कोरफड या वनस्पतीला आयुर्वेदामध्ये खूप मोठे स्थान आहे. विविध प्रकारच्या दुर्धर आजारांवर रामबाण औषध म्हणून कोरफड कडे पाहिले जाते. जर आपल्या दैनंदिन जीवनाचा विचार केला तर कोरफडीचा वापर तसा कमी आहे म्हणून कोरफड लागवडी विषयी शेतकऱ्यांना कमी माहिती आहे.
परंतु कोरफडी मध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने समाजातील विशिष्ट समाज घटकाकडून खूप मागणी आहे. तसेच कोरफड लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचे दिसून आले आहे. या लेखात आपण कोरफड शेती कशी करायची याबद्दल माहिती घेऊ.
कोरफडीची लागवड
कोरफडीची लागवड करण्यासाठी हलकी जमीन असणे गरजेचे असते.पाण्याची उपलब्धता कमी असली तरी कोरफडची उत्पन्न आपण घेऊ शकतो. कोरफड लागवड करताना लवकर पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. कोरफडीची लागवड कोणत्याही ऋतूमध्ये करता येते परंतु उन्हाळ्याचा काळ यासाठी चांगला असतो.
कोरफड लागवडी करण्याची पद्धत
जमीन नांगरून चांगली भुसभुशीत करून त्यावर बेड तयार करावेत. दोन बेडच्या मधील अंतर हे दोन ते अडीच फूट असावे. त्यानंतर या पिकासाठी नर्सरी किंवा इतर शेतकऱ्यांकडे रोपे मिळतात तिचे घेऊन साधारण एक फुटांवर याची लागवड करावी. गरजेनुसार पाणी द्यावे व एका एकर मध्ये जवळपास दहा हजार रोपे लावता येतात काही दिवसानंतर पीक जोमदार येईल अशा वेळी पिकात इतर गवत वाढू नये यासाठी काळजी घ्यावी.तसेच एकदा लागवड केल्यानंतर पाच वर्षापर्यंत या पिकाचे आयुर्मान असते.
कोरफडीचे काढणी आणि विक्री
कोरफड च्या पानांची वजन500 ते 800 ग्राम झाल्यास आपण काढणी करून त्याची विक्री करू शकतो. त्यासाठी तुम्ही काही औषधे तयार करणाऱ्या कंपनीशी करार करू शकता. तसेच घरीच ज्यूस बनवून तो विकू शकता. जर तुम्ही कंपनीशी करार केला तर ते तुम्हाला चार ते सात रुपयांपर्यंत भाव देतात.
तसंच एका झाडाला तीन ते चार किलो पाने असतात. या अर्थाने एक झाड आपल्याला वीस रुपये देऊ शकते म्हणजे दहा हजार झाडांपासून आपल्याला दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.यासाठी खर्च हा पन्नास ते साठ हजार पर्यंत येतो.
कोरफडीच्या झाडाची निगा कशी राखावी?
या रोपांची लागवड केल्यानंतर याला फक्त पाणी देण्याची आवश्यकता आहे. यावर कोणत्याही प्रकारचा रोग येत नसल्यामुळे कीटकनाशकांचा वापर करावा लागत नाही. परंतु यामध्ये गवत झाले असते मजुरांकडून काढून घ्यावे. कोरफड वर फवारणी केल्यास झाडावर परिणाम होऊ शकतो. अशा पद्धतीने झाडाची निगा ठेवल्यास आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते.
Share your comments