बटाटा पिक हे महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये घेतल्या जाते. इतर पिकांप्रमाणेच बटाटा पिकावर देखील काही प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव होतो.या रोगांवर वेळीच नियंत्रण केले नाही तर फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते.या लेखात आपण बटाटा पिकावरील प्रमुख रोगांविषयी व त्यांचे व्यवस्थापन या विषयी माहिती घेऊ.
बटाट्या वरील प्रमुख रोग आणि व्यवस्थापन
- चारकोलरॉट- या रोगाचा प्रसार मुख्यतः जमिनीतून होतो. जमिनीचे तापमान जर 32 सेल्सिअसपेक्षा अधिक झाले तर ते रोगजंतूनापोषक ठरते.या रोगामुळे साठवणीतील बटाटेसडतात. जमिनीचे तापमान 32 अंश सेल्सिअस यावर चढण्यापूर्वी बटाट्याची काढणी करावी किंवा पाणी देऊन जमिनीचे तापमान कमी ठेवावे.
- देठ कुरतडणारी आळी-ही अळी राख्या रंगाच्या असून रात्रीच्या वेळी खोडा जवळील भाग कुरतडतात.पाने व कोवळी देट खातात. एचडी च्या बंदोबस्तासाठी क्लोरेड एम पाच टक्के पावडर हेक्टरी 50 किलो हेक्टरी जमिनीवर सायंकाळी धुराळावि.
- मावा व तुडतुडे- या किडी पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात. याच्या नियंत्रणासाठी लागवडीनंतर 15 दिवसांनी मिथिल डिमॅटॉन 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून किंवा फोस्पॉमिडोन85 डब्ल्यू एमसी 10 मिली 10 लिटर पाण्यात फवारावे.
- बटाट्यावरील पतंग-ही कीड बटाट्याचे अतोनात नुकसान करते.या किडींची सुरुवात शेतातून होते. परंतु नुकसान हे साठवणुकीच्या काळात दिसून येते. या किडीच्या अळ्या पानात देठात व खोडात शिरून पोखरतात.बटाट्या मध्ये शिरून या अळ्या आतील भाग पोखरून खातात. एचडी च्या बंदोबस्तासाठी कार्बरील 50 डब्ल्यू पी 1.5 किलो 750 मिली पाण्यात मिसळून फवारावे.
Share your comments