टोमॅटोचे या पिकाच्या उत्पादनातून शेतकरी मोठ्या प्रमाणात नफा मिळवतात. पण बागेची निगा व्यवस्थीत ठेवावी लागते. यात जर थोडी चूक झाली तर टोमॅटोचे पीक हे लवकरच वेगवेगळ्या रोगांना बळी पडत असते. टोमॉटोवर अनेक आजार येत असतात, यात प्रामुख्याने करप्या हा रोग झाडावर येत असतो. या रोगावर वेळेत नियंत्रण मिळवण्यात अपयश आले तर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हानी होते असे निदर्शनास आलेली आहे. आज आम्ही तुम्हाला याच रोगाविषयी माहिती सांगणार आहोत.
करप्या हा रोग जिवाणूंमुळे होणारा रोग आहे. या रोगाचे जिवाणू सर्वप्रथम झाडाच्या पानांवर आक्रमण करतात. तसेच हिरव्या फळांवरही याचे ठिपके दिसून येतात. पानावर असलेले ठिपके हे बारीक व तपकिरी रंगाचे असतात. या ठिपक्यांच्या भोवती पिवळ्या रंगाचे वलय असते. तसेच फळावर काळया रंगाचे ठिपके असलेले दिसून येतात. जर हा रोग नियंत्रणात आला नाही तर झाडाची पाने गळून पडतात. त्यामुळे झाडावर व फळांवर मोठा परिणाम होतो. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बुरशीनाशकांची फवारणी करतात. परंतु हा रोग बुरशीजन्य नसल्याने यावर सकारात्मक परिणाम होत नाही. त्यामुळे या रोगाला नियंत्रित करण्यासाठी विषाणु नाशकांची फवारणी आवश्यक आहे.
करपा रोगाचा प्रसार कसा होतो
हा रोग प्रामुख्याने हवेत असलेली आद्रता सततचा पाऊस किंवा झाडाच्या पानांवर साठलेले दवबिंदू अशी परिस्थिती या रोगाच्या प्रसाराचा सकारात्मक ठरते. तसेच सतत एकाच जमिनीत टोमॅटो लागवड केली तर मातीत मिसळलेले जिवाणू नष्ट न होता पुन्हा पिकावर आक्रमण करतात. तसेच ज्या पानाला हा रोग झाला आहे त्या पानावर पावसाचे थेंब पडून पुन्हा दुसऱ्या पानावर आदळतात त्यामुळे या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो.
करपा रोगाचे नियंत्रण
या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी पिकांचे फेरबदल करणे. त्यामुळे हा रोग नष्ट होऊ शकतो. तसेच ज्या जमिनीत पीक घेत आहोत त्या जमिनीतील तनाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. तसेच या रोगाला नियंत्रित करण्यासाठी झाडांची रोगप्रतीकारकशक्ती वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी सल्यीसानिक अॅसिड व एसिड ऑफ बेंजोलमिन याद्वारे झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकता. तसेच सुडोमोणास फ्लुरो सेन्स व बसिलस सबटिलस हे 5 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करू शकता. तसेच स्त्रेपटो सायकलीन ०.५ आणि कॉपर ऑक्सिकलोराईड २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून याची फवारणी करावी. तसेच रोग नियंत्रणात आला नाही तर ७-१० दिवसांनी पुन्हा फवारणी करावी यामुळे रोग नियंत्रणात येऊन शेतकऱ्याची आर्थिक हानी होणार नाही.
Share your comments