1. कृषीपीडिया

पालक लागवड: या पद्धतीने पालक लागवड केल्यास मिळेल जास्त उत्पादन

पालक हे एक लोकप्रिय भाजीपाला पीक असून कमी कालावधीतचांगले उत्पन्न या पिकाच्या माध्यमातून मिळते. पालक हे एक औषधी गुणांनी युक्त असे भाजीपाला पीक आहे.जर आपण व्यवस्थित व्यवस्थापन आणि नियोजन करून जर पालकांचे उत्पादन घेतले तर चांगला फायदा होतो. या लेखात आपण पालक लागवडीची सुधारित पद्धत पाहणार आहोत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
spinch crop

spinch crop

पालक हे एक लोकप्रिय भाजीपाला पीक असून कमी कालावधीतचांगले उत्पन्न या पिकाच्या माध्यमातून मिळते. पालक हे एक औषधी गुणांनी युक्त असे भाजीपाला पीक आहे.जर आपण व्यवस्थित व्यवस्थापन आणि नियोजन करून जर पालकांचे उत्पादन  घेतले तर चांगला फायदा होतो. या लेखात आपण पालक लागवडीची सुधारित पद्धत पाहणार आहोत.

अशा पद्धतीने करा पालक लागवड

जमिनआणिहवामान

  • पालकाचे पीक हे वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये घेता येते.
  • अगदी खारवट असलेल्या जमिनीमध्ये सुद्धा पालक पिकघेता येते.
  • पालक हे हिवाळी पीक आहे.
  • पालक हे पीक अत्यंत कमी कालावधीत येते.
  • आपल्याकडे कडक उन्हाळ्याचे दोन महिने वगळता सर्व महिन्यांमध्ये पालक पीक घेता येते.
  • जास्त तापमानामध्ये जर पालकचे पीक घेतले तर त्याचा दर्जा घसरतो.

पालकाची लागवड

  • पालकच्या भाजीचा सतत पुरवठा करता यावा यासाठी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने टप्प्याटप्प्याने बियांची पेरणी करावी.
  • पालक लागवडीसाठी सपाट वाफ्याचा वापर करणे फायदेशीर ठरते.
  • त्यानंतर बिया फोकून पेरणी करावी.
  • त्यानंतर बिया मातीत पेरून त्यावर हलके हलके पाणी द्यावे.
  • 2 बिया यांमधील अंतर पंचवीस ते तीस सेंटिमीटर ठेवावे.
  • दाट लागवड करू नये.वालाची लागवड तर दाट झाली तर पिकाची वाढ पूर्णपणे होत नाही.
  • 25 ते 30 किलो बियाणे प्रति हेक्‍टर लागते.

 पालक पिकासाठी खते आणि पाणी व्‍यवस्‍थापन

1-पालक पिकासाठी नत्राचा पुरवठा जास्त प्रमाणात करावा लागतो.

2- जमिनीत ओलावा असणे गरजेचे असल्यामुळे नियमित  पाण्याचा पुरवठा करावा.

3- पालक पिकासाठी जमिनीला जवळ-जवळ 20 गाड्या शेणखत, 40 किलो स्फुरद, 40 किलो पालाश आणि 80 किलो नत्र देणे गरजेचे आहे.

4- शेणखत हे पूर्वमशागत करताना जमिनीत मिसळून द्यावे.

5- पालकच्या पानांना हिरवेपणा यावा आणि उत्पादनात चांगली वाढ व्हावी यासाठी बी उगवल्यानंतर पंधरा दिवसांनी आणि कापणीनंतर दीड टक्का युरिया फवारावा.

  • पिकाला नियमित पाणी द्यावे.
  • हिवाळ्यामध्ये लागवड केली असेल तर पाणी देताना दहा ते पंधरा दिवसांचा गॅपद्यावा.
  • पिकाची काढणी करण्याच्या दोन ते तीन दिवस अगोदर पिकाला पाणी द्यावे.
  • पालक बियांची लागवड केल्यानंतर लगेचच पाणी द्यावे.

पालकची काढणी

  • पालक पेरणीच्या एका महिन्यानंतर पीक कापणीला तयार होते.
  • कापणी करीत असताना खराब पालक वेगळी काढावी.
  • पालकाची व्यवस्थित जुडी बांधून घ्यावी.
  • जुळ्या व्यवस्थित जागेत तर असून त्यावर कापड झाकून किंवा बांबूच्या टोपल्यातकिंवापोत्यात ठेवाव्यात.
  • टोपलीच्या खाली किंवा वर कडुनिंबाचा पाला ठेवला तर पालक लवकर खराब होत नाही.
  • पालकच्या जुड्यांवर जास्त प्रमाणात पाणी मारू नये अन्यथा पालक खराब होऊ शकते.

 पालकचे उत्पादन

  • 10 ते 15 टनपर्यंतहेक्‍टरीउत्पादनहोते.
  • तसेच बियाण्याचे उत्पादन दीड टन पर्यंत मिळू शकते.
English Summary: improvised ways of spinch cultivation and management for more producction Published on: 05 December 2021, 12:41 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters