1. कृषीपीडिया

पीक पोषणात बोरॉन चे महत्व

वनस्पतींच्या सुदृढ वाढीसाठी आवश्यक अठरा मूलद्रव्यांच्या प्रभावळीमध्ये ज्या सूक्ष्म मूलद्रव्यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामध्ये बोरॉनचा समावेश होतो.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
पीक पोषणात बोरॉन चे  महत्व

पीक पोषणात बोरॉन चे महत्व

कॅल्शियम आणि नायट्रोजनचे वनस्पतींच्या चयापचय क्रियेमध्ये योग्य नियोजन करणे हे याचे मुख्य कार्य.

 

 पेशीभित्तिकांना मजबूत आधार देण्याचे काम बोरॉन करते, म्हणूनच वनस्पतीच्या अवयवांमध्ये ताकद आणि रोगप्रतिकारशक्ती तयार होते. 

 

 हरित वनस्पतीने तयार केलेल्या तयार शर्कराचे वहन फळ, बीज आणि विविध प्रकारच्या कंदांकडे होऊन तिथे ती विविध प्रकारांत साठवली जाते.

या शर्करा वहनामध्ये बोरॉनचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. अनेक फळे चवीला मधुर असतात. त्यामधील शर्करा बोरॉनच्या साहाय्यानेच तेथे आलेली असते.

 

 वनस्पतीतील फुलनिर्मिती, परागीभवन, फलधारणा, फळांची संख्या, बीजनिर्मिती हे सर्व बोरॉन आणि संप्रेरके यांच्या जादूई मत्रीमुळेच घडत असते. 

 

 डाळवर्गीय पिकांच्या मुळावर हवेमधील नायट्रोजन स्थिर करणाऱ्या गाठी असतात. या गाठींची संख्या, नायट्रोजनचे प्रथिनात रूपांतर, त्यांची डाळीमध्ये साठवण हे सर्व या जादूगाराच्या वैज्ञानिक कार्यक्षमतेमुळेच शक्य असते. 

 

 पिकांना बोरॉन उपलब्धतेसाठी जमिनीमध्ये सेन्द्रिय घटक असणे गरजेचे आहे.

 बोरॉनच्या कमतरतेमुळे फुले, फळे यांचे अकाली गळून पडणे, पिकांची वाढ खुंटणे, परागीभवनात अडथळा, फळे आणि बियांची संख्या कमी होणे हे पाहावयास मिळते.

 

शेतीमध्ये नत्र (नायट्रोजन), स्फुरद (फॉस्फरस) आणि पालाश (पोटॅशियम) या मूलद्रव्यांना महत्त्व आहे, मात्र त्यांच्या योग्य कार्यक्षमतेसाठी बोरॉनची गरज असते.

 

 लिंबूवर्गीय फळे, कडधान्ये, कंदमुळे, द्राक्ष, आंबा, केळी यांसारख्या पिकांच्या भरघोस उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना बोरॉनची आवश्यकता आहे.

आकर्षक रक्तवर्णीय स्ट्रॉबेरी फळामध्ये आढळणाऱ्या काही ओबडधोबड आकारांच्या स्ट्रॉबेरी या बोरॉनच्या कमतरतेच्या शिकार झालेल्या असतात.

 

लेखक - विनोद भोयर

 

English Summary: Importance of boron in crop nutrition Published on: 10 October 2021, 10:12 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters