सेंद्रिय शेतीचे वैशिष्ट्ये :-
मातीचे संवर्धन.
तापमानाचे व्यवस्थापन.
पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि संवर्धन.
गरजांमध्ये स्वावलंबन.
नैसर्गिक क्रमचक्र आणि जीवनाच्या स्वरूपांचे अनुपालन.
जनावरांची एकीकृतता.
नवीनीकरणीय संसाधनांवर अधिकतम अवलंबन,जसे पशु-बल.
सेंद्रीय शेती खालील सुविधांच्या योगे अन्न-सुरक्षा आणि गरीबांच्या हाताला काम आणि दोन पैसे जास्त फायदा मिळवून देते.कमी संसाधने व पाऊसपाणी असलेल्या क्षेत्रांत उत्पादनाची वाढ होणे,
शेत आणि आसपासच्या क्षेत्रात जैव विविधता आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन होणे,
मिळकत वाढवणे किंवा खर्च कमी करणे,सुरक्षित आणि विभिन्न खाद्यान्नांचे उत्पादन घेणे.
मातीचे संवर्धन :- रसायनांचा वापर थांबविणे, ओल्या गवताच्या जागी पिकाचे अवशेष उपयोगात आणणे, सेंद्रीय आणि जैविक खताचा उपयोग करणे, पीक क्रमचक्र आणि बहु-पिकांचा अवलंब करणे, अत्यधिक नांगरणी करणे टाळा आणि मातीस हिरव्या किंवा ओल्या गवताखाली झाका.
तापमानाचे व्यवस्थापन :- माती झाकून ठेवा, बांधावर झाडे-झुडपे लावा.
माती आणि पावसाच्या पाण्याचे संवर्धन :- पाझर टाक्या खणा, उतार असलेल्या जमिनीवर समोच्च बांध घाला आणि समोच्च पंक्ति शेतीचा अवलंब करा, शेत-तलाव खणा, बांधांवर कमी उंचीचे वृक्षारोपण करा. स्वतःच्या गरजांमध्ये स्वावलंबन :- स्वत:च बियाण्याचा विकास करा, कंपोस्ट, वर्मीकंपोस्ट, वर्मीवॉश, द्रव खते आणि वनस्पति अर्काचे उत्पादन.
जैववैविधतेचे अनुपालन :- जीववैविध्य टिकून राहावे म्हणून आवास विकास करा, सेंद्रीय कीटकनाशकांचा वापर कधीही करा, जैववैविध्य निर्माण करा.
जनावरांची एकीकृतता :-" जनावरे ही सेंद्रीय व्यवस्थापनाचे महत्वपूर्ण घटक आहेत आणि हे फक्त पशु-उत्पादनेच पुरवित नाहीत तर मातीमध्ये वापर करण्यासाठी पुरेसे शेण आणि मूत्र प्रदान करतात.
सेंद्रिय शेतीमुळे होणारे फायदे :-
१) नत्र पुरवठा :- जमिनीत सेंद्रिय खत टाकल्यास नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थांत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. शेणखत व्यतिरिक्त कोंबड्यांपासून मिळणारे खत (कॊंबडीची विष्ठा), रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा अधिक पुरवठा करतात.
२) जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते :-जमिनीला ०.५ % ते १.० % सेंद्रिय पदार्थ दिल्यास पाणी धरुन ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते. जमिनीतील सेंद्रिय खतांचा वापर झाडांद्वारे केला जातो. जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत जातात. वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरविल्यास जमिनीची उत्पादन क्षमता व पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
३) स्फुरद व पालाश :- सेंद्रिय खतांमुळे झाडांना विविध अवस्थेत स्फुरद व पालाश उपलब्ध होऊन झाडांमध्ये मुळांद्वारे शोषले जातात.
४) जमिनीचा सामू :- सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल, विम्ल व क्षारयुक्त होत नाही.
५) कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी (CEC) :- कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती होय. सेंद्रिय खतांमुळे कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी २० ते ३० % ने वाढते .त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येते व झाडांना संतुलित पोषकद्रव्ये मिळतात.
६) सेंद्रीय कर्बाचा पुरवठा :- कर्ब किवा कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जिवाणूंना त्याचा उपयोग त्यांच्या वाढीसाठी होतो. हे जिवाणू झाडांना जमिनीतून अन्नद्रव्य उपलब्ध करुन देतात.
७) सेंद्रिय खतांचा परिणाम :- सेंद्रिय खतांमुळे मातीवर सावली होऊन तापमान वाढत नाही. सेंद्रिय पदार्थ माती घट्ट धरून ठेवतात. उष्ण तापमानात जमिनीला थंड करणे व कमी तापमानात जमीन गरम ठेवणे सेंद्रिय खतामुळे शक्य आहे. सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील असंख्य जिवाणूंची वाढ होते. त्यांत रोग निर्माण करणारे जीवाणूपण वाढीस लागू शकतात. अशा वेळी ट्रायकोडरमा नावाचे जिवाणू जमिनीत सोडल्यास रोग निर्माण करणाऱ्या जिवाणूंचा नाश होऊ शकतो.
सेंद्रिय शेतीतील त्रुटी :-
सेंद्रिय शेतीबद्दलचे शेतकय्रांना असलेले अपुरे ज्ञान, यामुळे या पद्धतीच्या वापरावर मर्यादा येत आहेत.
जास्त वेळ खाऊ पद्धत आहे.
यांत्रिकीकरणामुळे शेतकय्रांजवळचे पशुधन कमी झाले आहे, त्यामुळे शेतीला शेतीला योग्य प्रमाणात शेणखताची उपलब्धता होत नाही.
सेंद्रिय शेतमालाला मिळणारा कमी भाव.
Share your comments