कि उत्पन्न वाढण्याच्या नादात आपण जमिनीचे किती हाल करत आहोत . आपण म्हणतो कि माती सजीव आहे पण ती कशी ? असा प्रश्न कधी पडला आहे का? माती सजीव असते ती तिच्यातील जिवाणूंमुळे पण , आपण कधी तपासून पाहिलं आहे का? कि आपल्या जमिनीत जिवाणू आहेत कि नाहीत ? ती सजीव आहे कि नाही? आपण उत्तम फळाची अपेक्षा करतो पण त्यासाठी घ्यावयाची काळजी आणि उपाय याचा सविस्तर विचार करतो का?
भरघोस उत्पन्न यावं म्हणून आपण रासायनिक खताचा वापर करतो पण ती खत आपण ज्यासाठी जमिनीला देतो तो आपला हेतू पूर्ण तर होतो कि नाही याचा आपण मुळीच पाठपुरावा घेत नाही , हि खत आपण पिकांनच्या वाढीसाठी उपयुक्त मूलद्रव्य मिळावी म्हणून देतो पण, हि मूलद्रव्य पिकांना उपलब्ध करून द्यायचं काम कोण करत ? असा प्रश्न कधी पडला आहे का? तर हे काम करतात जिवाणू
जिवाणू मातीतील मूलद्रव्य पिकांना उपलब्ध करून देतात ,म्हणजेच जिवाणू हा माती आणि पिकं यांच्यातील दुवा आहेत. आपल्यावरूनच घ्या ना , आपल्या शरीराच्या वाढीसाठी आपण दररोज जेवण करतो पण , आपण ते जेवणाचं ताट फक्त समोर ठेवून चालणार नाही ,आपण हाताने घास तोंडात ठेवून त्याचे पचन झालं कि मग ते शरीराला उपयुक्त ठरत .तसेच जिवाणू मातीतील मूलद्रऱ्याव्यांना पिकांसाठी उपलब्ध करून देतात.
म्हणूनच जीवाणूंना शेतीचा आत्मा देखील म्हणलं जात .शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न मिळावं अशी माझीही इच्छा आहे पण, त्यासाठी काय करावं लागेल हे आता शेतकऱ्यालाच जाणून घ्यावं लागेल .
Share your comments