सोयाबीनवर खोड किडींचा प्रादुर्भाव

24 August 2020 08:08 PM By: भरत भास्कर जाधव


सोयाबीन पिकांवर येलो मोझॅक रोगाने अॅटक केला आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक चिंतेत पडले आहेत. चांदूर बाजार तालुक्यातील सोयाबीन पीक उद्धवस्त  झाले आहे.  दरम्यान राज्य मंत्री बच्चू कडू यांनी सोयबीन पिकांची माहिती घेतली.  मराठावाड्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेत असतात. वर्षभराची उलाढाल ही सोयबीनवर अवलंबून असते.  दरम्यान यावर्य़ी सोयाबीन उत्पादकांवर मोठे संकट आले आहे. सुरुवातीला पेरणी केल्यानंतर पिके उगावली नव्हती आता किडींचा प्रादुर्भाव होत आहे.  

 खोडमीशीला कसा घालणार आळा-

खोडमाशी :

प्रादुर्भावाची वेळ : या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनची उगवण झाल्यापासून कधीही होऊ शकतो.

प्रादुर्भावाची लक्षणे : खोडमाशीचा प्रादुर्भाव पीक लहान असतानाच सहजपणे ओळखू येतो. या किडीच्या प्रौढ माशा चकचकीत काळ्या रंगाच्या असतात.

सोयाबीनचे रोप लहान असताना म्हणजे १५ ते २० दिवसांच्या आसपास जर झाडाचा शेंडा सुकून खाली झुकलेला आढळल्यास त्या झाडावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला असण्याची शक्यता असते. असा शेंडा मधोमध कापल्यास आतमध्ये लहान पिवळी अळी जमिनीच्या बाजूने डोके असलेली म्हणजेच खालच्या दिशेने खोड पोखरत जात असलेली दिसते. रोप मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मात्र तो लक्षात येत नाही. शेवटी फक्त प्रौढ माशी निघून गेलेले छिद्र फांदीच्या खोडावर दिसते.

चक्री भुंगा :

प्रादुर्भावाची वेळ : - या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनचे पीक साधारपणे २० ते २५ दिवसांचे झाल्यानंतर सुरू होताना दिसतो.

प्रादुर्भावाची लक्षणे : शेतात फिरताना झाडाचे एखादेच पान किंवा फांदी सुकलेले दिसते. पान फक्त सुकलेले असेल तर चक्रीभुंग्याने नुकतेच अंडे दिलेले असते, तर पान वाळलेले असेल तर काही दिवसांपूर्वी अंडे दिलेले असते तर पान वाळलेले असेल तर काही दिवसांपूर्वी दिलेल्या अंड्यातून लवकरच अळी निघण्याची स्थिती असेल. या किडीचा प्रौढ भुंगा फिकट तपकिरी रंगाचा असतो. त्याचे समोरचे पंख खालच्या बाजूने एक तृतीयांश ते अर्धा भाग काळया रंगाचे असतात. अंडी फिकट पिवळसर व लांबट आकराची असतात. अंडयातून ३ ते ४ दिवसानी अळी बाहेर पडते. लहान अळी पांढऱ्या रंगाची आणि पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी व गोलाकार असते. अंडयातून अळी निघाल्यानंतर ती पानाचे देठ, खोड पोखरत खाली जमिनीकडे जाते. त्यामुळे खापेच्या वरील भाग सुकून नंतर वाळतो.

व्यवस्थापन :

१)नत्रयुक्त खतांचा समतोल वापर करावा.

२)पिकात हेक्टरी 20 ते 25 पक्षीथांबे उभारावेत.

३)खोडमाशी, चक्रीभुंगा या किडींनी अंडी घालू नये यासाठी सुरुवातीलाच 5% निंबोळी अर्काची फवारणी घ्यावी.

४)किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली तर पुढील रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.

Yellow mozac soyabean soyabean disease खोड किडी सोयाबीन
English Summary: Infestation Yellow mozac soyabean

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.