आंतरपीक पद्धती किंवा मिश्र पीक पद्धतीची शेती म्हणजे काही नवीन तंत्रज्ञान नाही. आपल्या पारंपरिक शेती पद्धतीला थोड्या संशोधनाची जोड असून शेतकऱ्यांच्या आर्थिक नफ्याला पूरक अशी पद्धत आहे. आज शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन ठेवला तर आर्थिक नियोजन आणि नफा व तोटा या सर्व गोष्टी पर्यायाने बघावे लागतात हल्ली शास्त्रीय पद्धतीने आंतरपीक पद्धतीचा अवलंब करताना शेतकरी दिसत आहेत
आंतरपीक पद्धती अधिक आर्थिक नफा मिळवायचा दृष्टिकोनातून फायदेशीर ठरते. एवढेच नाही तर आंतरपीक पद्धती चे बरेच शेतीसाठी फायदे देखील आहेत. याबद्दल या लेखात आपण माहिती घेऊ.
आंतरपिकांचे अनन्यसाधारण महत्त्व
- आंतरपिकांचे जलसंधारणा मधील महत्व- जलसंधारण म्हणजे जागच्याजागी म्हणजे शेतातल्या शेतात पावसाचे पाणी मुरवणे होय कोरडवाहू शेती मध्ये पावसाच्या पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणी आडवा पाणी जिरवा हे तंत्रज्ञान फायद्याचे ठरते. कपाशी + सोयाबीन ही आंतरपीक पद्धती खोल मशागत करून उताराला आडवी पेरणी केल्यास पावसाच्या पाण्याचा अपधाव उथळ मशागती पेक्षा 12.74 टक्के कमी होतो. तसेच जमिनीची धूप 17.76 टक्क्यांनी कमी होते. आणि सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन 38.95 टक्क्यांनी वाढते.
- आंतरपिकांचे एकात्मिक कीड व्यवस्थापनात महत्व- आंतरपीक/ मिश्र पीक पद्धतीचे एकात्मिक कीड व्यवस्थापनात महत्त्वाचे स्थान आहे. विविध आंतरपीक व मिश्र पीक पद्धतीमुळे मुख्य पिकावर येणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव टाळता येणे शक्य आहे. मका, ज्वारी, बाजरी यासारख्या पिकांमुळे अळ्यांचा प्रादुर्भाव कमी होतो. याच आंतरपिकांचा वापर पक्षी थांबे म्हणून देखील करता येतो. त्यामुळे यावर पक्षी बसून पिकातील अळ्या वेचून खातात.
- आंतरपिकांचे आपत्कालीन पीक नियोजनात महत्त्व-निसर्गाचा लपंडाव हा कायम चालू असतो कधी पाऊस वेळेवर येतो तर कधी त्यामध्ये खूप मोठा खंड पडतो. कधीकधी सारखा पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करण्यात नाकीनऊ येतात. अशा परिस्थिती मध्ये आंतरपीक पद्धती फायद्याचे ठरते. त्यासाठी शेतकरी बंधूंनी सुचवल्याप्रमाणे आंतरपीक पद्धती अमलात आणावी. नियमित पावसाळा दोन किंवा तीन आठवडे सुरू झाल्यास म्हणजेच दोन ते पंधरा जुलै दरम्यान सुरू झाल्यास कपाशी पिकात मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश करावा संपूर्ण क्षेत्रावर एकच पीक न घेता थोड्या थोड्या क्षेत्रावर ही पिके घ्यावी.
काही क्षेत्रावर (कापूस + ज्वारी + तुर + ज्वारी)6:1:2:1 किंवा 3:1:1:1 या ओळींच्या प्रमाणात घ्यावी. त्यामुळे एकूण उत्पादन आणि उत्पन्नाचा अधिक फायदा होतो. सोयाबीन पिकात दोन, सहा आणि नवरी नंतर एक ओळ तुरीची आपल्या सोयीनुसार घ्यावी. नियमित पावसाळा पाच आठवड्यांपेक्षा जास्त उशिरा सुरू झाल्यास म्हणजे 23 ते 29 जुलै दरम्यान पाऊस झाल्यास कापसाची पेरणी करणे टाळावे.परंतु काही क्षेत्रावर कापसाची लागवड करणे अनिवार्य असल्यास केवळ देशी कपाशीचे सरळ आणि सुधारित वाण वापरावे. तसेच कापसाच्या ओळींची संख्या कमी करून एक किंवा दोन ओळी तुरीच्या आवर्जून घ्याव्यात. तसंच इतर पिकांमध्ये देखील तुरीचे आंतरपीक घेता येते.
Share your comments