, भारत स्वतंत्रता चळवळीत महात्मा गांधजींच्या अहिंसेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनाला सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान, जालियनवाला बाग सह ,झांसी राणी लक्ष्मीबाई यांचा तैनाती फौज व दत्तक वारसा हक्कासाठी लढा, टिपू सुलतान पासुन लाल, बाल, पाल, राजगुरू, सुखदेव, भगतसिंह, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेना सह लाखो स्वतंत्र सेनानिंच्या सशस्त्र कारवाया त्यांचे बलिदान इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी सार्थक ठरल्या. अखंड भारतातील भारतीयांना आपल्या विचाराने प्रभावित करुन अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी केलेला संघर्ष आज प्रेरणा दायी ठरत आहे,
केंद्र सरकार कडून पारित केलेले तीन कृषी अध्यादेश हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून व्यापारी हिताचे असल्याने भविष्यात शेतकरी व शेती हे व्यापाऱ्याच्या पाशात जाण्याची भिती वाटत असल्याचे राकेश टिकैत यांनी आपल्या वडीला प्रमाणे लाखो शेतकऱ्यांच्या सहकार्याने तीन कृषी अध्यादेश रद्द करण्यासाठी आंदोलन उभारले,
७डिसेंबर २०२० पासुन आज पर्यंत सुरु असलेल्या या आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला, त्यातच राजकिय डोमकावळ्यांनी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांना खलिस्तानी, देशद्रोही, आंदोलनजीवी, सारखे शब्द वापरून आंदोलन मीडिया काढण्याचा खूप प्रयत्न केला, सतत दहा महिन्यापासून अहिंसेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलन हे दुर्लक्षित असातांना आगामी निवडणुका व शेतकऱ्यांचा सरकार प्रती रोष पाहता माननिय पंतप्रधान नरेंद मोदी साहेब यांनी तिन्ही कृषीअध्यादेश रद्द करण्याचा निर्णय घेतला असून शेतकरी आंदोलकांना झालेल्या त्रासाबद्दल जाहीर माफी मागितली शेतकरी आंदोलनाला आलेले यश हे कोण्या एकाचे नसून गेल्या दहा महिन्यात ऊन वारा पाऊस , कडाक्याची थंडी, लाठी चार्ज, पाण्याचे फवारे, सहन करीत आंदोलनाची मशाल तेवत ठेवणाऱ्या प्रत्येक आंदोलक शेतकऱ्याचे यश आहे या आंदोलनाला शेतकरी नेते महेंद्र सिंग टीकेत यांचे पुत्र राकेश टीकैत व ईतर शेतकरी नेत्यांचे खंबीर नेत्रुत्व, शेतकऱ्याप्रती एकनिष्टता, आपल्या ध्येय उद्दिष्ठ वर ठाम निर्णय घेण्याची क्षमता, राजकिय आमिष पासुन कोसो दूर राहिल्याने अहिंसेच्या मार्गाने केलेल्या या आंदोलनाला यश मिळाले,
राकेश टीकेत यांनी शेतकऱ्यांना संघटित करुन उभारलेल्या आंदोलनाला गलिच्छ राजकारणापासून दुर ठेवत त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांची तमा न बाळगता कोणत्याही अमिषाला बळी न पडता तटस्थ राहून अहिंसेच्या मार्गाने शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या आंदोलनाला शेवट पर्यंत टिकवुन ठेवले शेतकऱ्यांच्या एकजुटीने आंदोलनाला यश मिळाले व सरकारला तिन्ही कृषी अध्यादेश रद्द करावे लागले.
आज महाराष्ट्रातील शेतकरी देशोधडीला लागला आहे स्वार्थासाठी विखुरलेल्या शेतकरी संघटना सत्तेच्या लालसेपोटी बलाढ्य पक्षांच्या वळचणीला जाऊन बसतात व शेतकऱ्यांची मते विकून अच्छे दीन चे स्वप्न दाखवत असतात, शेतकरी न्याय हक्कासाठी लढणाऱ्या संघटना महाराष्ट्रात दगडाखाली मिळतील परंतू स्वर्गीय युगात्मा शरद जोशी साहेबांच्या विचारांशी व आदर्षावर चालणारे आता दुर्मिळ झाले,
उच्च शिक्षित भारतीय टपाल सेवेत क्लास वन अधिकारी असलेले स्व शरद जोशी यांचे खुल्या अर्थव्यवस्थेचे हिरिरीचे समर्थन अन्य किसाननेत्यांना अजिबात पसंत नव्हते. बहुसंख्य किसान नेते हे डाव्या विचारसरणीचे होते; त्यांचा अमेरिकेला व मुक्त अर्थव्यवस्थेला कायम विरोध असायचा आणि सरकारी नियंत्रणे व समाजवाद यांना कायम पाठिंबा. अत्याधुनिक तंत्रज्ञानही त्यांना नको होते. त्यांच्यातील अनेकांना नैसर्गिक शेती, फक्त स्थानिक बियाणांचा वापर, सर्व शेतीमालाचा व्यापार सरकारनेच ताब्यात घेणे अशा गोष्टींचे आकर्षण होते. जोशींची भूमिका ही नेमकी उलट होती. शेतकरी संघटना हा जोशींच्या व्यक्तित्वाचाच जणू वाढीव भाग (एक्स्टेन्शन) होता. भूपिंदर सिंग मान यांच्यासारखे अपवाद वगळता, इतर सर्व किसान नेत्यांचा भर शेतकऱ्याला आपल्या शेतीमालाची वाढीव किंमत मिळण्यापेक्षा खते, बियाणे, कीटकनाशके, डिझेल, वीज इत्यादी गोष्टींची किंमत कमी करण्यावर होता. पण तसे करण्यासाठी सरकारी सबसिडीशिवाय पर्याय नव्हता व कुठल्याही सबसिडीला जोशी अनुकूल नव्हते. शेतीमालाला वाजवी भाव हेच त्यांच्या मते एकमेव उत्तर होते.
जगातील आर्थिक दुरवस्थेचे अचूक निदान करून त्यावर उपचार सुचविणारा विचार म्हणून शरद जोशींचा विचार व त्याच्या मान्यतेसाठी त्यांनी सुरू केलेल्या शेतकरी चळवळीचा अभ्यास करण्यासाठी, अनेक विदेशी विद्यापीठांतील संशोधकांनी भारतात धाव घेतली. त्यांना शरद जोशींनी मार्गदर्शन केले.
अश्या महान शेतकरी नेत्याच्या संघटनेतून वेगळ्या चुली मांडून संघटनेचा बाजार मांडणाऱ्या
महाराष्ट्रतील शेतकरी नेत्यांना आज राकेश टीकेत यांच्या शेतकरी संघटित करण्याच्या कलेची व स्वर्गीय शरद जोशी यांच्या विचारांची खरी गरज.
Share your comments