1. कृषीपीडिया

नोकरीला करा रामराम ! सुरु करा हा शेती व्यवसाय आणि कमवा करोडो

Farming Business Idea: भारतात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे भारताची कृषिप्रधान (Agricultural country) देश म्हणून ओळख आहे. तसेच शेतकरी आता पारंपरिक शेती न करता आधुनिक शेती करत आहेत त्यामुळे खर्च कमी आणि उत्पन्न अधिक मिळत आहे.

Farm business

Farm business

Farming Business Idea: भारतात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे भारताची कृषिप्रधान (Agricultural country) देश म्हणून ओळख आहे. तसेच शेतकरी आता पारंपरिक शेती न करता आधुनिक शेती करत आहेत त्यामुळे खर्च कमी आणि उत्पन्न अधिक मिळत आहे.

 

शेतीबरोबरच जोडधंदा करण्याचा अनेक शेतकरी विचार करत आहेत. जर तुम्हीही असाच व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कोरफड व्यवसाय (Aloe business) आजकाल शेतकऱ्यांना श्रीमंत बनवण्याचा मार्ग दाखवत आहे. आजच्या काळात औषधापासून (medicine) ते ब्युटी क्रीमपर्यंत याचा वापर केला जात आहे. म्हणूनच सर्व कंपन्या जेल घेण्यास इच्छुक आहेत.

त्यांची मागणी जास्त आणि कमी मजूर लागवडीमुळे हा खूप चांगला व्यवसाय आहे. वास्तविक, कोरफड शेती (Aloe Vera Farming) करण्यासाठी जास्त पाण्याचीही गरज नसते. कोरफड शेती करण्यासाठी काळी आणि सुपीक जमीन असणे आवश्यक नाही. तर ही शेती ओसाड जमिनीवरही सहज केली जाऊ शकते.

सरकारची 'ही' योजना तुम्हाला माहिती आहे का? फक्त 1 रुपया गुंतवा आणि मिळवा 15 लाख; जाणून घ्या योजनेबद्दल...

कोरफडीची शेती करताना की या शेतीवर कीटकांचा प्रदुर्भाव अधिक असतो. त्यामुळे वेळोवेळी कीटकनाशकांची (Insecticide) फवारणी करणे गरजेचे आहे. तसेच या शेतीला जास्त पाण्याची आवश्यकता नसल्यामुळे शेतात कुठेही पाणी साचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच कोरफड लागवड करताना योग्य आणि जास्त पाने देणारी प्रजाती निवडावी.

Money Plant: घरात मनी प्लांट लावल्याने होतात 'हे' मोठे बदल ; वास्तुशास्त्र काय सांगतंय? वाचा..

कोरफड लागवड करताना नील या प्रजातीची निवड करावी. कारण या प्रजातीपासून अधिक उत्पन्न मिळते. तसेच या प्रजातीवर रोगांचे प्रमाणही कमी आहे. कोरफडीची लागवड वर्षाच्या कोणत्याही वेळी करू शकता आणि तुम्ही वर्षातून दोनदा त्यांची कापणी आणि विक्री देखील करू शकता. कोरफड लागवडी दरम्यान त्यामधील अंतर 1 ते 2 फूट असावे.

 

एका एकर शेतात 12,000 कोरफडीची रोपे लावता येतात. कोरफडीच्या रोपाची किंमत 3 ते 4 रुपये आहे. म्हणजेच एका बिघामध्ये कोरफडीची लागवड करण्यासाठी सुमारे 40 हजार रुपये खर्च येणार आहेत. कोरफडीच्या एका रोपातून 4 किलो पर्यंत पाने निघतात. एका पानाची किंमत सात ते आठ रुपयांपर्यंत आहे.

Farmer the Journalist: शेतकऱ्यांसाठी कृषी जागरण कडून 'फार्मर द जर्नालिस्ट' कार्यशाळेचे आयोजन

English Summary: job Farm business and earn crores Published on: 18 July 2022, 11:36 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters