झाडांची रोगप्रतिकारशक्ती कमी करतो करपा रोग; चांगल्या उत्पादनासाठी ठेवा अशी निगा

27 May 2020 06:02 PM By: Bapu Natha Gaikwad


टोमॅटोचे या पिकाच्या उत्पादनातून शेतकरी मोठ्या प्रमाणात नफा मिळवतात. पण बागेची निगा व्यवस्थीत ठेवावी लागते. यात जर थोडी चूक झाली तर टोमॅटोचे पीक हे लवकरच वेगवेगळ्या रोगांना बळी पडत असते. टोमॉटोवर अनेक आजार येत असतात, यात प्रामुख्याने करप्या हा रोग झाडावर येत असतो. या रोगावर वेळेत नियंत्रण मिळवण्यात अपयश आले तर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हानी होते असे निदर्शनास आलेली आहे. आज आम्ही तुम्हाला याच रोगाविषयी माहिती सांगणार आहोत.

करप्या हा रोग जिवाणूंमुळे होणारा रोग आहे. या रोगाचे जिवाणू सर्वप्रथम झाडाच्या पानांवर आक्रमण करतात. तसेच  हिरव्या फळांवरही याचे ठिपके दिसून येतात. पानावर असलेले ठिपके हे बारीक व तपकिरी रंगाचे असतात. या ठिपक्यांच्या भोवती पिवळ्या रंगाचे वलय असते. तसेच फळावर काळया रंगाचे ठिपके असलेले दिसून येतात. जर हा रोग नियंत्रणात आला नाही तर झाडाची पाने गळून पडतात. त्यामुळे झाडावर व फळांवर मोठा परिणाम होतो. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बुरशीनाशकांची फवारणी करतात. परंतु हा रोग बुरशीजन्य नसल्याने यावर सकारात्मक परिणाम होत नाही. त्यामुळे या रोगाला नियंत्रित करण्यासाठी विषाणु नाशकांची फवारणी आवश्यक आहे.

 


करपा रोगाचा प्रसार कसा होतो

हा रोग प्रामुख्याने हवेत असलेली आद्रता सततचा पाऊस किंवा झाडाच्या पानांवर साठलेले दवबिंदू अशी परिस्थिती या रोगाच्या प्रसाराचा सकारात्मक ठरते. तसेच सतत एकाच जमिनीत टोमॅटो लागवड केली तर मातीत मिसळलेले जिवाणू नष्ट न होता पुन्हा पिकावर आक्रमण करतात. तसेच ज्या पानाला हा रोग झाला आहे त्या पानावर  पावसाचे थेंब पडून पुन्हा दुसऱ्या पानावर आदळतात त्यामुळे या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो.

करपा रोगाचे नियंत्रण

या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी पिकांचे फेरबदल करणे. त्यामुळे हा रोग नष्ट होऊ शकतो. तसेच ज्या जमिनीत पीक घेत आहोत त्या जमिनीतील तनाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. तसेच या रोगाला नियंत्रित करण्यासाठी झाडांची रोगप्रतीकारकशक्ती वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी सल्यीसानिक अॅसिड व एसिड ऑफ बेंजोलमिन याद्वारे झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकता. तसेच सुडोमोणास फ्लुरो सेन्स व बसिलस सबटिलस हे 5 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करू शकता. तसेच स्त्रेपटो सायकलीन ०.५ आणि कॉपर ऑक्सिकलोराईड २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून याची फवारणी करावी. तसेच रोग नियंत्रणात आला नाही तर ७-१० दिवसांनी पुन्हा फवारणी करावी यामुळे रोग नियंत्रणात येऊन शेतकऱ्याची आर्थिक हानी होणार नाही.

Disease tomato plant immunity power tomato tomato plant टोमॉटोवरील करपा रोग टोमॉटोमधील immunity power करपा रोग karpa disease
English Summary: karpa disease decreased the tomato plant immunity power

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय








CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.