सध्या तूर पिके अंतिम टप्प्यात आले असून खरीप हंगामातील हे शेवटचे पीक आहे. तूर पीक शेंगा आणि फुलोरा अवस्थेत असताना मागील दोन दिवसापासून झालेला पाऊस आणि सततचे ढगाळ आणि धुक्याचे वातावरण याचा फटका तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.
अशा वातावरणीय स्थितीत तूर पिकावर कोणता परिणाम होऊ शकतो आणि त्याची काय काळजी घेतली गेली पाहिजे, त्याची माहिती डॉ. डी.डी. पटाईत ( कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,वनामकृवि, परभणी) त्यांनी दिली आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया.
अशा वातावरणाचा तुरीवर काय परिणाम होऊ शकतो?
सगळ्यात जास्त महत्त्वाचे म्हणजे ढगाळ वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. तसेच शेंग माशीचा प्रादुर्भाव देखील होऊ शकतो.
अशा पद्धतीने करा व्यवस्थापन
शेंगा पोखरणारी आळी करिता-
- पूर्ण वाढ झालेल्या आळ्या वेचून नष्ट कराव्यात
- शेंगा पोखरणाऱ्या अळीचे आर्थिक नुकसानीची पातळी करण्याकरता एका एकर मध्ये दोन कामगंध सापळे लावावेत.
- शेतामध्ये इंग्रजी टी आकाराचे प्रत्येक रेबीज पक्षी थांबे लावावेत. जेणेकरून पक्षांत बारे आळ्या वेचल्या जातील व त्यांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.
- शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला तर पोते झाडाखाली टाकून झाड हलवावे आणि पोत्यावरपडलेल्याअळ्या वेळोवेळी जमा करून नष्ट करावे.
किडनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर करायचे उपाय
इमामेक्टीन बेंजोएट 5 टक्के-4.4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर 88 ग्राम किंवा स्पिनोसॅड 45 टक्के- तीन मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर 60 मिली किंवा इंडाक्साकार्ब 14.5 टक्के आठ मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर 160 मिली किंवा क्लोरॅट्रानिलिप्रोल 18.5 टक्के तीन मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर साठ मिली किंवा
फ्लूबेंडामाईड 20 टक्के पाच ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर 100 ग्रॅम किंवा क्लोरट्रानीलिप्रोल 9.3 टक्के+लॅम्बडा सायक्लोथ्रीन4.6 टक्के( संयुक्त कीटकनाशक ) चार मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर 80 मिलि फवारावे.
शेंगमाशी करता उपाय योजना
लॅम्बडासायक्लोथ्रीनपाच टक्के 8 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर 160 मिली किंवा ल्युफेनूरॉन 5.4 टक्के बारा मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर 240 मिली फवारणी करावी.
टीप- पिकावर कुठल्याही प्रकारचे फवारणी करताना कृषी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
(माहिती स्त्रोत- हॅलो कृषी )
Share your comments