नमस्कार शेतकरी मित्रांनो! भारतात भाजीपाला पिकाची लागवड करणे एक फायद्याचे काम आहे. भाजीपाला पिकाची लागवड करून अनेक भाजीपाला उत्पादक शेतकरी चांगली कमाई करत आहेत. भाजीपाला पिकाची मागणी ही वर्षभर बनेलेली असते त्यामुळे ह्याची लागवड अनेक शेतकरी बांधव करतात. अशाच bhajiपाला पिकापैकी एक महत्वाचे पिक म्हणजे वांग्याचे पिक. वांग्याची शास्त्रीय पद्धत्तीने लागवड केल्यास शेतकरी लाखोंची कमाई करू शकतात.
आज कृषी जागरण आपल्या वाचक मित्रांसाठी वांग्याच्या शेतीविषयी महत्वाची माहिती घेऊन आले आहे. शेतकरी बांधवांनो वांग्याच्या अनेक प्रजाती आहेत आणि प्रदेशानुसार वांग्याच्या वेगवेगळ्या जातीची मागणी ही असते. त्यामुळे वांग्याची लागवड करण्याआधी वांग्याच्या योग्य जातीची निवड करणे महत्वाचे ठरते. ह्यासाठी कृषी जागरण आपल्याला सल्ला देऊ इच्छिते की, आपण आपल्या बाजारात मागणी असलेल्या वांग्याच्या जातीची लागवड करा. नाहीतर आपल्या मालाला मागणी राहणार नाही आणि आपले नुकसान होईल. काही ठिकाणी काळे वांगे हे जास्त प्रमाणात खाल्ले जाते तर काही ठिकाणी आपले हिरवे वांग्याला जास्त मागणी असते. त्यामुळे वांग्याच्या वाणाची निवड करताना बाजाराचा मागोवा घेणे, रिसर्च करणे महत्वाचे आहे. चला तर मग जाणुन घेऊया वांगी लागवडिविषयी.
वांग्याच्या लागवडिविषयी अल्पशी माहिती
वांग्याची लागवड ही भारतात सर्वत्र केली जाते. ह्याची लागवड ही जवळपास वर्षभर केली जाते. प्रदेशानुसार वांग्याच्या लागवडीचा कालावधी हा भिन्न भिन्न असतो. उत्तर आणि मध्य भारतात मोठ्या प्रमाणात वांगे लागवड केली जाते. साधारणपणे ह्या प्रदेशात नोव्हेंबर ते डिसेंबर ह्या कालावधीत वांग्याची लागवड केली जाते. लागवडीनंतर जवळपास वर्षभर वांग्याच्या पिकापासून उत्पादन हे मिळत राहते. जर आपल्याला एक एकर क्षेत्रात वांग्याची लागवड करायची असेल तर आपल्याला जवळपास 3500 रोपांची गरज पडेल. वांग्याचे झाड हे थोडे मोठे असते त्यामुळे त्याची लागवड करताना सुयोग्य अंतर ठेवावे. वांग्याची लागवड ही 7×3 किंवा 6×3 ह्या अंतरावर करावी जेणेकरून उत्पादन चांगले मिळेल. शिवाय ह्या अंतरावर लागवड केली तर हार्वेस्टिंग करताना सोपे राहते, वांगे काढणीला अडचण होत नाही.
वांग्याच्या हार्वेस्टिंग चे गणित
वांग्याच्या अनेक जाती वर्षभर उत्पादन देण्यास सक्षम आहेत. जर आपण वांग्याच्या सर्व जातीचा विचार केला तर सरासरी 8 ते 9 महिने वांग्याचे पिक हे उत्पादन देते. वांग्याचे पीक 60 ते 70 दिवसात उत्पादन देण्यास सुरवात करते. वांग्याच्या पिकातून एका हंगामात एका एकरातून 40 टनांपर्यंत वांग्याचे उत्पादन मिळू शकते, जर तुम्ही वांग्याच्या पिकाची योग्य काळजी घेतली म्हणजे वेळोवेळी शेतात फवारणी केली आणि आवश्यक पोषकतत्वाची पूर्तता केली तर वांग्याच्या पिकातून चांगले बम्पर उत्पादन मिळू शकते. वांग्याच्या पिकातून एका हेक्टरमधून वर्षभरात 100 टनांपर्यंत उत्पादन हे मिळू शकते.
लागवडीचा खर्च आणि उत्पन्न ह्याचे गणित
शेतकरी बांधवांनो जर समजा आपण सव्वा एकर क्षेत्रात वांग्याची लागवड केली तर आपल्याला एका वर्षासाठी सरासरी 2 लाख रुपये खर्च येणे अपेक्षित आहे. लागवडीत येणाऱ्या खर्चात प्रदेशानुसार कमी जास्त होऊ शकते. शेतकरी मित्रांनो सव्वा एकर क्षेत्रात सुमारे 50 टन उत्पादन मिळू शकते. जर आपण 50 टन उत्पादन गृहीत धरले तर आपल्याला 10 रुपये किलोप्रमाणे जवळपास 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल. लागवडीचा खर्च वजा करता सुमारे 3 लाख रुपये आपल्याला नफा मिळेल.
Share your comments