अलीकडील काळामध्ये शेतीत आधुनिक तंत्रज्ञान तसेच वेगवेगळ्या मार्गाने शेती करण्याची पद्धत अवलंबली जात आहे.पारंपरिक शेतीला बगल देत अनेक शेतकरी शेती संलग्नित व्यवसायात रमत आहेत.
यामध्ये सफेद चंदनाची लागवड केल्यास कमी खर्चामध्ये तुम्हाला अधिक नफा प्राप्त होऊ शकतो यासाठी तुम्हाला कमीत कमी अडीच लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या गुंतवणुकीतून तुम्हाला दीड कोटी रुपयांचा फायदा मिळू शकतो.
राज्य सरकारदेखील चंदनाची शेती करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे त्याकरता विविध प्रकारचे योजना देखील राबवत आहे.सध्या भारतात सफेद चंदनाचा सर्वसाधारण दर आठ हजार ते 10 हजार प्रति किलो आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर 20 हजार ते 25 हजार इतका आहे. चंदनाची शेती करण्याकरता प्रथम तज्ञ व्यक्तीकडून तुम्ही माहिती गोळा करून तसेच चंदनाच्या शेतीपासून मिळणारे उत्पन्न त्वरित नसते.त्यासाठी सर्व साधारणपणे 10 ते 12 वर्षे प्रतीक्षा करावी लागते. चंदनाच्या एका रोपाची सर्वसाधारण किंमत चारशे रुपये इतकी आहे.
चंदनाच्या शेतीत सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला पाण्याची गरज नाही किंवा त्याच्या साठी लागणारा खर्च देखील कमी असतो.
कोरडवाहू शेती देखील आपण चंदनाची शेती करू शकतात. चंदनाचा उपयोग परफ्युम तयार करणे,सुगंधी साबण निर्मितीसाठी तसेच विविध सौंदर्य प्रसाधने यापासून तयार केले जातात. विविध धार्मिक कार्यक्रमात देखील चंदनाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.
Share your comments