1. कृषीपीडिया

भरघोस उत्पन्नासाठी भेंडी पिकावरील किडींचे करा व्यवस्थापन

महाराष्ट्रामध्ये भेंडी या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील बऱ्याचशा भागांमध्ये भेंडी पिकाची लागवड केली जाते. भेंडी या पिकास वर्षभर बाजारात चांगल्या प्रकारची मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचा स्त्रोत म्हणून भेंडीकडे पाहिले जाते.

KJ Staff
KJ Staff


महाराष्ट्रामध्ये भेंडी या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील बऱ्याचशा भागांमध्ये भेंडी पिकाची लागवड केली जाते.  भेंडी या पिकास वर्षभर बाजारात चांगल्या प्रकारची मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचा स्त्रोत म्हणून भेंडीकडे पाहिले जाते.  परंतु भेंडी पिकावर वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचे प्रादुर्भाव आढळून येतो. त्याचे व्यवस्थापन कसे करायचे व नियंत्रण कसे मिळवावे याबद्दल माहिती या लेखात आपण करणार आहोत.

भेंडीवरील कीड व त्यांचे नियंत्रण

  • तुडतुडे - या किडीच्या अंडी निमुळत्या आकाराची असून फिकट पिवळसर रंगाचे असतात. पिले हे पांढरा फिकट हिरव्या रंगाची असून तिरपी चालतात. या किडीची पिल्ले आणि प्रौढ पानांच्या खालिल पृष्ठभागावर राहून पानांमधील रस शोषणाचे काम करतात. त्यामुळे पाणी हे पिवळसर होतात आणि चुरडलेल्या सारखी दिसतात.

 किडीवरील नियंत्रण

जर भेंडीवर तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसायला लागल्यास इमिडाक्लोप्रिड ७० टक्के दहा मिली प्रति १५  लिटर पाण्यातून फवारणी करावी  किंवा ४ टक्के निंबोळी अर्काची फवारणी आठ दिवसांच्या अंतराने आलटून पालटून केली तरी चालते.

     पांढरी माशी

 ही कीड विविध भाजीपाला तसेच इतर पिकांवर आढळून येते. तिकीट झाडाच्या पानांमध्ये रस शोषून घेते. या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास झाडाची पाने  पिवळी पडतात. तसेच हि किड विषाणू रोगांचा प्रसार करण्यास कारणीभूत ठरते. या किडीचा प्रादुर्भाव जास्त न होण्यासाठी शेत तणमुक्त ठेवणे फार गरजेचे असते. तसेच युरियासारख्या नत्रयुक्त खतांचा जास्त पुरवठा करणे टाळावे. पिकांवर मित्र किडींचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत. पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. हे पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी परिणाम कारण दिसून आली आहे. तसेच इमिडाक्लोप्रिड १० मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा असितांप्रीड सहा ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डायमिथोएट ३० टक्‍के प्रवा १० मिली प्रति १५ लिटर पाण्यात फवारणी करावी.


पाने खाणारी अळी

 यावेळी प्रामुख्याने झाडाची पाने आणि फळे खाते. या किडीचा प्रादुर्भाव वर्षभर शेतात दिसतो. त्यामुळे या किडीमुळे जास्त नुकसान होते. या किडीची मादी पानांच्या पाठीमागे पुंजक्याने अंडी घालते. अतिशय खादाड असतात.

 नियंत्रण

 या किडीच्या नियंत्रणासाठी किडलेल्या कळ्या, फळे गोळा करून जाळून टाकावीत. या किडीची कोषावस्था पाला-पाचोळामध्ये असल्यामुळे ते गोळा करून जाळून टाकावेत. पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. किडीची अंडी दिसून येतात ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवी किटकाचे ५ ते १०  ट्रायकोकार्ड ८ ते १०  दिवसांच्या अंतराने लावावेत. किंवा सायपरमेथ्रीन २५ टक्‍के प्रवाही ४ मिली किंवा फेनवोल रॅट २० टक्‍के प्रवाही ५  मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वरीलप्रकारे रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केल्यावर ५  ते ७ दिवस भेंडीचे काढणी करू नये.

  फुलकिडे

 ही कीड लहान असून या किडीचे प्रौढ असून लांब सर आकाराच्या असतात. हे कीटक आपण सहजरीत्या पाहू शकतो. या किडीची पिल्ले आणि प्रौढ आपल्या तोंडाने झाडाच्या कोवळ्या पेशी आणि फुले कुरतडतात. आणि त्यातून येणारे द्रव्य शोषून घेतात. त्यामुळे झाडाची फुले वाळून जातात आणि गळून पडतात. त्यामुळे जास्तीचे फल लागत नाही परिणामी उत्पन्नात घट दिसून येते. तसेच ही कीड पानांमधून रस शोषण करत असल्यामुळे झाडे पिवळी पडतात.

  फुल किडीचे नियंत्रण

या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८  एस एल २ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.


कोळी

 ही कीड भेंडी पिकातील सगळ्यात नुकसान कारक कीड आहे. या किडीचे प्रौढ पानाच्या मागच्या बाजूस राहून रस शोषण करतात. त्यांच्या अंगावर बारीक रेशमी धाग्याचे जाळे असते. रस शोषण केल्यामुळे पानाच्या वरील पृष्ठभागावर असंख्य पांढरे ठिपके पडतात. प्रादुर्भावग्रस्त पाणी हळूहळू चुरगळतात आणि आकसले जातात. झाडाची वाढ खुंटते आणि उत्पादनात घट येते.

  नियंत्रण

 ३०० मेष सूक्ष्म गंधकाच्या भुकटीची धुरळणी अथवा ८० टक्के पाण्यात मिसळणारे गंधक भुकटी २५ ते  ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 एकात्मिक कीड व्यवस्थापन

1- उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीतील किडींच्या सुप्तावस्था उन्हामुळे व कोश मोकळे झाल्यामुळे पक्षी खाऊन मोकळे करतात.

किडींना पर्यायी खाद्य वनस्पती उपटून नष्ट कराव्यात. भेंडी पिकाची लागवड ही वेळेवर करावी तसेच खताच्या मूळ योग्य मात्रा वापराव्यात. नत्राची मात्रा अतिरिक्त देऊ नये. एकाच प्रकारचे पीक न घेता पिकांची फेरपालट करावी. लागवडीपूर्वी बियाण्यास ७०% थायमेथॉक्झाम किंवा इमिडाक्लोप्रिड पाच ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. कीडग्रस्त भेंडी तोडून नष्ट कराव्यात. ठिपक्याची आळीसाठी शेतामध्ये कामगंध सापळे लावावेत. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळ्या किंवा चिकट सापळे प्रति हेक्‍टरी दहा लावावेत. कीटकनाशकांचा अनावश्‍यक वापर टाळावा. वरीलप्रमाणे जर आपण नियंत्रण केले व व्यवस्थित तंत्रशुद्ध व्यवस्थापन केले तर भेंडीच्या भरघोस उत्पादन येऊ शकते.

English Summary: Insect management on lady finger to more production Published on: 29 September 2020, 07:02 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters