जमीन भुसभुशीत राहावी आणि जमिनीची योग्य प्रमाणात पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढावी. हे सर्व तेव्हाच शक्य होते जेव्हा शेणखत पूर्णपणे कुजलेले असते.
शेणखत न कुजलेले असेल तर त्याचे अनेक दुष्परिणाम होतात.
१) जेव्हा आपण असे शेणखत मुळांभोवती टाकतो तेव्हा त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरूच असते. ह्या कुजण्याच्या प्रक्रियेत शेणखताचे तापमान 65ते75 डिग्री सेल्सिअस च्या आसपास जाते. त्यामुळे झाडाच्या मुळांना शॉक बसतो अथवा इजा होण्याची शक्यता असते. परिणामी झाडाच्या उत्पादकतेत घट होते.
कुठलीही गोष्ट कुजण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. असे शेणखत कुजताना जमिनीतील ऑक्सिजन घेत असते आणि झाडांच्या मुळांनादेखील ऑक्सिजन आवश्यक असतोच. परिणामी हे कुजणारे शेणखत जमिनीतील ऑक्सिजनचा साठा कमी करते आणि झाडाच्या मुळांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे झाडाच्या आत काही चुकीची संप्रेरके स्रवतात आणि हे झाडाच्या उत्पादनक्षमतेला मारक ठरते.जर ह्या कुजणाऱ्या शेणखताला ऑक्सिजन मिळाला नाही तर ते सडण्याची प्रक्रिया सुरू होते. ह्या सडणाऱ्या शेणखतात उपद्रवी बुरशी वाढण्याचा धोका निर्माण होतो. न कुजलेल्या शेणखताचा फायदा न होता त्याने तोटेच अधिक होतात. आपल्या पिकाला फायदा होणे तर दूरच, त्याची उत्पादकता कमी होऊन रासायनिक औषधांचा खर्च वाढतो.तसेच पीक काही दिवस पिवळे पडते.
म्हणूनच शेणखत टाकताना ते पुर्ण कुजलेले असायला हवे. ते उपलब्ध नसल्यास, फक्त आपल्या समाधानासाठी न कुजलेले शेणखत हे न वापरलेलेच बरे.
शेती म्हणजे फार पैसे मिळवून देणारी वस्तू नाही, शेती म्हणजे सदा आनंद देणारी गोष्ट आहे.
ती नुसती मोजमापात केली ना. तरी सुंदर दिसते, मनाला शांती भेटते.
ती फक्त आपली पाहिजे आपण आपली मानली पाहिजे.
तिला थोडे खरडून- उखलून घेतले ना. की तीचा रंग बदलतो . तीला प्रेमाने भिजवून आणि श्रध्देने काही लागवड केली की ती खर्र्या अर्थाने तीचे रंग दाखवायला सुरूवात करते . मग ती फूलून जाते आणि शेतकऱ्यांना ही मनांनी फुलवते.
शेती म्हणजे फार पैसे मिळवून देणारी वस्तू नाही आहे. तशी तीची किंमत अनमोल आहे. तिच्यातुन मिळणारे उत्पादन थोडके जरी असलेi तरी मनाला समाधान व आरोग्याला स्वास्थ्य मिळवून देणारे आहे. फक्त ती कसण्यात आजच्या युगातील आधुनिकता असायला हवी आणि ते स्वीकारण्याची क्षमता .
व्हाईट गोल्ड ट्रस्ट औरंगाबाद
English Summary: Is it beneficial even if the manure is not rotten?Published on: 18 December 2021, 11:21 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments