महाराष्ट्रात कांदा हे प्रमुख पीक आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. आता महाराष्ट्राच्या बऱ्याच या भागांमध्ये कांदा पीक घेतले जात आहे. कांदा पीक ही रोगांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असे पीक आहे. कांद्या वरील असलेल्या रोगांपैकी मररोग अत्यंत नुकसानदायक असतो. या रोगावर या लेखात माहिती घेऊ.
मररोग
जमिनीमध्ये असलेल्या फ्युजॅरियम ऑक्सी स्पोरम बुरशीचा अधिक प्रादुर्भावामुळे कांदा मर रोग होतो. कधी-कधी या रोगाची लागण रोपवाटिकेचे मधून होते. तसे झाल्यास या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. या रोगामध्ये कांद्याचे पात पिवळी होते व वाढ खुंटते. पान शेंड्याकडून कर पत येऊन मुळे गुलाबी होऊन सडतात.
मररोगावरील उपाय योजना
-
ज्या जमिनीत मर रोगाचा प्रादुर्भाव झाला अशा जमिनी चार वर्षे कांदा पीक घेऊ नये, पिकांची फेरपालट करणे उत्तम असते.
-
कांदा पीक घेणे अगोदर जमिनीची योग्य निवड, लागवडीच्या वेळेस ट्रायकोडर्माचा वापर करावा. दहा ग्रॅम कॅर्बोनडेंझीम प्रति दहा लिटर पाण्यात द्रावण तयार करून त्या द्रावणात रोपे बुडवून लावावीत.
-
मर रोगाचे लक्षणे दिसत असल्या कॅर्बोनडेंझीम दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात आणि मॅन्कोझेब 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
करपा रोग व त्याचे प्रकार
जांभळा करपा
अल्टरनेरिया पोरी नावाच्या बुरशीमुळे जांभळा करपा येतो. या बुरशीजन्य रोगांचे प्रमाण खरीप हंगामातील दमट, ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे जास्त वाटते. जांभळा करपा या रोगामुळे कांद्याच्या पातीवर सुरुवातीला लहान, खोलगट टीपके पडतात. या ठिपक्यांचा मध्यभाग जांभळट आणि लालसर रंगाचा होऊन कडा पिवळसर होतात. त्यांचे प्रमाण वाढल्यामुळे पाने शेंड्याकडून जळू लागतात व संपूर्ण पात जळाल्यासारखी दिसते. पात जळाल्याने कांद्या चांगला पोस ला जात नाही. त्यामुळे चिंगळी कांद्याचे प्रमाण वाढते.
काळा करपा
कोलेटो ट्रेकम नावाच्या बुरशीमुळे काळा करपा रोगाचा प्रादुर्भाव खरीप हंगामात दिसून येतो. या रोगामुळे सुरुवातीच्या पानांवर फिक्कट पिवळसर डाग पडून त्याठिकाणी आणि मानेवर बुरशीचे वर्तुळाकार काळे डाग पडतात. जमिनीत पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्यामुळे या रोगाचे प्रमाण जास्त वाढते. ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही अशा जमिनीत कांद्याच्या पातीचे माना लांबलेल्या दिसतात व कांदा सड होते.
करपा रोगावरील उपाय योजना
-
पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.
-
रोपवाटिकेत बुरशीनाशक व कीटकनाशकांची फवारणी करावी.
-
लागवड करण्यापूर्वी रोपे बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून घ्यावीत.
-
लागवडीनंतर रोगाची लक्षणे दिसताच दर दहा दिवसांच्या अंतराने १० मिली अ झॉक्सी स्ट्रॉ बिन किंवा दहा मिली टॅबूकोंयाझोल प्रति १० लिटर पाण्यात मिसळून जांभळा करपा आणि कडा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी चार फवारण्या कराव्यात.
Share your comments