1. कृषीपीडिया

देशी बटाट्याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; 'या' पद्धतीचा वापर केल्यास मिळणार दुप्पट उत्पन्न

शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन पिके घेऊन चांगले उत्पादन घेत असतात. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना दुप्पट उत्पादन कसे घ्यावे? याविषयी सविस्तर माहिती नसते. बटाटा शेतीतून शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतात. परंतु कोणत्या पद्धतींच्या वापराने शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतात, याविषयी जाणून घेणार आहोत.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम

शेतकरी आपल्या शेतीमध्ये (agriculture) नवनवीन पिके घेऊन चांगले उत्पादन घेत असतात. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना दुप्पट उत्पादन कसे घ्यावे? याविषयी सविस्तर माहिती नसते. बटाटा शेतीतून शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतात. त्यामुळे आज आपण बटाट्याच्या (potato) देशी जातीविषयी जाणून घेणार आहोत.

बटाट्याचा वापर प्रत्येक घरात केला जातो, त्यामुळे बटाट्याची मागणी वर्षभर राहते. लोकांच्या गरजा भागवण्यासाठी शेतकरी वर्षभर बटाट्याची लागवडही करतात. बटाट्याच्या लागवडीतून कमी वेळात दुप्पट नफा मिळवायचा असेल, तर त्यासाठी बटाट्याच्या देशी जातींशिवाय माहिती असणे गरजेचे आहे.

बटाट्याच्या देशी जाती

माहितीनुसार भारताने 2022-23 या वर्षात सुमारे 4.6 पट अधिक देशी बटाट्याची निर्यात केली होती. अशा परिस्थितीत देशातील शेतकऱ्यांसाठी ही शेती फायदेशीर ठरू शकते. देशी बटाट्याची लागवड ६० ते ९० दिवसांत तयार होते.

शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; या जिल्ह्यात लम्पीने 10 जनावरांचा मृत्यू तर 110 जनावरे बाधित

जर तुम्हाला बटाट्याची लागवड (cultivation) करायची असेल तर 'सूर्या' वाणाची पेरणी करावी. या जातीची शेतात पेरणी केल्यास ७५ ते ९० दिवसांत पीक तयार होते आणि त्याच वेळी शेतकऱ्यांना हेक्टरी ३०० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.

कमी वेळेत बटाट्याचे उत्पादन घ्यायचे असेल तर कुफरी अशोक, कुफरी चंद्रमुखी, कुफरी जवाहर या जातींची पेरणी करा. या सर्व जातींना सुमारे 80 ते 300 क्विंटल दर मिळतात.

परतीच्या पावसाचा धुमाकूळ; सोयाबीन, भुईमूग, कांदा, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

पिकाचे संरक्षण असे करा

कीटक-रोगापासून संरक्षण करण्यासाठी, कंद 0.25% इंडोफिल M45 द्रावणात 5-10 मिनिटे चांगले बुडवून ठेवा आणि नंतर ते वाळवा. त्यानंतर शेतात पेरणी सुरू करा.

कंदांवर योग्य उपचार केल्यानंतर, शेतकऱ्यांनी 14-16 तासांसाठी चांगल्या सावलीच्या ठिकाणी सोडले पाहिजे. जेणेकरुन त्यामध्ये औषधाचा लेप योग्य प्रकारे करता येईल व पीक बहरू लागेल. अशाप्रकारे लागवड केल्यास तुम्हाला चांगले उत्पादन मिळू शकते.

महत्वाच्या बातम्या 
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी खुशखबर; सोयाबीन पिकासाठी तब्बल ४० कोटी ७१ लाख रुपयांचा निधी मंजूर
'या' राशींना लाभेल भाग्याची खास साथ; जाणून घ्या संपूर्ण
दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना दिलासा; 'या' जिल्ह्यातील 55 हजार शेतकऱ्यांना 200 कोटींचे प्रोत्साहन अनुदान

English Summary: Indigenous potato cultivation profitable farmers method double income Published on: 23 October 2022, 10:49 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters