रासायनिक खताच्या असंतुलित आणि अति वापरामुळे पिकांची अनैसर्गिक वाढ होवू लागली. यामुळेच रोग, किडीचे प्रमाण भरपूर वाढू लागले. त्याचे नियंत्रण करण्यासाठी मग रासायनिक किटकनासकांचा व बुरशीनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. जमिनीचा कस कमी झाली या सर्व बाबींमुळे पिकाच्या शरीर रचनेत बदल होऊन अनेक समस्या निर्माण झाल्या. जसे कि वनस्पती मधे अकस्मात मर हे प्रमाण भरपूर वाढले.रासायनिक घटकामुळे पिकाची खूप शाखीय वाढ, पाने फुले कमी येणे, गळ होणे, फुले, फळे न येणे या समस्या येवू लागल्या.
पुन्हा या समस्या सोडवण्यासाठी संजीवकाचा वापर होऊ लागला. तसेच तणनियंत्रण मजूरांच्या सहाय्याने करणे अवघड झाल्यामुळे तणनाशकांचा वापर वाढला. दुसरे म्हणजे पाणी व्यवस्थापन चूकिचे होऊ लागले.
निष्कर्षा मधुन ज्या जमिनीमध्ये २५% हवा, २५% पाणी, २५% खनिज पदार्थ, ५% सेंद्रिय पदार्थ त्याच जमिनी पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी योग्य आहे. परंतु, अयोग्य खत व पाणी व्यस्थापनामुळे जमिनीचा पोत खराब झाला. सेंद्रिय खताचा कमी वापर आणि रासयनिक खताचा अति वापर झाल्यामुळे जिवाणूंची संख्या कमी होऊ व जमिन निर्जीवी होऊ लागल्या. जमिनीतील सेंद्रिय कर्ब, सेंद्रिय आम्ल कमी झाल्यामुळे जमिनीचा सामू बिघडला. या सर्वांमुळे अन्नद्रव्य उपलब्ध होण्याची क्रिया थंडावली.
नैसर्गिक पद्धतीने जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी पूर्ण रासायनिक शेती निसर्गाला मान्य नाही. सेंद्रिय शेतीमुळे ह्यूमस निर्मिती, अन्नद्रव्य निर्मिती, पाणी जमिनीमध्ये जिरवणे, सुक्ष्म जिवाणू व बुरशी यांच्या सहाय्याने विविध जैविक पद्धतीने ही प्रक्रिया अखंडपणे चालू असते. पाश्चिमात्य देशातून आपल्याकडे आलेल्या पीकपद्धतीमध्ये अनेक उणीवा निर्माण झाल्यामुळे जमिनी खराब होऊन उत्पादकाता घसरली आहे.
येणाऱ्या काळात पिक उत्पादन व जमिनीची उत्पादन क्षमता टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन, पीक नियोजन,
सेंद्रिय खताचा वापर, पिक फेरपालट जिवाणू खताचा वापर रासायनिक खताचा संतुलित वापर कमीत कमी किटकनाशाके बुरशी नाशके यांचा वापर करून निसर्ग चक्र टिकवणे ही काळाची गरज आहे.
Share your comments