दर्जेदार उत्पादनासाठी रब्बी ज्वारीच्या संकरित व सुधारित जातीचे शुद्ध बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक असते. कारण या बियाण्यांची उत्पादनक्षमता स्थानिक वाना पेक्षा जास्त असते. तसेच अधिक उत्पादनासाठी जमिनीच्या खोलीनुसार वाणांची निवड ही महत्वाची ठरते. त्याकरिता ई ज्वारीच्या योग्य वाणांची निवड करणे हे अत्यंत आवश्यक आहे. या लेखात आपण ज्वारीच्या कोरडवाहू आणि बागायती वाणांचीमाहिती घेणार आहोत.
ज्वारीचे कोरडवाहू आणि बागायती वाण
- फुलेअनुराधा:
- कोरडवाहूक्षेत्रासाठीव हलक्या जमिनीसाठी लागवडीस योग्य.
- पक्व होण्याचा कालावधी 105 ते 110 दिवस
- अवर्षण परिस्थितीत प्रतिकारक्षम
- भाकरी उत्कृष्ट व चवदार लागते.
- कडबा अधिक पौष्टिक व पाचक.
- खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
- कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्टरी आठ ते दहा क्विंटल व कडबा 30 ते 35 क्विंटल.
- फुलेमाऊली:
- हलक्या व मध्यम जमिनीसाठी लागवडीसयोग्य
- पक्व होण्याचा कालावधी 110 ते 115 दिवस
- भाकरीचीचव उत्तम
- कडबा पोस्टीक व चवदार
- धान्याचे उत्पादन हलक्या जमिनीत हेक्टरी सात ते आठ क्विंटल कडबा वीस ते तीस क्विंटल
- धान्याचे उत्पादन मध्यम जमिनीत हेक्टरी 15 ते 20 क्विंटल व कडबा उत्पादन 40 ते 50 क्विंटल
- फुले सुचित्रा:
- मध्यम जमिनीसाठी शिफारस
- पक्व होण्याचा कालावधी 110 ते 115 दिवस
- उत्कृष्ट धान्य व कडबा प्रत
- धान्य उत्पादन 24 ते 28 क्विंटल व कडबा 60 ते 65 किंटल
- फुलेवसुधा:
- भारी जमिनीकरिता कोरडवाहू व बागायती वान
- पक्व होण्याचा कालावधी 116 ते 120 दिवस
- दाणे मोत्यासारखे व पांढराशुभ्र व चमकदार
- भाकरीची चव उत्तम
- ताटे भरीव, रसदार व गोड
- खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
- कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्टरी 24 ते 28 क्विंटल वकडबा 65 ते 70 क्विंटल
- बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्टरी 30 ते 35 क्विंटल व कडबा 70 ते 75क्विंटल
- कोरडवाहू धन्य उत्पादन सरासरी प्रति हेक्टरी 24 ते 28 क्विंटल व कडबा 65 ते 70 क्विंटल
- फुले यशोदा:
- भारी जमिनीत लागवडीसाठी प्रसारित
- पक्व होण्याचा कालावधी 120 ते 125 दिवस
- दाणे मोत्यासारखे पांढरे शुभ्र व चमकदार असतात.भाकरीची चव उत्तम
- कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्टरी 25 ते 28 क्विंटल व कडबा 60 ते 65 क्विंटल
- बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्टरी 30 ते 35 क्विंटल व कडबा 70 ते 80 क्विंटल
- फुले रेवती:
- भारी जमिनीत बागायतीसाठी शिफारस
- पक्व होण्याचा कालावधी 118 ते 120 दिवस
- दाणे मोत्यासारखे व पांढरे चमकदार
- भाकरीची चव उत्कृष्ट
- कडबा पौष्टिक व अधिक पाचक
- धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्टरी 40 ते 45 क्विंटल व कडबा उत्पादन 90 ते 100 क्विंटल
- मालदांडी 35-1:
- मध्यम खोल जमिनीत कोरडवाहू साठी शिफारस
- पक्व होण्याचा कालावधी 118 ते 120 दिवस
- दाणे चमकदार व पांढरे
- भाकरीची चव चांगली
- खोडमाशी प्रतिकारक्षम
- धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्टरी 15 ते 18 क्विंटल व कडबा 60 क्विंटल
- फुले उत्तरा:
- हुरड्यासाठी शिफारस
- हुरड्याची अवस्था येण्यास नव्वद ते शंभर दिवस
- भोंडातुन दाने सहज बाहेर पडतात.
- सरासरी 70 ते 90 ग्रॅम इतकाहुरडा मिळतो.
- हुरडा चवीस सरस अत्यंत गोड, शिवाय ताटेही गोड असल्याने जनावरे कडबा चवीने खातात.
Share your comments