तूर पिकावरील किडींंची ओळख व व्यवस्थापन

17 August 2018 04:50 PM By: KJ Maharashtra
pigeon pea

pigeon pea

महाराष्ट्रात लागवडीखाली असलेल्या विविध कडधान्यांमध्ये सर्वात जास्त क्षेत्र तुरीचे आढळते. तूर हे खरीप हंगामातील पीक असले तरी, हे रब्बी हंगामात पक्व होत असल्यामुळे या पिकावर खरीप तसेच रब्बी हंगामातील किड आढळून येतात. तूर पिकावर किडींचा प्रादुर्भाव झाल्यास फुले, पाने व शेंगा भरण्याची अवस्थेवर परिणाम होऊन शेतकरी वर्गाचे आर्थिक नुकसान होते. पिकाच्या वाढीव अवस्थेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या कीडीचा प्रादुर्भाव आढळतो. त्यामुळे तूर पिकावर येणाऱ्या कीडीची ओळख करून व त्यावर उपाययोजना कश्याप्रकारे करावे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर करून होणारा प्रादुर्भाव थांबवू शकण्यात मदत होते.

 

अ) कळ्या, फुले व शेंगावरील किडी

किडीचा प्रकार

किडीची ओळख

नुकसान

१. तुरीवरील हेलीकोव्हरपा अळी

शेंगा पोखरणारी अळी हेलीकोव्हरपा या नावाने ओळखली जाते. ही एक बहुभक्षी कीड असून १८१ प्रकारच्या वनस्पतींवर आपली उपजीविका करते. शेंगा पोखरणारी अळी साधारणपणे ७ ते १६ शेंगाचे नुकसान करते. पूर्ण विकसित अळी प्रामुख्याने पोपटी रंगाची असून यात विविध रंगछटा सुद्धा आढळतात. शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रेषा आढळतात.

अळी लहान असतांना पानावर तर पीक फुलोऱ्यावर असतांना कळ्या, फुले व शेंगावर आक्रमण करते. ही अळी शेंगावर अनियमीत आकाराचे छिद्र पाडून अर्धी आत व अर्धी बाहेर राहून शेंगातील परिपक्व तसेच अपरिपक्व दाणे खाते.

२. तुरीच्या शेंगेवरची माशी

 

अळी पांढऱ्या रंगाची, बारीक, गुळगुळीत असते. अळीला पाय नसतात व अळीच्या तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. शेंगाच्या बाह्य निरीक्षणावरून या अळीच्या प्रादुर्भावाचे लक्षण दिसून येत नाही. पूर्ण विकसित अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी बाहेर पडण्यासाठी शेंगेला छिद्र पाडते तेंव्हा नुकसानीचा प्रकार लक्षात येतो.

तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी नंतर शेंगमाशी पिकाचे सर्वात जास्त नुकसान करते. शेंगामाशीची एक अळी शेंगेच्या आत राहून एका दाण्यावर उपजीविका पूर्ण करते. अळी शेंगातील दाने अर्धवट कुरतडून खात असल्यामुळे दाण्यांची मुकणी होते.

३. तुरीवरील पिसारी पतंग

अळी हिरवट रंगाची, मध्यभागी फुगीर व दोन्ही टोकांकडे निमुळती होत गेलेली व पाठीवर काटेरी लव असलेली असते. कोष दिसायला अळीप्रमाणे पण तपकिरी रंगाचा असतो. 

लहान अळी कळ्या, फुले व शेंगाना छिद्र पाडून खाते. मोठी अळी तुरीच्या शेंगावरील साल खरडून शेंगाना छिद्र पाडून दाने खाते. अळी शेंगेच्या आता कधीच शिरत नाही.

 

हेही वाचा:आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने तूर विकू नका

 

पीक फुलोऱ्यापासून या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. प्रौढ मादी पतंग पिवळसर रंगाची असते. उभट आकाराची अंडी पुंजक्यात शक्यतो झाडाच्या शेंड्यावर घातली जातात. अळी १४ मि. मी. लांब असून हिरवट पांढरा रंग असलेली शरीराच्या दोन्ही बाजूस काळे ठिपके असलेली अशी असते. कोषावस्था चंदेरी रेशमी जाळ्यांनी विणलेल्या अवस्थेत जमिनीत आढळते. कमी कालावधीत असणाऱ्या जाती विशेष बळी पडतात.

जास्त आर्द्रता असलेल्या भागात ह्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. अळी पाने, फुलकळ्या आणि शेंगा एकत्र करून त्या गुच्छ तयार करते व वाढणारे कोवळे शेंडे, पाने आणि शेंगा एकमेकांना चिकटल्यामुळे शेंगाचे प्रमाण कमी होऊन उत्पादन कमी होते.

 

 

ब) रस शोषण करणाऱ्या किडी

१. तुरीच्या शेंगेवरील ढेकुण

हिरवट तपकिरी रंगाचे छातीच्या बाजूला अनुकुचीदार काटे असतात. ढेकुण मुख्यत: शेंगावर अंडी घालतात तसेच पानांवर सुद्धा अंडी घालतात.

या किडीच्या बाल्यावस्था व प्रौढ कोवळ्या शेंगातील रस शोषण करतात. प्रादुर्भावग्रस्त दाण्यावर चट्टे उमटून प्रत खराब होते व शेंगा आकसलेले प्रमाणे दिसतात व शेंगा अपरिपक्व अवस्थेत वाळून जातात. आकासलेले दाने पाण्याचा तन असल्याप्रमाणे दिसतात, त्यामुळे किडीच्या प्रादुर्भावाची कल्पना येत नाही.

२. मावा

काळे, चमकदार, २ मिमी लांब, बाल्यावस्था प्रौढांप्रमाणेच पण आकाराने लहान असते.तुरीच्या फांद्या, फुले व शेंगांवर माव्याची वसाहत आढळून येते.

प्रौढ व पिल्ले पानातील रस शोषण केल्यामुळे झाडाची जोम कमी होते. रसशोषण करते वेळी मावा चिकट गोड द्रव्य सोडतात, ह्या द्रव्यावर काळ्या बुरशीची वाढ होते ज्यामुळे  झाड्याची प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते.

३. फुलकिडे

प्रौढ काळ्या रंगाचे १ मिमी लांब असतात.

पिक फुलोऱ्यात असतांना फुलकिड्यांचा प्रादुर्भाव होतो. जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास दाणे लहान व आक्रसलेले आढळतात.

४. कोळी

फिक्कट रंगाचे, ०.२ मिमी लांब, लंबगोलाकार असतात.

 

पिल्ले व प्रौढ पाने खरडून रस शोषण करतात. तूर पिकामधील वंध्यत्व रोगाचा विषाणू प्रसार इरिओफाइड कोळ्यांमुळे होतो.

 

डॉ. निशांत उके, शुभांगी खंदारे
(डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) 

pests tur tur dal
English Summary: Introduction & management of Pests in tur (pigeon pea) Crop

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.