1. कृषीपीडिया

पावसाळ्यामध्ये सर्व पिकांमध्ये भेडसावणारी समस्या,बुरशीजन्य रोग

बीज व मातीजनीत बुरशीजन्य रोग आपण कसे रोखू शकतो तर ते आपण जाणून घेऊयात. खरीप हंगाम चालु आहे. विविध पिके जोमाने वाढत आहे.पिकांच्या वाढ अवस्थेत आपल्याला बऱ्याचदा दिसून येते की झाड सुकलेले,बुडक्याजवळ कुज लागली आहे

KJ Maharashtra
KJ Maharashtra
पावसाळ्यामध्ये सर्व पिकांमध्ये भेडसावणारी समस्या,बुरशीजन्य रोग

पावसाळ्यामध्ये सर्व पिकांमध्ये भेडसावणारी समस्या,बुरशीजन्य रोग

उगवून येतानाच निकृष्ट उगवून आले आहे. झाड उपसून पाहिले तर मुळे कुजल्याचे निदर्शनास येते. या सर्व समस्यांचे मुख्य कारण माती व बीजजनीत बुरशी असु शकतात.मग यासाठीच विविध माती व बीज जनीत बुरशी रोगांची ओळख व प्रतिबंधक/नियंत्रण उपाय माहिती असणे गरजेचे असते.

 थोडक्यात प्रसार:- मातीमध्ये हजारो प्रकारच्या बुरशी,जिवाणू,विषाणू, निमेटोड्स असतात. त्या आपली संख्या वाढवण्यासाठी बुरशी पिकाच्या मुळावर वाढत असतात.जेव्हा त्या मुळातून शिरकाव करतात.तेव्हा झाडाच्या वरील भागास अन्नद्रव्य-पूरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. झाडाची वाढ खुंटते/झाड वाळते. विल्ट,शेंडा वाळने, खोडकुज, मूळकुज अशी लक्षणे दिसतात. यास अनेक बुरशी जसे फ़ायटोप्थेरा,पायथीअम,रायझोक्टीना कारणीभूत असतात.

पिकानुसार बुरशी प्रकार बदलतो. आपण सर्वसाधारण एकत्रित आढावा घेतोय. मग या रोगांचे बीजाणू पालापाचोळा,बिया,किंवा येतात.यजमान तणांवर सुप्तावस्थेत असतात.हे बीजाणू अनेक महिने जमिनीत किंवा जिथे असतील तिथे महिनोन्महिने टिकून राहू शकतात.जेव्हा तिथे अनुकूल वातावरण तयार होईल तेव्हाच ते आपला प्रभाव दाखवतात.परिणामी पीक कमी होते,उत्पादन घटते,दर कमी भेटतो.

प्रतिबंध व नियंत्रण उपाय:-द्विदल पिके घेत असाल तर एकदलीय पिकासोबत फेरपालटणी करावी.

एकच पीक एकसारखे घेऊ नये.

उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करून जमीन तापू द्यावी जेणे करून बुरशीचे बीजाणू तापमान निष्क्रिय होतील.

भरखतांमध्ये चांगल्या कुजलेल्या सेंद्रिय खतांचा वापर करावा.त्यामध्ये निंबोळी पेंडीचा देखील समावेश असावा.

रोग मुक्त बियाणे तसेच रोगप्रतिकारक्षम वानांना प्राधान्य द्यावे.

पेरणी आधी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाने बीज प्रक्रिया करावी.त्यामुळे मुळात इतर कोणत्याही उपद्रवी बुरशींची वाढ होणार नाही.

 ट्रायकोडर्मा उपलब्ध नसल्यास थायरम किंवा कॅप्टन अशा 

 रासायनिक बुरशीनाशकांचा आधार घ्यावा.

गोमूत्र व जीवामृत हे उत्तम बुरशीनाशक आहेत.त्यांची आळवणी केल्यास मर/कुज रोग नियंत्रण चांगल्या पध्दतीने

तरीसुद्धा मातीजणीत बुरशी रोगांचा प्रादुर्भाव आढळल्यास कार्बेन्डाझिम,कार्बोक्झिन,क्विंटोझेन यांसारखी बुरशीनाशके वापरावीत.

कोणतेही रासायनिक बुरशीनाशक वापरताना लेबल क्लेम नक्की तपासा.

 

संकलन - IPM school, सचिन चौगले,रुकडी,कोल्हापूर

प्रमोद अंभोरे, बारामती , पुयेड ज्ञानेश्वर,नांदेड

प्रतिनिधी - गोपाल उगले

 

English Summary: in rainy season problems of fungus diseases in all crops Published on: 02 October 2021, 05:47 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters