1. कृषीपीडिया

पन्नास हजाराच्या गुंतणूकीत करा कोरपड शेती; मिळवा दोन लाखाचे उत्पन्न

कोरफड या वनस्पतीला आयुर्वेदात खूप मोठे स्थान आहे. विविध प्रकारच्या दुर्मिळ रोगांवर रामबाण औषध म्हणून कोरफडीकडे पाहिले जाते. दैनंदिन जीवनामध्ये कोरफडीचा उपयोग तसा कमीच असतो, त्यामुळे या पिकाची शेतीही केली जाऊ शकते याविषयी शेतकऱ्यांना कमी माहिती आहे. आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने कोरफडीला विशिष्ठ वर्गाकडून खूप मागणी आहे.

KJ Staff
KJ Staff


कोरफड या वनस्पतीला आयुर्वेदात खूप मोठे स्थान आहे. विविध प्रकारच्या दुर्मिळ रोगांवर रामबाण औषध म्हणून कोरफडीकडे पाहिले जाते. दैनंदिन जीवनामध्ये कोरफडीचा उपयोग तसा कमीच असतो, त्यामुळे या पिकाची शेतीही केली जाऊ शकते याविषयी शेतकऱ्यांना कमी माहिती आहे. आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने कोरफडीला विशिष्ठ वर्गाकडून खूप मागणी आहे. तसेच या कोरफडीच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोरफडीची शेती कशी करायची याविषयी माहिती सांगणार आहोत.

कोरफडीची लागवड

कोरफडीची लागवड करण्यासाठी हलकी जमीन असणे गरजेचे आहे. पाण्याची उपलब्धता जरी कमी असली तरी कोरपडचे उत्पन्न आपण घेऊ शकतो.  कोरपडीची लागवड करताना लवकर पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. कोणत्याही ऋतमध्ये कोरफड लावता येते परंतु उन्हाळ्याचा काळ यासाठी उत्तम असतो.

पिकाची लागवड करण्यासाठी-

 जमीन नांगरून बेड तयार करून घ्यावेत. दोन बेडच्या मधील अंतर हे २-२.५ फूट असावे. त्यानंतर या पिकासाठी नर्सरी किंवा इतर शेतकऱ्यांकडे रोपे मिळतात ती घेऊन साधारण १ फुटांवर याची लागवड करावी.  त्यानंतर गरजेनुसार पाणी द्यावे. एका एकरमध्ये जवळपास १०,००० रोपे लावता येतात. काही दिवसांनंतर पीक जोमदार येईल अशावेळी पिकात इतर गवत वाढू नये, याची काळजी घ्यावी. तसेच एकदा लागवड केल्यानंतर ५ वर्षांपर्यंत या रोपाचे आयुर्मान असते.

पिकाची काढणी आणि विक्री

कोरपडीच्या पानांचे वजन ५००-८०० ग्रॅम झाल्यास आपण काढणी करून याची विक्री करू शकतो. यासाठी तुम्ही काही औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांशी करणार करु शकता. तसेच घरीच ज्यूस बनवून विकू शकता. जर तुम्ही कंपन्यांशी करार केला असेल तर ते तुम्हाला ४-७ रुपयांपर्यंत भाव देतात. तसेच एका झाडाला ३-४ किलो पाने असतात. म्हणजे एक झाड आपल्याला २० रुपये देऊ शकते. म्हणजे १०,००० झाडांपासून आपल्याला २ लाख रुपांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. यासाठी खर्च ५०-६० हजार रुपये येत असतो.

झाडांची निगा कशी राखावी

या रोपांची लागवड केल्यानंतर याला फक्त पाणी देण्याची आवश्यकता आहे. तसेच यावर रोग येत नाही म्हणू कीटनाशकांचा वापर करावा लागत नाही. परंतु यामध्ये गवत उगवल्यास ते मजुरांकडून काढून घ्यावे. यावर फवारणी केल्यास कोरपडीच्या झाडावर परिणाम होऊ शकतो. अशा पद्धतीने झाडांची निगा. ठेवल्यास आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते.

English Summary: Invest fifty thousand in Aloe vera farming; earn two lakh rupees income Published on: 29 May 2020, 06:21 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters