1. कृषीपीडिया

जाणून घ्या खरीप ज्वारी लागवड आणि व्यवस्थापन

आपल्या भारतामध्ये ज्वारी हे पीक खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाते. भारतामध्ये ज्वारीच्या संशोधनासाठी विविध कृषी विद्यापीठांमधून 9 केंद्राबरोबरच भारतीय कृषी संशोधन परिषदेची ज्वारी संशोधन संस्था हैदराबाद व आंतरराष्ट्रीय संस्था इक्रिसॅट हैदराबाद यासुद्धा कार्यरत आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर ज्वारीची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. या लेखात आपण खरिपातील ज्वारी लागवड आणि व्यवस्थापन याविषयी माहिती घेऊ.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
jwaari

jwaari

आपल्या भारतामध्ये ज्वारी हे पीक खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाते. भारतामध्ये ज्वारीच्या संशोधनासाठी विविध कृषी विद्यापीठांमधून 9 केंद्राबरोबरच भारतीय कृषी संशोधन परिषदेची ज्वारी संशोधन संस्था हैदराबाद व आंतरराष्ट्रीय संस्था इक्रिसॅट हैदराबाद यासुद्धा कार्यरत आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर ज्वारीची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. या लेखात आपण खरिपातील ज्वारी लागवड आणि व्यवस्थापन याविषयी माहिती घेऊ.

 ज्वारी लागवड तंत्रज्ञान

  • हवामान आणि जमीन:

ज्वारी हे पीक पावसाचा ताण सहन करणारे असून हे सरासरी 500 ते 900 मी पावसाच्या भागात घेतली जात. पोटरी अवस्था ते पोटरीतून कनिस बाहेर पडेपर्यंतचा काळ पावसाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा असतो. याउलट जेव्हा दाणे पक्व होतात त्या अवस्थेत पावसाचे प्रमाण हे कमी असले तर फायदेशीर असते. जर जास्त पाऊस झाला तर दाणे काळे पडतात. त्यामुळे ज्वारी पिकाची काढणी ही योग्य वेळेत व्हायला हवी त्यामुळे बुरशी विरोधी जातींची निवड करणे चांगले असते. जर जमिनीचा विचार केला तर ज्वारी पिकास मध्यम ते भारी व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन चांगली असते. जमिनीचा सामू हा साडेसहा ते आठ पर्यंत असावा.

  • पूर्वमशागत:

उन्हाळ्यामध्ये येताना गरमी करून दोन-तीन उभ्या-आडव्या वखराच्या पाळ्या कराव्यात. वखराच्या शेवटची पाळी जवा द्याल तेव्हा 12 ते 15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत व्यवस्थितरीत्या मिसळून घ्यावे.

  • पेरणीचा कालावधी:

मोसमी पाऊस झाल्याबरोबर वाफसा येताच पेरणी करावी.जूनच्या तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात पेरणी करावी. उशिरा पेरणी केल्यासखोडमाशीचा प्रादुर्भाव होऊन ताटांची संख्या घटते. उशिरा पेरणी करताना खोडमाशी नियंत्रणासाठी थायमेथॉक्झाम या किटकनाशकांची तीन ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

  • बियाणे व पेरणी:

ज्वारीची पेरणी करताना ते दोन चाड्याच्या पाभरीने करावी. हेक्‍टरी साडेसात किलो संकरित अर्धा किलो सुधारित वाणाचे बियाणे पुरेसे होते. पेरणी करताना बियाणे हे मोहर बंद व प्रमाणित आहे का याची काळजी घ्यावी. जर शेतकरी स्वतःचे बियाणे वापरणार असतील तर त्यांनी बेण्याची निवड करून थायरम ची प्रक्रिया तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात करावी. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर 45 सेंटिमीटर ठेवून दोन रोपांतील अंतर 15 सेंटिमीटर ठेवावे. दर हेक्टरी एक लाख ते 80 हजारापर्यंत रोपांची संख्या ठेवावी.

  • रासायनिक खतांचा वापर:

खरीप ज्वारी दहा ते बारा गाड्या शेणखत त्यासोबतच 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश प्रतिहेक्‍टरी वापर करावा. पेरणी करताना  अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश जमिनीत खोल पेरावे. शक्यतो पहिली मात्रा संयुक्त अथवा मिश्र खतातून द्यावी उरलेल्या नत्राची अर्धी मात्रा ही पेरणी केल्यानंतर 30 दिवसांनी दिली तर फायद्याचे ठरते.

  • आंतर मशागत:

खरीप हंगामात तणाचा प्रादुर्भाव जास्त असतो. ज्वारीची पेरणी झाल्यानंतर 40 ते 45 दिवसा पूर्वी दोन खुरपण्या व दोन कोळपण्या कराव्यात. ऍट्राझीन हे तणनाशक हेक्टरी एक किलो प्रति 1000 लिटर पाण्यात मिसळून पेरणी नंतर बियाणे उगवण्यापूर्वी जमिनीवर फवारणी करावी.

 

  • पाण्याचे व्यवस्थापन:

खरीप हंगामात ज्वारीला पाणी देण्याची गरज भासत नाही. पण पावसाळ्यात जर पाण्याचा ताण पडला तर एक दोन संरक्षित पाणी देणे आवश्यक असते.

  • ज्वारीची कापणी व मळणी:

कनसाचा दांडा पिवळा झाला व आतल्या भागातील पाणी टणक झाले म्हणजे ज्वारीचे पीक शारीरिक दृष्ट्या पक्व झाली असे समजावे. अशा वेळेस दाण्यामध्ये सर्वसाधारणपणे 25 ते 30 टक्के ओलाव्याचे प्रमाण असावे. ज्वारी पिकाची शारीरिक पक्वता अवस्थेत कापणी केल्यास उत्पादनात घट न होता बुरशी रोगापासून बचाव होतो. ज्वारीची साठवणूक करताना धान्य चांगले राहण्यासाठी धान्यात ओलाव्याचे प्रमाण नऊ ते दहा टक्के असावे. त्यानंतर मळणी करून धान्य उन्हामध्ये वाळवून मग साठवण करावी.

  • खरिपातील महत्त्वपूर्ण ज्वारी चे वाण:

पी व्ही के 801, पी व्ही के 809, सी एस एच 14, सी एस एच 16, सी एस एच 25, एस पी एच 1635 इत्यादी.

English Summary: kharip jwaar cultivation and mangement Published on: 25 July 2021, 02:37 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters