर केला जातो. या प्रकारामध्ये छतावर काही प्रमाणात सौर आणि फोटोव्होल्टाइक प्रणाली सेट केली तर पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असणारी ऊर्जा त्यातून मिळू शकते. तसेच यामध्ये असलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये माशांची वाढ करता येते व या माशांची विष्ठा पिकांसाठी खत म्हणून उपयोगी ठरते. तसेच या प्रणालीत पाण्याचा पुनर्वापर होत असल्याने पाण्याची  मोठी बचत होते.

  या प्रणालीचे फायदे

  • या प्रणालीमध्ये उत्पादनाच्या गुणवत्तेमध्ये वाढ होते.
  • पाण्यामध्ये लक्षणीय बचत होते.
  • या मध्ये वर्षभर पिकांचे उत्पादन घेता येते.
  • विविध हंगामी  पिके आणि बिगर हंगामी पिके घेता येत असल्याने उत्पादनात वाढ होते.

 

  • हायड्रोपोनिक्स:

यामध्ये वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असणारे मुळे, पाणी, वनस्पतींना आवश्यक पोषक तत्वे आणि ऑक्सिजन दरम्यान अस्तित्वात असलेले अडथळे दूर केले जातात. या प्रणालीत वॉटर सोल्युबल पोषक खनिजे द्रावण स्वरूपात वापरून मातीशिवाय वनस्पती वाढण्याची ही एक पद्धत आहे. या प्रणालीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पाण्यात विरघळणारे म्हणजेच विद्राव्य खतांचा वापर केला जातो. या तंत्राने सध्या विविध भाज्यांचे उत्पादन जगभरामध्ये घेतले जात आहे.

 हायड्रोपोनिक्स प्रणालीचे फायदे

  • या प्रणालीत पाण्याचा 90 टक्के पेक्षा जास्त कार्यक्षम पद्धतीने वापर करता येतो.
  • उत्पादना  मध्ये तीन ते दहा पट वाढ होते.
  • या तंत्रात कमी जागा लागत असल्याने शहरी भागात देखील भाजीपाल्याचे उत्पादन शक्य झाले आहे. यामध्ये कापणी आणि विक्री यातील कालावधी कमीत कमी ठेवता येतो. अंतिम उत्पादनाचे पौष्टिक मूल्य  टिकून राहते.
  • हवामान आणि मातीची परिस्थिती अनुकूल असलेल्या ठिकाणीही या तंत्राद्वारे शेती करता येते.
  • यामध्ये तरुण आणि किडीचे समस्या उद्भवत नाही.
  • एरोपोनिक्स शेती:

मुलांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे आद्रता, ओलावा लागणाऱ्या गोष्टी या तंत्रज्ञानात हवेद्वारे पुरविले जातात. पिकांना लागणारे पोषक घटक हे मुळावर फवारणीद्वारे उपलब्ध केली जातात.

 

 एरोपोनिक शेतीचे फायदे

  • या तंत्रात कमी ऊर्जा आणि कमी पाणी लागते.
  • या तंत्रात वातावरणातील आद्रता युक्त हवा रोपांच्या वाढीसाठी वापरले जाते. त्यामुळे माती द्वारा पसरणाऱ्या  रोगांचा प्रादुर्भाव या तंत्रात पिकांवर होत नाही.
  • या प्रणालीत वनस्पती मुळांना वाढीसाठी पुरेसा ऑक्सिजन मिळतो.त्यामुळे झाडाच्या रोगमुक्त व वेगवान वाढीस प्रोत्साहन मिळते. या प्रणालीचे सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे या प्रणालीत हवेतील धुक्याचा व आद्रतेचे चा उपयोग वनस्पतीच्या मुळांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी होतो.
  • व्हर्टिकल फार्मिंग:

या प्रणाली मध्ये मजल्यासारखे उभ्या रचलेल्या  थरांमध्ये पिके घेतली जातात. या प्रणालीत हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक आणि एक्वापोनिक्स या प्रणाली पैकी योग्य त्या मातीविरहित माध्यमांचा वापर केला जातो. कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पादन घेण्यासाठी तापमान, आद्रता आणि पोषण नियंत्रित वातावरण बंदिस्त ठिकाणी तयार केले जाते. यामध्ये प्रत्येक मजल्यावर सूर्यप्रकाश पोहोचेल अशा पद्धतीने रचना केली जाते. याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रणालीत कृत्रिम पद्धतीने प्रकाश व्यवस्था केली जाऊ शकते.

 

 या प्रणालीचे फायदे

  • शेतीचे क्षेत्र मर्यादित असल्यामुळे भविष्यातील अन्नधान्याची मागणी पूर्ण करण्यासाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरणार आहे
  • यामध्ये वर्षभर पिकांची वाढ शक्‍य होते.
  • पाण्यात लक्षणे बचत करता येते.
English Summary: kind of modern technology farming Published on: 15 July 2021, 02:19 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters