देशी गोमाता माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांनी संगोपन करावी ही माझी विनंती.तरच विषमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न मिळणार.रोग कमी होणार.मित्र कीटक वाढणार.खर्च कमी होणार.
आज प्रत्येकांना वयाच्या १ वर्ष पासून ते अखेर मरेपर्यंत कोणतेही आजार आहेतच.आणि वर्षातून आजार खर्च १ लाख पासून ते २० लाख पर्यंत.कारण,आपण देशी गोमाता सोडल्याने सर्वात जास्त आजार वाढले.मित्र कीटक मारल्याने फवारणी खर्च वाढला.जमिनीमध्ये गोमाता शेणखत न मिळाल्याने बुरशीचे अती प्रमाण वाढलेच. हे मात्र नक्की.सर्वात जास्त रासायनिक फवारणी ,रासायनिक खते दिल्याने जमिनीतील सूक्ष्म जिवाणू मेले.मित्र कीटक मारले. त्यामुळे जमिनीतील बुरशी वाढली.आता पिकावरील खर्च वाढला.
रासायनिक शेती करून सुद्धा आज उत्पन्न घट झाले.खर्च वाढले.सरकार नवनवीन योजना देत असून सुद्धा आत्महत्या वाढल्या.निसर्गाने सुद्धा साथ सोडली.ऋतू सुद्धा बदलले.गांडूळ सुद्धा कमी झाले.शेवाळ सुद्धा कमी झाला
आपण खरचं शेतकरी असाल तर आज नक्की विचार करा.गोमाता संगोपन केली तर शेती मध्ये तसेच आरोग्य मध्ये काय काय सुधारणा होणार.
खर्च किती कमी होणार.आपल्या जमिनी किती सुपीक होणार.गोमाताचे संगोपन केले तर शेती आणि आरोग्य सुधारून पुन्ह छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळखंड पुन्हा येणार.छत्रपती शिवराय यांच्या काळातील शेती विषयक मांडणी अवश्य पहा. माहितीपूर्वक समजून घ्या.विचार करा मात्र नक्की.
संपूर्ण शेती गोमाता वर अवलंबून आहे.तसेच आपले आरोग्य सुद्धा गोमातावर अवलंबून आहेच.आज हजारो कंपनीवाले , मार्केटिंगवाले, रासायनिक खते आणि रासायनिक फवारणीचे नियोजन सांगून शेतकरी मित्रांना फसवीत आहे.शेती नापीक बनविण्यास मदत करत आहे.शेतकरी मित्रांना लुटत आहे. तरी आपला शेतकरी रासायनिक शेतीच करत आहे.आपली काळी आई बंजर बनवत आहे.नापीक बनवीत आहे.मग कर्ज काढतो.
नवनवीन योजनांचे लाभ घेतो. कर्जबाजारी झाला की आत्महत्या करतो. असेच आपल्या कृषीप्रधान देशात होत आहे.प्रति दिवसाला एक शेतकरी आत्महत्या होतच आहे.
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु-हा, अमरावती.9529600161. जैविक शेती चे संपूर्ण महिती ,मार्गदर्शन,तसेच पिकांचे नियोजन मुख्य सूत्रे सांगितली जाणार. अजून सुद्धा वेळ गेलेली नाही शेतकरी मित्रांनो एकदा विचारा करा.गोमाता संगोपन आणि संवर्धन करा.जैविक शेती करा.विषमुक्त अन्न खा.छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील शेती करा.नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेतीचे मुख्य तत्व जोपासा.
स्वतः पिकवा स्वतः विक्री करा.आपल्याला लवकरच जैविक शेती मध्ये यश येणार आणि तुम्ही यशस्वी होणार अशी माझी गोमाता ला सदिश्चा आणि विनंती.
Share your comments