बटाटा पिकावर सगळ्यात महत्वाचे दोन रोग म्हणजे करपा रोग होय.या करपा रोगा मध्ये दोन प्रकार येतात.एक म्हणजे उशिरा येणारा करपाआणि दुसरा म्हणजे लवकर येणारा करपा. या लेखामध्ये आपण या रोगाविषयी माहिती व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे ते जाणून घेऊ.
- उशिरा येणारा करपा: बटाटा पिकात उशिरा येणारा करपा हा रोग फायटोप्थोराइन्फेस्टेन्सनावाच्या बुरशीमुळे होतो.या रोगाच्या प्रादुर्भावामुळे बटाटा पिकात पानावर पाणथळ फिकट तपकिरी गोलाकार ठीपके दिसून येतात. ढगाळ व पावसाळी थंड वातावरणात या रोगाचे प्रमाण जास्त वाढतेआणि पाने करपून गळतात. ढगाळ हवामानात सर्वप्रथम पानाच्या खालच्या बाजूस बुरशीची पांढरट वाढ झालेली दिसून येते. बटाट्यावर सुद्धा हा रोग होऊन बटाटे तपकिरी जांभळट रंगाचे होतात. त्यामुळे बटाटे मलूल होऊन काढणीपूर्वी कुजतात. या रोगाची बुरशी म्हणजे रोगग्रस्त बटाटे जमिनीत सुप्तावस्थेत राहतेआणि यानंतर पाऊस वारा आणि पाण्याद्वारे या रोगाचा प्रसार होतो.
- लवकर येणारा करपा- बटाटा पिकात लवकर येणारा करपा हा रोग अल्टरनेरिया सोलेनी या बुरशीमुळे होतो.बटाटा पिकात लवकर येणारा करपा या रोगाच्या बुरशीमुळे पानावर गोलाकारतपकिरी काळसर रंगाचे वलयांकित ठिपके दिसतात.रोगाचे प्रमाण जास्त असल्यास पाने करपून गळतात.बटाटे तपकिरी काळे पडून कुजतात. या रोगाचा प्रादुर्भाव झालेले बटाटे साठवणुकीत सडतात.या रोगाच्या प्रादुर्भावामुळे बटाट्याच्या उत्पादनात घट येते.
अशा पद्धतीने करा करपा रोगासाठी एकात्मिक व्यवस्थापन
1-बटाटा पिकानंतर टोमॅटो आणिटोमॅटो पिकानंतर बटाटा पीक घेणे टाळावे.
- लागवडीसाठी रोगमुक्त बियाण्याचा म्हणजे रोगमुक्त बटाट्याचा वापर करावा.
- लागवड करताना तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रोग प्रतिकारक जातींचा वापर करावा.
- पीक तणविरहित ठेवावे.
- बटाटा वरील करपा या रोगाच्या व्यवस्थापनासाठी या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच योग्य निदान करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खालील पैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची निर्देशित प्रमाणातफवारणी करावी.आवश्यकतेनुसार पुन्हा एकदा बुरशीनाशक बदलून पंधरा दिवसांनी फवारणी करावी.
- क्लोरोथलोनील 75 टक्के WP 25 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी किंवाप्रोबिन्याब70 टक्के WP30 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी किंवा मॅन्कोझेब 75 टक्के WP 25 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी किंवा मेटलॅक्सिल8 टक्के+ मॅन्कोझेब 64 टक्के WP संयुक्त बुरशीनाशक 25 ते 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी फवारावे.
- वरील फवारणी करताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
Share your comments