1. कृषीपीडिया

Crop Planning: विविध पिके व त्यामधील आंतरपिके देतील शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी,नक्की वाचा माहिती

मुख्य पिकामध्ये आंतरपीक घेणे एक फायद्याची गोष्ट असून शेतकऱ्यांना पिकांच्या बाबतीत जी काही जोखीम असते ही कमी करण्याचे काम आंतरपिमुळे होते. आंतरपिकांची निवड करताना मुख्य पिकाचे अंतर लक्षात घेऊन करणे खूप गरजेचे असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर केळी आणि पपईच्या बागेमध्ये अंतर कमी असते त्यामुळे पहिल्या वर्षी काही हंगामी भाजीपाला पिकांचे आंतरपीक म्हणून लागवड आर्थिक दृष्ट्या खूप फायद्याचे ठरू शकते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
intercroping

intercroping

 मुख्य पिकामध्ये आंतरपीक घेणे एक फायद्याची गोष्ट असून शेतकऱ्यांना पिकांच्या बाबतीत जी काही जोखीम असते ही कमी करण्याचे काम आंतरपिमुळे होते. आंतरपिकांची निवड करताना मुख्य पिकाचे अंतर लक्षात घेऊन करणे खूप गरजेचे असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर केळी आणि पपईच्या बागेमध्ये अंतर कमी असते त्यामुळे पहिल्या वर्षी काही हंगामी भाजीपाला पिकांचे आंतरपीक म्हणून लागवड आर्थिक दृष्ट्या खूप फायद्याचे ठरू शकते.

तसेच काही फळ बागा या दीर्घकालीन असतात जसे की मोसंबी, संत्रा किंवा डाळिंब तसेच पेरू इत्यादी फळबागांचा कालावधी हा 25 ते 30 वर्षापर्यंत देखील राहू शकतो व उत्पन्न चालू होण्याचा कालावधी हा तीन वर्षाच्या पुढेच असतो.

त्यामुळे अशा मध्ये आंतरपिके घेतल्यास अधिक आर्थिक उत्पन्न मिळते. या लेखात आपण असेच काही पिके आणि त्यामध्ये घेता येण्याजोगी आंतरपिकांची माहिती घेऊ.

नक्की वाचा:केळी उत्पादकांसाठी मोलाचा सल्ला! खूपच कडक ऊन आहे तर मग अशा पद्धतीने घ्या लहानशा केळीच्या रोपाची काळजी

विविध पिके त्यातील आंतरपीके

1- कोबीचे आंतरपीक- जर तुम्ही डाळिंबाची बाग करत असाल यामध्ये तुम्ही कोबी आणि फ्लॉवर यांचे आंतरपीक म्हणून लागवड करू शकता.  रब्बी हंगामामध्ये डाळिंब लागवडीनंतर पहिल्या वर्षी ही आंतरपिके घेऊन एकरी उत्पन्न चांगले मिळवता येते.

तसेच चवळी किंवा श्रावणी घेवडाया सारख्या द्विदल वर्गीय भाजीपाला पिकांचे उत्पादन जमिनीची सुपीकता वाढविण्यास मदत करते व आर्थिक उत्पन्न देखील मिळते.

2- केळीमध्ये फुलकोबीचे आंतरपीक- केळीची लागवड जर आठ बाय पाच फूट अंतरावर केली असेल तर केळीच्या दोन ओळींमध्ये फुलकोबीचे आंतरपीक म्हणून निवड करता येते. एक एकर केळीच्या बागेत जर फुल कोबीची आंतरपीक म्हणून लागवड केली तर एकरी दहा टन उत्पादन मिळणे शक्‍य आहे. त्यामुळे केळी बाग यावरील खर्च निघणे सोपे जाते.

नक्की वाचा:जानेवारी ते मार्च दरम्यान करा खरबुजाची लागवड, 80 ते 100 दिवसात कमवा चांगला नफा

3- काकडीमध्ये मिरचीचे आंतरपीक- जर तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये चार फुटांचे बेड तयार करून त्यावर दीड फूट अंतरावर जर काकडीची लागवड केली तर तीन आठवड्यांनी काकडीमध्ये मिरचीची रोपे दीड फुटावर लावावी. काकडीचे एकरी दहा टनांपर्यंत उत्पादन मिळणे शक्‍य असून एका पिकातील उत्पन्नातून दुसऱ्या पिकातील खर्च कमी होतो.

4- केळी बागेत खरबूज- केळी बागेमध्ये सुद्धा खरबूज लागवड फायद्याची ठरू शकते. केळीच्या दोन ओळींमध्ये खरबुजाची लागवड करता येते. खरबुजाचे एकरी 10 ते 12 टन उत्पादन यामध्ये मिळू शकते.

5- तोंडलीत मिरची आंतरपीक- तोंडलीची लागवड केल्यानंतर पहिल्या दोन वर्षापर्यंत त्यामध्ये उन्हाळ्यात ढोबळी मिरची किंवा साध्या मिरचीचे यशस्वी उत्पादन अनेक घेत आहेत.

जर उन्हाळ्याचा विचार केला तर तेव्हा कडक सूर्यप्रकाश व जास्त तापमान असते. मात्र तोंडलीचा वेल मंडपावर चढवला असेल तर मंडपा खाली अर्ध सावलीची परिस्थिती असल्यामुळे त्यामध्ये मिरचीचे पीक चांगल्या प्रकारे बहरते व जास्तीच्या उन्हामुळे मिरची मध्ये येणारी फुलगळीची समस्या देखील कमी होते व मिरचीचे उत्पादन भरपूर मिळते.

नक्की वाचा:एकदा वापराच! जमिनीची जलधारण क्षमता आणि पोत वाढवायचा असेल तर कोंबडी खताशिवाय नाही पर्याय

English Summary: intercropping in fruit orchred of root crop is benificial and give more profit to farmer Published on: 29 July 2022, 07:17 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters