
fall army worm
महाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म म्हणजेच लष्करी आळी मका पिकावर गंभीर रूप धारण करीत आहे. ही कीड मका पिकावर उपजीविका करणारी कीड आहे. तिचा प्रादुर्भाव भारतात जून 2018 मध्ये सर्वप्रथम आढळला होता. मोठ्या सोबतच ऊस तसेच ज्वारी या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान या किडी मुळे होते. या लेखात आपण लष्करी आईचे मका पिकावरील आर्थिक नुकसान पातळी कशी ओळखायची? आणि तिचे एकात्मिक नियंत्रण याबद्दल माहिती घेऊ.
मका पिकावरील लष्करी अळीचे आर्थिक नुकसान संकेत पातळी
- मका पिकाची रोपआवस्था ते सुरुवातीची पोंगा अवस्था( उगवणीनंतर दोन आठवड्यांपर्यंत) तीन पतंग प्रति सापळा किंवा पाच टक्के प्रादुर्भावित झाडे.
- सुरुवातीची पोंगा अवस्था ते मध्य पोंगा अवस्था( उगवणीनंतर दोन ते चार आठवडे ) पाच ते दहा टक्के प्रादुर्भावित झाडे
- मध्य पोंगा अवस्था ते उशिराची पोंगा अवस्था ( उगवणीनंतर चार ते सात आठवडे ) 10 ते 20 टक्के प्रादुर्भावित झाडे
- उशिराची पंगा अवस्था ( उगवणीनंतर सात आठवड्यांपुढे ) 20 टक्क्यांपेक्षा जास्त प्रादुर्भावीतझाडे
- तुरा लागण्याची अवस्था ते पीक काढणी- दहा टक्क्यांपेक्षा जास्त कणसाचे नुकसान
लष्करी आळी चे एकात्मिक नियंत्रण
- पाऊस पडण्याआधी खोल नांगरट करावी.त्यामुळे किडीची कोषावस्था प्रकर सूर्यप्रकाशाच्या तसेच पक्ष्यांच्या संपर्कात येऊन मरून जाते.
- पिकांची फेरपालट अत्यावश्यक असते. मका घेतलेल्या शेतात त्यानंतर भुईमूग अथवा सूर्यफूल घ्यावे.
- पेरणी पाऊस पडल्यानंतर करावी. उशिरा पेरणी टाळावी.
- एकाच वेळी पेरणी केल्यामुळे एका प्रदेशातील मका एकाच वेळी वाढतो. दीदीला प्रत्येक वाढीच्या अवस्थेतील मका उपलब्ध होत नाही.
- आंतरपिके घेऊन पिकांची विविधता साधावी.
- मका पिकाच्या बाजूने नेपिअर गवताची लागवड करावी. नेपियर गवताचा उपयोग सापळा पीक म्हणून करता येतो.
- मका पेरणी नंतर लगेच एकरी दहा पक्षी थांबे उभारावेत.
- पानांवर दिसणारे अंडीपुंज व सुरुवातीच्या अवस्थेतील अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
- किडीच्या सर्वेक्षणासाठी पीक उगवून येण्यापूर्वी एकरी पाच कामगंध सापळे लावावे.
- नर पतंग पकडण्यासाठी हेक्टरी 15 कामगंध सापळे लावावेत.
- पंगा व्यवस्थित तयार होईल त्यावेळी माती आणि राख किंवा चुना यांचे 9:1या प्रमाणात मिश्रण घेऊन त्यात टाकावे. त्यामुळे पोंग्यातील अळ्यांवर परिणाम होतो.
- मधु मका किंवा बेबी कॉर्न मध्ये 1500 पीपीएम आजा अझाडिरेक्टिन 500 मिली प्रति लिटर पाणी प्रमाणात घेऊन सुरवातीच्या वाढीच्या काळात फवारणी घ्यावी.
- प्रादुर्भाव दिसू लागताच जैविक कीटकनाशक नोमुरीया रिलाई तीन ग्रॅम किंवा मेटारायझियमअनीसोप्लिपाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या वर गेल्यास खालील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.द्रावण पोंग्यात जाईल याची काळजी घ्यावी.
- थायमेथॉक्झाम 12.6 अधिक पाच मिलि
लॅम्बडा सायक्लोथ्रीन9.5 झेड सी
क्लोर ऑट्रानीलीप्रोल(18.5 एस सी ) चार मिली हे सगळे प्रमाणनॅपसेकपंपासाठी आहे.
Share your comments