गेल्या काही दिवसांपासून शेतात जमिनीवरून अनेक वाढ होत आहेत. यावरून हाणामारीपर्यंतच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे घराघरात वाद सुरू आहेत. आता मात्र जमिनीची मोजणी करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला आहे.
आळेफाटा येथे बोरी बुद्रुक गावाने ड्रोनद्वारे मोजणीचा (Land Survey By Drone) ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे हद्दी कायम होऊन आपआपल्यामधील वाद मिटणार आहेत. याबाबत आमदार अतुल बेनके म्हणाले की, आता सगळे वाद मिटणार आहेत. यामुळे उभ्या महाराष्ट्रात बोरी पॅटर्नच (Bori Pattern Of Land Survey) नाव घेतले जाईल.
यासाठी आता शेतकऱ्यांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या शेतीच्या वादावरील असंख्य तक्रारी प्रलंबित आहेत. हे वाद अनेक वर्षांपासून सुरू आहेत. याचे वाद लवकर मिटत देखील नाहीत.
सिल्वर ओक!! शरद पवार यांच्या बाबतीत उलगडणार अनेक किस्से, पुस्तकाचे प्रकाशन..
यामुळे कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी जुन्नर येथील बोरी बुद्रुकमध्ये शेतजमीन मोजणी समितीने सन २०१७ मध्ये याबाबत एक योजना आराखडा तयार करून गावातील शेतकऱ्यांसमोर मांडला होता. स्मार्ट व्हिलेज प्रकल्प अंतर्गत गावातील शेतजमीन मोजणी करण्याची ही संकल्पना होती.
धक्कादायक! कमी गुण दिल्याने विद्यार्थ्यांची शिक्षकांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल..
आता याची सुरुवात झाली आहे. याठिकाणी शेतकऱ्याने आपल्या शेतात वहिवाटीनुसार खुणा उभारण्याचे आव्हान केले होते. याला आता शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. यामुळे राज्यात याचा सगळीकडेच चांगला उपयोग होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
दुःखद! आई, मुलगा आणि वडिलांचा शेतात वीज पडून मृत्यू, शेतकऱ्यांनो 'अशी' घ्या काळजी...
अतिरिक्त उसावर निघणार तोडगा! राज्यात ऊस गळीत हंगाम 15 दिवस आधीच सुरु होणार? सरकारला शिफारस..
काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्याची हत्या, मृतदेह आढळल्याने खळबळ..
Share your comments