पेरणीआधी जमिनीची मशागत करून सुद्धा शेतकऱ्यानं तनवाढीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जास्त तन येत असल्याने त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होत आहे. पीक उगवण्याच्या आधी जर याचा बंदोबस्त केला तर कोणत्याही प्रकारची समस्या उदभवणार नाही.मजुरांची कमी असल्यामुळे आता तणनाशकाचा वापर करावा लागत आहे. जर शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला तरच रब्बी हंगामात उत्पादन वाढणार आहे.तसे पाहायला गेले तर नियंत्रण करण्याच्या विविध पध्दती आहेत जसे की पेरणीपूर्व मशागत, लागवड करतावेळी मशागत, पिकांची आंतरमशागत आणि तणनाशक इ. पद्धतींचा समावेश आहे.
अशी करा तणनाशकाची निवड:-
तणाचे योग्यवेळी व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे. आतापर्यंत पीक उगवून आल्यावर तणाचा बंदोबस्त केला जायचा पण आता पीक येण्याआधीच तणाचे नियंत्रण होत आहे. पेरणी झाल्यानंतर पीक उगवण्याआधी एकदल पिकासाठी ऍट्राझीन तर द्विदल पिकासाठी पेंडीमेथिलिन हे तणनाशक वापरले जाते. तसेच उभ्या पिकात असणाऱ्या तनासाठी सुद्धा तणनाशक वापरले जाते. परंतु त्यासाठी पिकाचा वर्ग कोणता आहे ते माहीत पाहिजे.
पिकनिहाय तणनाशके:-
जेव्हा तणनाशकाची फवारणी करणार आहे त्यावेळी जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजच आहे. फवारणीचा परिणाम पिकावर होऊ नये त्यासाठी हवेचा वेग कमी असावा. हरभरा उगवण्याच्या आधी पेंडीमेथिलिन हे तणनाशक २.५ लिटर प्रमाणत घेऊन ३०० लिटर पाण्यात मिसळावे जे की हे प्रमाण प्रति हेक्टरी साठी असावे.
मका :-
मका पीक उगवण्याआधी १००० ग्राम ऍट्राझीन ३०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच रब्बीतील कांदा येण्याआधी ऑक्सीफ्लोरफेन एक लिटर किंवा पेंडीमेथिलिन 2.5 लिटर घेऊन ३०० लिटर पाण्यात मिसळावे आणि फवारणी करावी.
करडई :-
करडई चे पीक उगवन्यापुर्वी एक लिटर ऑक्सिफ्लोरफेन घ्या आणि ते ३०० लिटर पाण्यात मिसळण प्रति हेक्टरवर फवारणी करावी. यामुळे असा फायदा होईल की पीक येण्याआधी तण नियंत्रणात येईल.
काय आहे फायदा :-
पीक येण्यापूर्वी शेतातील टन जर नष्ट केले तर त्याचा फायदा असा की पिकांना कोणत्याही प्रकारचे नुकसान न होता उत्पादन चांगल्या प्रकारे वाढेल. थोडया प्रमाणत खर्च जाईल पण पिकांचे चांगल्या प्रकारे सरंक्षण होईल.
Share your comments