आपण शेतात चालताना शेतजमीन इतकी भुसभुशीत असली पाहिजे की त्या जमिनीवरून चालताना आपण गादीवरून चालत आहोत असा भास झाला पाहिजे, ती जमीन सुपीक, अशा जमिनीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब उपलब्ध असतो, अश्या जिवाणूंची संख्या एक ग्राम मातीत 2 कोटी 40 लाख पेक्षा जास्त असते, त्यात 130 प्रकारचे जिवाणू असतात.
आपल्या जमिनीत मुळ मित्र जिवानु समुह वाढविणे महत्वाचे आहे.रोगरोधक उत्पत्तीसाठी पिकाचे सर्व वान त्याच बरोबर जमिनीच्या इतर घटकांचे प्रमाण,जिवाणू मुळे होणाऱ्या जीवणूंचे प्रकार या सर्व गोष्टी लक्षात घेणे अतिशय महत्वाचे ठरते.ज्या पध्दतीने आपण डोळ्याने दिसू शकणाऱ्या घटकांची काळजी घेतो त्याप्रमाणे आपल्या डोळ्यांने न दिसणार्या मित्रसुक्ष्मजीवांचा अभ्यास करणे नितांत गरजेचे आहे.
आपल्या शेतात कोणकोणते मित्र जिवाणू मुळे मित्रजीवाणूसंग्रहाचे संरक्षण होईल हे बघितले जाणे आपल्या साठी आवश्यक आहे.मित्रजीवाणू जमीनीत सोडतांना त्यांना वाढविण्यासाठी विचार करायला हवा.हि आपली सर्वाची जबाबदारी आहे.
या साठी आपल्याला हे करता येईल
जमिनीत सर्व पिकांना लागणारा अन्नद्रव्यांचा साठा मुबलक असला तरी तो पिकांना उपलब्ध स्वरूपात असत नाही. जमिनीमध्ये जिवाणू असल्यास ते आपल्या जीवनचक्रातून पिकाला जमिनीतून किंवा वातावरणातून योग्य वेळी उपलब्ध करून देतात. परिणामी पांढया मुळांची संख्या व आकार वाढतो. •जिवामृताच्या वापराने जमिनीतील जिवाणूंची संख्या मोठ्या पटीत वाढवता येते.
त्यांची संख्या वाढल्यामुळे हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रमाण वाढते.
पिकांना नत्र व इतर पूरक अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे शाकीय वाढ जोमदार होते.
पीक तजेलदार, टवटवीत व निरोगी दिसून येते.
सेंद्रीय शेती पद्धतीत सेंद्रीय घटकांचा वापर वाढवल्यावर जिवाणूंना खाद्य उपलब्ध होते.
ते कुजण्याची प्रक्रिया वेगाने होते. जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते.
शेतात गांडुळांची संख्या वाढल्याने जलधारणा क्षमता वाढते.
सेंद्रीय पदार्थामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. पावसाच्या खंड काळातही झाडे तग धरू शकतात.
जिवामृताचा वापर केलेल्या शेतातील भाजीपाला व फळांची प्रत ही सर्वोत्तम मिळू शकते. त्याशिवाय चवही उत्तम होते. साठवण क्षमता चांगली राहत असल्याचा
शेतकयांचा अनुभव आहे.
जिवामृताच्या वापरामुळे कमी खर्चात चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते.
त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात
१जिवाम्रुत तयार करणे
२बिजामृत तयार करणे
३वेस्टडिकंपोझर तयार करणे
४गोक्रुपाअम्रुत तयार करणे
५रायझोबियम
६पिएसबी
व ईतरही गोष्टी शेतात तयार करुन त्याचा वापर शेतात केल्यास मित्रसुक्ष्मजीव जमीनीत वाढतील व नक्कीच जमीन हि सुपिक व नरम बनेल पर्यायाने जमीनीतील सेंद्रिय कार्ब वाढेल व जमीन जिवंत राहील.
Share your comments