कामगंध सापळ्याची कीड व्यवस्थापनात आहे महत्त्वाची भूमिका

फेरोमोन

फेरोमोन

शेतकरी बंधूंनो कीटक हे स्वजातीययांशी सुसंवाद साधण्यासाठी स्वतःच्या शरीरातून विशिष्ट गंध असलेल्या रसायनांचे मिश्रण बाहेर सोडतात ही रसायने त्यांच्यामध्ये विशिष्ट प्रतिक्रिया निर्माण करून संदेशवहनाचे कार्य करतात यांना इंग्रजीत फेरोमोन असे म्हणतात.

सध्या काही किटकांचे कृत्रिम रित्या तयार केलेले फेरोमोन विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत सर्वसाधारणपणे मादी पतंगाच्या वासा द्वारे (कामगंधा द्वारे ) नर पतंगांना आकर्षित करून सापळ्यात पकडून त्यांचा नाश करून म्हणजेच त्यांच्या मिलना मध्ये बाधा निर्माण करून पतंग वर्ग किडीचे व्यवस्थापन मिळण्यासाठी फेरोमन चा मोठ्या प्रमाणात कपाशी तुर हरभरा सोयाबीन, वांगी, भेंडी यासारख्या पिकात संबंधित पिकावरील संबंधित पतंग वर्गीय किडीची कामगंध गोळी सह वापर होत आहे.

समागमासाठी कार्यक्षम सहचर शोधण्यासाठी काम गंधाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो याच्या गंधाने विरुद्धलिंगी कीटक परस्पराकडे मिलनासाठी आकर्षित होतात या तत्त्वाचा वापर प्रामुख्याने खालील तीन प्रकारे कीड व्यवस्थापनासाठी करता येतो (1) फेरोमोन सापळे वापरून किडींचे सर्वेक्षण करणे (2) मोठ्या प्रमाणात किडीचे पतंग सापळ्यात पकडून त्यांचा नाश करणे (3) कीटकांच्या मिलनात अडथळा निर्माण करून त्यांच्या पुनरुत्पत्ती ला अटकाव करणे. शेतकरी बंधूंनो किडींच्या सर्वेक्षणासाठी एक हेक्टर क्षेत्रात सर्वसाधारणपणे पाच कामगंध सापळे पुरेसे आहेत त्यांचा वापर सनियंत्रणाकरिता करता येतो सर्वसाधारणपणे पीक संरक्षण उपाय सुरू करण्यापूर्वी सापळ्यात कमीत कमी किती पतंग अडकले आहेत याची संख्या निश्चित केलेली असते.

 

उदाहरणार्थ सोयाबीन पिकात स्पोडोप्टेरा या किडीचे 8 आठ ते 10 नर पतंग सतत दोन-तीन दिवस आढळून आल्यास या किडीच्या व्यवस्थापनासाठी उपाय त्वरित योजावे असा संकेत यातून घ्यावा. शेतकरी बंधुंनो सनियंत्रण व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात नर पतंगांना अडकवून किडींचे व्यवस्थापन मिळण्यासाठी सुद्धा कामगंध सापळ्यांचा वापर होऊ शकतो उदाहरणार्थ कपाशी पिकात गुलाबी बोंड अळीच्या नर पतंग मोठ्या प्रमाणात अडकवून त्यांचा नाश करण्यासाठी व गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन मिळविण्यासाठी प्रती एकर आठ ते दहा कामगंध सापळे गुलाबी बोंड अळीच्या गोळी सह लावावे. कीटकाच्या मिलनात अडथळा निर्माण करण्यासाठी सापळ्यातून लिंग प्रलोभन रसायनाचा सूक्ष्म गंध वातावरणात पसरतो त्यामुळे मिलनासाठी सहचर शोधताना कीटकाची फसगत होते परिणामी त्यांचे मीलन न झाल्यामुळे प्रजोत्पादन होत नाही त्यामुळे पुढील पिढीतील कीटकाच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येते.

हेही वाचा : कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्क आहे फायदेशीर...

हे कामगंध सापळे वापरताना पिकाच्या उंचीच्या वर साधारणपणे 1 ते1.5 फूट उंची ठेवून वापरावे तसेच या सापळ्यातील संबंधित पिकावरील संबंधित किडी करिता वापरली जाणारी काम गंध गोळी साधारणपणे 20 दिवसानंतर बदलावी सध्या बाजारात घाटेअळी, सोयाबीन वरील स्पोडोप्टेरा अळी, वांगी पिकावरील शेंडा व फळ पोखरणारी अळी, भेंडी पिकावरील शेंडा व फळ पोखरणारी अळी , कपाशीवरील गुलाबी बोंड आळी व इतर काही पिकावरील किडीसाठी बाजारात कामगंध सापळे उपलब्ध आहेत.

 

अर्थात ह्या या सापळे विकणाऱ्या विविध कंपन्या त्यांचे दर पुरवठा पद्धत याबद्दल माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती घ्या व शास्त्रोक्त रित्या कामगंध सापळ्यांचा वापर योग्यवेळी योग्य पद्धतीने शास्त्रज्ञांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा घटक म्हणून योग्य प्रमाणात गरजेनुसार करा.

 

लेखक -राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.

प्रतिनिधी गोपाल उगले

Pheromones फेरोमोन फेरोमोन सापळा
English Summary: Kamgandh trap plays an important role in pest management

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.