1. कृषीपीडिया

जाणून घ्या तूर पिकावरील वांझरोग त्याची लक्षणे व उपाय

tur crop

tur crop

 तूर हे खरीप हंगामातील एक प्रमुख कडधान्य पीक असून मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात पट्ट्यात या पिकाची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये तूर पिकाखालील क्षेत्रांचा विचार केला तर ते जवळजवळ 13.85 हजार हेक्टर च्या पुढे आहे. पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे परंतु तूर पिकावर पडणारे अनेक बुरशीजन्य व विषाणूजन्य रोग यामुळे उत्पादनात हवी तेवढी वाढ होताना दिसत नाही. तुरीवर विविध प्रकारचे रोग पडतात. त्यामधील वा रोगाविषयी या लेखात आपण माहिती घेणार आहोत.

तुर पिकावरील वांझरोग

या रोगामध्ये झाडाला फुले व शेंगा येत नाही हे या रोगाचे मुख्य लक्षण आहे.वांझ रोग हा विषाणूमुळे होत असून या रोगाचा प्रसार हा एअरिओफीड माइट या कोळी जातीचा कीटकांमार्फत होतो. हा कोळी जवळपास  0.2मी मी लांबीचा असून हे कोळी साध्या डोळ्यांनी दिसत नाही. ते आपली अंडी कोवळ्या शेंड्यावर टाकत असून ती आपली एक पिढी दोन आठवडे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत पूर्ण करतात. या रोगाला बळी पडणाऱ्या जातींची निवड केली तर या रोगामुळे 100 टक्के नुकसान झालेले आहे.या रोगाचे प्रादुर्भाव लक्षात घेता कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी त्यांच्यामार्फत या रोगास प्रतिकार करणारे वाणाची निवड केली जाते.

 या रोगाची लक्षणे

 • रोपावस्थेत झाडाच्या पानावर प्रथम तेलकट पिवळे डाग पडतात.व प्रादुर्भाव झालेली पाने आकाराने लहान राहतात व कालांतराने आकसतात.
 • पाणी पिवळी पडून झाडाच्या 2 तेरे मधील अंतर कमी होऊन त्यांना अनेक फुटवे फुटतात व झाडांची वाढ थांबते.
 • या रोगाने प्रादुर्भावित झालेल्या झाडाला शेंगा व फुले येत नाही.
 • या रोगाचा प्रादुर्भाव हा रोपावस्थेत पासून ते पीक पक्व होण्याच्या अवस्थेत पर्यंत केव्हाही आढळून येतो.
 • या रोगामध्ये बऱ्याच वेळेस काही फांद्यांवर या रोगाची लागण दिसते व काही फांद्यांवर शेंगा देखील आलेल्या असतात. अशा झाडांना अर्ध वंध्यत्व वांझ रोग असे म्हटले जाते.

या रोगाचा प्रसार व अनुकूल हवामान

 • रोग प्रसारक कोळी वाऱ्याच्या दिशेने पाचशे मीटर पर्यंत रोगग्रस्त झाडापासून निरोगी झाडावर वाहून नेले जातात व तेथे विषाणूंचा प्रसार मोठ्या प्रमाणात करतात.
 • तुरीचा खोडवा घेतलेला असेल किंवा  उन्हाळ्यात आपोआप उगवलेल्या झाडावर हे कोळी तग धरून राहतात आणि पुढील हंगामात वाढणाऱ्या तुरीच्या पीकावर कोळी वांझ रोग आणण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे तुरीचा खोडवा घेऊ नये.
 • कमाल तापमान 25 ते 30 अंश सेंटिग्रेड,किमान तापमान 10 ते 15 अंश सेंटिग्रेड,आद्रता व जास्तीचा पाऊस या सर्व गोष्टी या रोगास पोषक आहेत.

 

या रोगाचे नियंत्रण

 • बांधावरील आधीच्या हंगामातील तुरीचा खोडवा उपटून टाकावा.
 • शेतामध्ये या रोगाने ग्रस्त झाडे दिसतात त्वरित उपटून काढावेत.
 • पेरणीसाठी रोगप्रतिकारक्षमता जातींची निवड करावी जसे की, बी एस एम आर -853, बहार, आयपीए-204 इत्यादी
 • रोगाचा प्रादुर्भाव दिसताच डायमेथोएट 30 टक्‍के प्रवाही 10 मिली किंवा डायकोफॉल 20 टक्‍के प्रवाही 25 मिली किंवा फिप्रोनील 25 टक्‍के प्रवाही सहा मिली दिवा प्रोफेनोफोस 50 टक्‍के प्रवाही चार मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणीकरावी.रोगाची तीव्रता जास्त असल्यास 10 ते 12 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters