मागील दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात तसेच उत्तर महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणाततापमानात घट झाली आहे. हवामान अंदाजानुसार अजून चार ते पाच दिवस तरी थंडीची लाट कायम राहणार असल्याने याचा अप्रत्यक्ष परिणाम हा रब्बी हंगामातील गहू,ज्वारी आणि हरभरा पिकाला होणार आहे.
त्यासाठी शेतकऱ्यांनी थंडीत योग्य व्यवस्थापन आणि उपाययोजना करण्याची गरज आहे. उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर गेल्या दोन दिवसांपासून थंडीची प्रचंड लाट आहे. अजून पाच दिवस ही लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून वर्तविण्यात आले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र घेतल्या जाणाऱ्या पपई आणि केळी बागांची काळजी घेतली पाहिजे.
यासाठी द्राक्षाच्या घडांना प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन करावे. तसेच बागेला रात्रीचे पाणी दिल्यास बागांमधील तापमान नियंत्रित राहते. तसेच बागांमध्ये शेकोटी करावी याचा फायदा बांगाना होतो.त्याच्यासोबत होणारे दुष्परिणाम देखील होत नाही.या काळामध्ये आपल्या फळबागांची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे प्राध्यापकडॉ. पद्माकर कुंदे यांनी सांगितले आहे.
रब्बी हंगामातील गहू सारख्या पिकांना ही थंडी पोषक असली तरी तापमान 9 अंश सेल्सिअसच्या खाली गेले तर त्याचा परिणाम गहू, हरभरा आणि ज्वारी पिकावर होत आहे.
थंड वातावरणामुळे गहू आणि ज्वारी वर मावा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेचकृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करण्याचा सल्ला दिला आहे.त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
Share your comments