मुसळधार पावसानंतर काहीं ठिकाणींना पावसाने उघडीप दिली असल्यामुळे आद्रतेचे प्रमाण वाढले जाते. अशा परिस्थितीत भात पिकावर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. साधारण जुलै ते डिसेंबर हा किडींचा प्रादुर्भाव कालावधी आहे. विशेषकरून ज्या रोपवाटिका वरकस जमिनीत केलेल्या आहेत तसेच हलक्या जातीच्या लागवड ज्या ठिकाणी केलेली आहे, त्या ठिकाणी किडींचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसतो.
तपकिरी तुडतुडे (BPH, Brown plant hopper, Nilaparvata lugence)
प्रादुर्भावाची लक्षणे
प्रौढ व पिल्ले धानाच्या बुंध्यातुन व खोडातून सतत रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडून झाड निस्तेज होऊन, सुकून वाळते.
प्रादुर्भाव शेतात मध्य भागातून गोलाकार खळ्याप्रमाणे सुरु होऊन शेत जळाल्यासारखे दिसते, यालाच ''हॉपर बर्न'' असे म्हणतात.
अशा रोपांना लोंब्या येत नाहीत आणि समजा आले तर दाणे न भरताच पोचट राहतात. प्रादुर्भावग्रस्त पेंढा जनावरांना खाण्यायोग्य राहत नाही.
नियंत्रणाचे उपाय
प्रतिकार जातीचा वापर करावा जसे, अरुणा, ए.डी.टी-३६, को-४२, को-४६, आय.आर-३६, आय.आर-७२.
रोपे शिफारस केलेल्या अंतरावर लावावीत. दाट लागवड करू नये.
प्रत्येक २.५ मी नंतर ३० से. मी. जागा तन काढणीसाठी सोडावी.
नत्र असलेल्या खतांचा वापर प्रमाणात करावा, अती वापर करू नये. पोट्याश जास्त वापरल्यास फायदा होतो.
रात्री प्रकाश सापळे व दिवसा पिवड्या भांड्याचा सापळा लावावे.
कीडनाशकाचा वापर करण्याआधी पाण्याचा योग्य निचरा करावा.
प्रत्येक चुडात ५ ते १० तुडतुडे आढल्यास, फ्लोनिकॅमीड ५० टक्के दानेदार ३ ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस २० ईसी २५ मिली किंवा कार्बोसल्फान २५ टक्के १६ मिली प्रति १० लिटर पाणी घेऊन फवारणी करावी .
2) लष्करी अळी (Swarming rice caterpillar,Spodoptera mauritia)
प्रादुर्भावाची लक्षणे
अळया लष्कीराप्रमाणे हल्ला करतात. रोपांना मोठया प्रमानात कुरतडतात.
अळया पाने कुरतडतात त्यामुळे धानाचे पिक निष्पर्ण होते. तसेच पीक लोंबी अवस्थेत असताना या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास धानाच्या लोंब्या कुरडल्यामुळे शेतात लोंब्याचा सडा पडलेला आढळतो.
अळया रात्री कार्यक्षम असून दिवसा धानावर, बेचक्यात व बांधावरील गवतात लपून बसतात .
नियंत्रणाचे उपाय
ज्या विभामध्ये प्रादुर्भाव आहे. त्याठिकाणी भातखाचरात तीन ते चार पक्षी बसण्याचे थांबे उभे करावेत जेणेकरूण पक्षी या अळया नष्ट करतील.
बेडूक किंवा बदकचे संवर्धन करावे.
जास्त प्रादुर्भाव असल्यास बांधीत पाणी भरावे. पिकावरुन दोर किंवा झाडाच्या फांदया आडव्या फिरवुन पाने गुंडाळणा-या लष्करी अळया पकडाव्यात.
सायंकाळच्या सुमारास वारा शांत असताना कीडनाशकांचा वापर करावा. डायक्लोरोव्ह्स ७६ ईसी १२.५ मिली प्रती १० लिटर पाणी घेउन फवारणी करावी.
3) गादमाशी (Gall midge, Orseolia oryzae)
प्रादुर्भावाची लक्षणे
अंडयातून बाहेर पडलेली लहान अळी धानाच्या मुख्य खोडत शिरुन बुध्याजवळ स्थिरावते व त्यावर उपजिविका करीत असते .
त्यामुळे मुख्य खोडाची वाढ न होता नळी अथवा ‘’चंदेरह पोगा’’ तयार होतो अशा पोग्या ला लोंबी धारीत नाही.
तसेच बुध्याच्या बाजूला अनेक फुटवे फुटलेले दिसतात.
नियंत्रणाचे उपाय
बांधावरील देवधान नष्ट करावे.
कापनी नंतर शेतात नांगरणी करन धस्कटे नष्ट करावीत.
पोटॉश खताचा प्रमाणात वापर करावा.
रोवणी करताना गादमाशी मुक्त रोपांची लावणी करावी उदा. एम.डी, यु-३, शक्ती, विक्रम, सूरेखा इत्यादी.
नियंत्रणासाठी फोरेट १० टक्के दानेदार १० किलो प्रति हेक्टर बांधीमध्ये मिसळून दयावे. इथोफेनप्रॉक्स १० टक्के प्रवाही १५ मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ५ मिली किंवा थीओमेथॉक्झाम २५ टक्के दानेदार २ गॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
4) खोड किडा (Stem borer yellow, Scripophaga incertulas Walker)
प्रादुर्भावाची लक्षणे
अडी खोड पोखरते त्यामुळे रोपाचा गाभा मरतो व फुटवा सुकतो यालाच किडग्रस्त फुटवा / गाभामर / डेडहार्ट म्हणतात
हा फुटवा ओढल्यास सहज निघून येतो. अशा फुटव्यास दाणे न भरलेभल्या पांढऱ्या ओंब्या असतात
नियंत्रणाचे उपाय
दाट लागवड करु नये व पाण्याचा योग्य निचरा करावा.
पीक कापणी नंतर नांगरणी करून धरकटे अळयासहित गोळा करावी व नष्ट करावी शक्य असल्यास पिकाची फेरपालट करावी.
खोड किडयाचे नाश करण्यासाठी प्रकाश सापळा लावावे.
खोड किडा प्रतिकारक भात पिकाच्या जाती उदा. साकोली-८, रत्ना, जया, टी.के एम.-६, विकास इत्यादी लावावीत.
ट्रायकोग्रामा जापोनीकम या परजीवी किडींच्या ५०,००० अंडी प्रती हेक्टरी १०-१० दिवसाच्या अंतराने शेतात सोडावीत.
फोरेट १० टक्के दानेदार १० किलो प्रती हेक्टरी बांधीमध्ये पुरेसा ओलावा असतांना जमिनीत मिसळावे.
नियंत्रणासाठी अॅझाडिरेक्टीन ०.१५ टक्के, ३० ते ५० मी.ली किंवा ट्रयझोफॉस ४० टक्के १२.५-२५ मी.ली किंवा इथोफेनप्रॉक्स १० टक्के प्रवाही १५ मी.ली. किंवा फल्युबेंडामाइड २० टक्के दानेदार २.५ ग्रॅम किंवा क्लोरेट्रनिलीप्रोल १८.५० टक्के / ३ मिली किंवा फयुबेंडामाइड ३९.३५ टक्के प्रवाही १.० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
लेखक
पुनम ने. मडावी (पी.एच.डी. ची विद्यार्थीनी, किटकशास्त्र विभाग) डॉ.पं.दे.कृ.वी अकोला.
मो.नं. – 8788384520
ई.मेल. punammadavi12@gmail.com
विजय कुमार आदीमुलम (एम. एस. सी. किटकशास्त्र विभाग) कृषी साहायक, आंध्र प्रदेश.
गजानन न. चोपडे (एम. एस. सी. किटकशास्त्र विभाग) डॉ.पं.दे.कृ.वी अकोला.
Share your comments