1. कृषीपीडिया

कलिंगड, खरबुज लागवड आणि व्यवस्थापन

सर्वसामान्य लोकांना परवडणारे, सर्व थरातील लोकांच्या पसंतीस उतरलेल्या वेलवर्गीय फळाला वर्षभर जरी मागणी असली तरी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असुन शहरी ग्रामीण भागांमध्ये कडक उन्हाळ्यात सतत लागणारी तहान शमविण्यासाठी कलिंगडाच्या फोडींचा हमखास उपयोग होताना दिसतो.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Watermelon Cultivation

Watermelon Cultivation

सर्वसामान्य लोकांना परवडणारे, सर्व थरातील लोकांच्या पसंतीस उतरलेल्या वेलवर्गीय फळाला वर्षभर जरी मागणी असली तरी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असुन शहरी ग्रामीण भागांमध्ये कडक उन्हाळ्यात सतत लागणारी तहान शमविण्यासाठी कलिंगडाच्या फोडींचा हमखास उपयोग होताना दिसतो. अशा या वाढत्या मागणीचा विचार करता कमी खर्चात कमी पाण्यावर अल्प कालावधीत येणारे पीक असल्यामुळे, शेतकरी कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत.

कलिंगड हे पीक पूर्वी नदीकाठच्या भागामध्येच पावसानंतर नदीकाठचे पाणी ओसरल्यावर तेथे जानेवारीत लागवड केली जात असे, अशी नदीकाठची जमीन भाडेपट्टीने लागवडीसाठी घेतली जाते. हवा, पाणी पुरेशा प्रमाणात मिळाल्यामुळे वेलींची वाढ झपाट्याने होते. उन्हाळ्यात अकाली येणाऱ्या ढगाळ हवेमुळे या लोकांची झोप उडत असुन एप्रिल, मेच्या पावसात पीक सापडल्यामुळे आलेला माल वाहून जात असे, या परिस्थितीमुळे भागातील लोकांना प्रचंड नुकसानीस ४०-५० वर्षापासून तोंड द्यावे लागत होते.

मागील २० वर्षापासून लागवडीची व्यवस्थित काळजी घेतल्याने मिळणारा आर्थिक फायदा पाहून हे पीक पूर्वीसारखे नदीकाठच्या भागातच न घेता बागायती पीक म्हणून शेतकरी घेऊ लागले आहेत, शहरी मार्केटला (दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बेंगलोर ) पाठवून आखाती राष्ट्रात मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ लागली आहे.

महाराष्ट्रामध्ये कलिंगड,खरबूज ही २ पिके घेतली जातात महाराष्ट्रात कलिंगडाची अंदाजे १०३५ हेक्टर क्षेत्रावर तर खरबूजाची २७१ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. कच्या कलिंगडाची भाजी, लोणच्यासाठी उपयोग केला जातो, कलिंगडाच्या रसाचे सरबत उन्हाळ्यात फार चविष्ट थंडगार असते. खरबुजाचे फळ मधुर स्वादिष्ट असते. त्याला एक प्रकारचा सुघंध असतो. या फळामध्ये चुना, फॉस्फरस ही खनिजे अ,ब,क जीवनसत्वे काही प्रमाणात असतात.

काळ्या टोमॅटोची लागवड करून देशातील शेतकरी होत आहेत श्रीमंत, जाणून घ्या फायदे...

जमीन : हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येते, चुनखडीयुक्त खारवट, चोपण जमीन लागवडीस अयोग्य आहे. कारण अशा जमिनीत अतिप्रमाणात असणाऱ्या सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम सल्फेट, क्लोराईड, कार्बोनेट, बायकार्बोनेटसारख्या विद्राव्य क्षारांमुळे कलिंगडाच्या फळावर डाग पडण्याची शक्यता असते, लागवडीसाठी हलकी, पोयट्याची मध्यम काळ्या ते करड्या रंगाची (डी किंवा जी सॉईल असलेली) मध्यम काळी पाण्याचा निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असुन पिकांकरिता जमिनीचा सामू ५.५ ते ७ योग्य असतो, या पिकाच्या लागवडीसाठी वाळूमय, मध्यम काळी पोयट्याची निचरा न होणा-या जमिनीत या पिकाची वाढ योग्य प्रकारे होत नाही. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभ्या दगडाच्या जमिनीत तसेच महाराष्ट्रातील इतर भागात मध्यम प्रतिच्या चांगल्या निच-याच्या जमिनीत हे पीक उत्तम प्रकारे येते.

हवामान : दोन्ही पिकास उष्ण व कोरडे हवामान तसेच भरपूर सूर्यप्रकाश पोषक असतो. कमी तापमानाचा पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. तसेच ति दमट हवेमध्ये पानावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. तथापि कोकणातील हवामानात योग्यवेळी पेरणी केल्यास हे पीक चांगले येते. वेलींची वाढ होण्याकरिता २४ अंश सेल्सिअस ते २७ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त असते. तापमान कमी अधिक वाढ झाल्यास म्हणजेच १८ अंश सेल्सिअसच्या खाली ३२ अंश सेल्सिअसवर गेल्यास वेलीची वाढ, फळधारणेवर विपरीत परिणाम होतो. २१ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्यास बियांची उगवण होत नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या घरावर छापे, जगभरात उडाली खळबळ..

लागवडीचा हंगाम : या पिकाला लागणा-या हवामानाचा विचार केला असता, कोकणात या पिकाची पेरणी १५ ऑक्टोबर ते १ डिसेंबरच्या दरम्यान करावी, यानंतर केलेल्या पेरणीमुळे फळमाशींचा प्रादुर्भाव वाढून फळे तडकण्याचे प्रमाण सुध्दा वाढते असे आढळून आले आहे. महाराष्ट्रातील इतर भागात या पिकांची लागवड जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात केली जाते.

म्हणजे उन्हाळ्याच्या तोंडावर याची फळे तयार होत असून त्यांना मागणी अधिक राहते. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात. दक्षिण महाराष्ट्रामध्ये कलिंगडाची लागवड ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करतात, ही फळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तयार होऊन उत्पादन कमी येते परंतु भाव चांगला मिळतो. पंढरपूर, बारामती, जुन्नर भागामध्ये कलिंगडाची लागवड बाराही महिने करतात ही कलिंगडे आड हंगामामध्ये निर्यातदेखील करतात.

महत्वाच्या बातम्या;
प्रजासत्ताक दिनानिमित्त बीकेटी टायर्सची ‘मुस्कुरायेगा इंडिया’ या प्रेरणादायी गीताने भारताच्या शेतकरी आणि जवानांना मानवंदना
गणेश जाधव यांनी फुलवली अंजीराची बाग, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून कौतुकाची थाप
HDFC बँक आज विरुधुनगर, तमिळनाडू येथे आपली 'बँक ऑन व्हील्स' व्हॅन करणार सादर

English Summary: Kalingad, Melon Cultivation and Management Published on: 27 January 2023, 02:41 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters